Friday, January 18, 2019

अनाथांसाठी लागू केलेल्या आरक्षणाची
काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश
नांदेड, दि. 18 :- राज्य शासकीय सेवेतील गट अ ते गट ड ची सरळसेवेची पदे भरताना सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी अनाथांसाठी असलेल्या 1 टक्के आरक्षणाची शासन निर्णयानुसार काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन पुणे येथील महिला व बाल विकास आयुक्तालयाचे उपआयुक्त (बालविकास)  रविंद्र पाटील यांनी परिपत्रकान्वये केले आहे.
अनाथ मुलांना राज्य शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता यावा यासाठी शिक्षण व नौकरी यामध्ये खुल्या प्रवर्गातून 1 टक्के समांतर आरक्षण लागू करण्याबाबत 2 एप्रिल 2018 रोजी शासन निर्णय पारित झाला आहे. या निर्णयाची राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे शासन परिपत्रक दि. 4 डिसेंबर 2018 रोजी निर्गमीत करण्यात आला आहे. या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय सेवा, शासनाचे उपक्रम, महामंडळे व शासन अनुदानित संस्था यांनी कार्यवाही करण्याबाबत निर्देशित केले आहे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   92 फिरत्या वाहनावरील दुकानासाठी दिव्यांगांना अर्ज करण्याची संधी  नांदेड, दि. 23 जानेवारी :- हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्...