Friday, January 18, 2019

विद्यार्थ्यांना सहज समजेल
असे प्रयोग शिक्षणात व्हावे
-         अशोक काकडे 
नांदेड, दि. 18 :- विद्यार्थ्यांना पाठ न करता सहज आकलन होईल, समजेल असे प्रयोग या शिक्षणाच्या वारी मध्ये पाहायला मिळाले याच दृष्टीने मुलांचे शाळेत शिक्षण व्हावे, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी आज व्यक्त केले. 16 ते 18 जानेवारी दरम्यान चांदोजी पावडे मंगल कार्यालयात आयोजित शिक्षणाची वारी या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी डायटच्या प्राचार्या जयश्री आठवलेश्रीकृष्ण देशमुख, दिलीप बनसोडे, बंडू आमदूरकर, शोभा मोकले, नंदिनी पुणेकर, डॉ.अतुल चंद्रमोरे, उमेश नरवाडे, संजय शेळगे, संतोष केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काकडे म्हणाले, वारीच्या स्टॉल मधील नावीन्यपूर्ण प्रयोग शाळेत कशाप्रकारे करता येतील याचे शिक्षकांनी चिंतन करून तंत्रज्ञानातून विद्यार्थ्यांना ज्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत त्याचा प्रत्यक्षात वापर केला पाहिजे. आपण ज्या मुलांना घडवतो ती पंधरा वर्षानंतर मोठी झाली तर खऱ्या अर्थाने शिक्षक म्हणून आपला ऊर भरून येतो. तेंव्हा तो विद्यार्थी माझा आहेअसे शिक्षक आनंदाने सांगू शकतां असे सांगून शिक्षणाच्या वारीचे त्यांनी कौतुक केले. एखादी गोष्ट तावूनसुलाखून घेऊनच शिक्षक प्रतिक्रिया देतात ती खरी असते. वारी आयोजनाच्या सर्वच बाबींवर शिक्षक समाधानी असल्याचे शिक्षकांनी स्टॉलला भेट दिल्यानंतर सांगितले ही वारीची फलश्रुती आहे असे ते म्हणाले.
वारी आयोजनाची भूमिका डॉ.माणिक जाधव यांनी विशद केली. सर्व स्टॉलची थोडक्यात माहिती दिली. शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी वारी ही आमच्यासाठी संधी होती असे सांगून यजमानपद दिल्याबद्दल शासनाचे आभार मानले. शिक्षकांसाठी हे नवे प्रयोग दिशादर्शक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पांडागळे यांनी तर आभार चंद्रकांत धुमाळे यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक संघटनेचे बालासाहेब  लोणेडॉ.जी.एम. सोनकांबळे, बालाजी पांडागळे व्यंकटेश चौधरी, डॉ.विलास ढवळे, ,राजेश कुलकर्णी मिलिंद ढवळे, बळी अंबुलगेकर यांच्यासह स्टॉलधारक सर्व शिक्षकपालक शिक्षण विभाग व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण विकास संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याताअधिव्याख्याताकर्मचारी व शिक्षण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख नबील, नंदिनी पुणेकर, जी.आरराठोड  दत्तात्रय मठपती, सुभाष पवनेडी जी पोहणेशिरीषकुमार आळंदे, सुधीर गुट्टे, राम भारतीश्याम पांढरे, विकास ढवळे,डॉ.शेख मुसीर, स्वाती लांजेवार ,संघपाल झिनेडॉ.दादाराव सिरसाठ, वंदना जकाते आदींनी परिश्रम घेतले.
*****

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   92 फिरत्या वाहनावरील दुकानासाठी दिव्यांगांना अर्ज करण्याची संधी  नांदेड, दि. 23 जानेवारी :- हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्...