Friday, January 18, 2019


राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी
शिष्यवृत्ती योजना परीक्षेची गुणाची यादी प्रसिद्ध
नांदेड, दि. 18 :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेमार्फत 9 डिसेंबर 2018 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत परीक्षेत विद्यार्थ्यांना प्राप्त गुणाची यादी www.mscepune.in www.nmms.mscescholarshipexam.in या संकेतस्थाळवर पाहता येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या नाव, जात, दिव्यांगत्वात, जन्म दिनांक आदी बाबत दुरुस्ती असल्यास दुरुस्ती बुधवार 23 जानेवारी 2019 पर्यंत परिषदेकडे nmms.msce@gmail.com या ईमेलवर शाळेमार्फत पाठविण्यात यावी. मुदतीनंतर येणाऱ्या अर्जाचा, दुरुस्तीचा विचार केला जाणार नाही. प्राप्त सर्व दुरुस्त्यांचा विचार करुन शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहिर करण्यात येईल. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आली असल्याने पेपरची गुणपडताळणी केली जात नाही.
भारत सरकारच्यावतीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविली जात आहे. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना तसेच त्यांचे बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा योजनेचा उद्देश आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. ही शिष्यवृत्ती बारावी पर्यंत असून सन 2017-18 पासून शिष्यवृत्ती दरमहा 1 हजार रुपये प्रमाणे वार्षिक 12 हजार रुपये आहे. आठवीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न 1 लाख 50 हजार रुपयापेक्षा कमी आहे व जे विद्यार्थी अनुदानित शाळेत शिकत असतात त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे या शिष्यवृत्तीचे वाटप होते, असे पुणे येथील महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   92 फिरत्या वाहनावरील दुकानासाठी दिव्यांगांना अर्ज करण्याची संधी  नांदेड, दि. 23 जानेवारी :- हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्...