Friday, January 18, 2019


युवकांनी विज्ञानासोबत
अध्यात्माची कास धरावी
- डॉ. कासराळीकर
नांदेड, दि. 18:-  मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे आयोजित व्याख्यानात बोलतांना डॉ. दीपक कासाराळीकर यांनी विज्ञान तंत्रज्ञानासोबतच अद्यात्माची कास युवा पिढीने धरणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
 डॉ. कासाराळीकर यांनी अधात्मात आजच्या विज्ञानाचे प्रतिबिंब आढळून येते, हे सखोल अभ्यास केल्यास समजू शकते, असे उदाहरणासह सांगितले. यावर्षी ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशापांडे सुधीर फडके या मराठी थोर साहित्यिक संगीतकारांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने हे वर्ष मराठी भाषेसाठी माणसांसाठी विशेष महत्वाचे आहे असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन संस्थेचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे यांनी मराठी भाषा संगणकीय भाषा होणे आवश्यक असून इंग्रजी भाषा जशी  सहजतेने संगणकात वापरता येवू शकते तशी मराठी वापरता आली पाहिजे याची जबाबदारी युवकांवर असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त विद्यार्थ्यांसाठी निबंध, वाद-विवाद, मराठी भाषा ज्ञान चाचणी, परभाषीय विद्यार्थ्यांसाठी मराठी हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिमखाना उपाध्यक्ष प्रा. डी. एम. लोकमनवार, प्रा. दमकोंडवार, प्रा. कंधारे, प्रा. मलिक, प्रा.कळसकर, प्रा. यादव, डॉ. जोशी, प्रा. मुधोळकर, सर्वश्री. जगताप, भरणे, झंपलवाड, पावडे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शिवराज लाकडे यांनी केले तर आभार प्रा.लोकमनवार यांनी मानले.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...