Saturday, June 13, 2020

वृत्त क्र. 5 38


शनिवारी 22 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह
बाधितांमध्ये 13 पुरुष तर 9 महिलांचा समावेश
आठ बाधितांना बरे झाल्याने सुट्टी
 
नांदेड (जिमाका) दि. 13 :- नांदेड जिल्ह्यात आज सायं. 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात 22 व्यक्तींना कोरानाची बाधा झाल्याने जिल्ह्यातील ही संख्या 256 वर पोहचली आहे. एकाबाजुला बाधितांची संख्या वाढली असली तरी दुसऱ्या बाजूला पंजाब भवन यात्री निवास नांदेड येथील 5 व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील 3 बाधित असे 8 व्यक्ती बरे झाल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आल्याने मोठा दिलासाही मिळाला.
बावीस बाधितांपैकी 13 पुरुष तर 9 महिलांचा समावेश आहे. यामध्ये अनुक्रमे 25,28, 29, 30 (2), 31, 34, 35 (2), 49, 51, 55  67 वर्षाचे 13 पुरुष तर महिलांमध्ये अनुक्रमे 31, 36, 43, 45, 47, 48 (2), 49 55 अशी आहेत. या सर्व बाधितांची प्रकृती सद्यस्थितीत स्थिर आहे. आतापर्यंत एकुण 168 व्यक्ती कोरोना आजारातून बरे झाले आहेत. आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या एकुण 13 आहे.
शनिवार 13 जून रोजी 22 कोरोना बाधितांमध्ये चिखलवाडी परिसरातील 1 पुरुष वय वर्षे 55 1 महिला वय वर्षे 48, विजय कॉलनी 1 महिला वय वर्षे 55, दीपनगर 1 पुरुष वय 49 वर्षे, एचआयजी कॉलनी 1 महिला वय वर्षे 48, झेंडा चौक 1 महिला वय वर्षे 45, स्वामी विवेकानंदनगर 1 पुरुष वय वर्षे 34, सोमेश कॉलनी 1 पुरुष वय वर्षे 51 1 महिला वय वर्षे 49, पद्माजा सिटी 1 महिला वय वर्षे 43, सिडको 1 महिला वय वर्षे 47, यशवंतनगर 1 पुरुष वय वर्षे 35, विणकर कॉलनी 1 पुरुष वय वर्षे 30, भाग्यनगर रोड 1 महिला वय वर्षे 31, संत ज्ञानेश्वरनगर 1 पुरुष वय वर्षे 35, न्यायनगर 1 पुरुष वय वर्षे 28, श्रीकृष्णनगर तरोडा (बु) 1 पुरुष वय वर्षे 31, विश्वदीपनगर 1 पुरुष 25, महावीर चौक 1 पुरुष वय वर्षे 67, इतवारा 1 पुरुष वय वर्षे 30, चैतन्यनगर 1 महिला वय वर्षे 36 व अर्धापूर तालुक्याती कामठा बु. येथील 1 पुरुष वय वर्षे 29 एवढे आहे.
शनिवारी प्राप्त झालेल्या 97 अहवालापैकी 62 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. सद्यस्थितीत 75 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील 3 बाधितांमध्ये 52 वर्षाची एक महिला आणि  52  54 वर्षाचे दोन पुरुषांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.
नांदेड जिल्ह्यात 75 बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 15, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 52, माहूर ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटर 1, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 2 बाधित असून 5 बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. शनिवार 13 जून रोजी 163 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 44 हजार 880,
घेतलेले स्वॅब 4 हजार 949,

निगेटिव्ह स्वॅब 4 हजार 253,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या 22,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती 256,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 187,

स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-83,
मृत्यू संख्या- 13,

रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 168,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती 75,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 163 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
00000



वृत्त क्र. 547   
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात
होमिओपॅथीक औषधींचे वाटप
नांदेड (जिमाका) दि. 13 :- होमिओपॅथीक मेडिकल असोसिएशन ऑफ इंडिया जिल्हा शाखा नांदेडच्यावतीने जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांच्या कार्यालयात भारत सरकार अंतर्भूत आयुष मंत्रालयद्वारा निर्दशित  आर्सेनिक अल्बम- 30, या कोरोना विरुद्धच्या रोगप्रतिकार शक्ती वाढणारी होमिओपॅथीक औषधींचे वाटप कर्मचाऱ्यांना करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघमारे आदी कर्मचारी तथा  जिल्हा हमाईचे अध्यक्ष डॉ. डी. बी. देशमुख, नांदेड होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय पाटील, डॉ. अमोल रवंदे, डॉ.आशा चव्हाण आदी डॉक्टर्स उपस्थित होते.
0000



वृत्त क्र. 546   
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी चलवदे यांचे
थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन
नांदेड (जिमाका) दि. 13 :- कंधार तालुक्यातील कृषी विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची व कामाची पाहणी करून जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांशी थेट बांधावर भेटी देत चर्चा करुन त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. हा खरीप हंगाम सर्वांसाठी चांगला असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विविध योजनेंतर्गत मानसपुरी संगमवाडी येथे पाणलोट क्षेत्र विकासाच्या सलग समतल चर, अर्दन स्ट्रक्चर कामांना त्यांनी भेटी दिल्या व पाहणी केली. मानसपुरी येथे शेतकऱ्यांना भेटून त्यांनी लिंबोळीचे महत्त्व, फायदे समजावून सांगितले व मोठ्या प्रमाणावर लिंबोळ्या गोळा करुन निमार्क तयार करून वापर करण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत मौजे गंगणबीड येथील सामुहीक शेततळे, त्यावर लागवड केलेली पपई, ठिबक सिंचनावर कापूस लागवडीची त्यांनी पाहणी केली. गंगणबीड, नागलगाव येथील भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून लागवड केलेल्या पेरू,आंबा या फळपिकांचीही त्यांनी पाहणी केली. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत तळ्याचीवाडी  नागलगाव येथील कांदाचाळींची त्यांनी पाहणी केली. कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत नागलगाव येथे वितरीत केलेल्या ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलीत पेरणी यंत्राची पाहणी केली. त्यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवत ट्रॅक्टरचलीत पेरणी यंत्रानेपेरणी करून खरीपातील पेरणीचा शुभारंभ केला.
त्यांच्या सोबत कंधार तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, कंधारचे मंडळ कृषी अधिकारी पवणसिंह बैनाडे, कृषी पर्यवेक्षक (प्र.) रोहीणी पवार, कृषी सहाय्यक गुट्टे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक विनोद पुलकुंडवार यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी कृषी विभागात चांगली कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यात कृषी सेविका श्रीमती रोहीणी पवार यांना प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन तर कृषी सेविका श्रीमती पिंपळगावे, लिपीक सय्यद ईब्राहीम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
0000

वृत्त क्र. 545


श्री गुरुगोविंद सिंघजी स्मारक
जिल्हा रुग्णालय येथे
 दृष्टिदान दिवस साजरा
नांदेड (जिमाका) दि. 13 :-  श्री गुरुगोविंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय येथे कै. डॉ. रामचंद्र लक्ष्‍मण भालचंद्र स्मृतिदिन व दृष्टिदान दिन साजरा करण्यात आला होता. यावेळी डॉ. भालचंद्र यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करुन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. शासकीय सेवेत नेत्र शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांनी अहोरात्र काम केले. त्यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यात 10 जून 1924 रोजी झाला होता.
खडतर परिस्थितीवर मात करत त्यांनी जिद्द व चिकाटीच्या बळावर 80 हजाराहून अधिक नेत्रचिकित्सा पूर्ण केल्या. अंधांचे जीवन प्रकाशमय करणाऱ्या या दीपस्तंभाची ज्योत 1979 मध्ये 10 जून रोजी मावळली. त्या दिवसाचे औचित्य म्हणून 1982 पासून त्यांच्या सन्मानार्थ 10 जून हा दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसीकर, अति. जिल्हा शल्यचिकित्सक तथा नेत्रशल्यचिकित्स डॉ. संतोष सिरसिकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (रा अं नि का) डॉक्टर रोशनआरा तडवी खान नेत्रचिकित्सा अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
नेत्रदानाबद्दल नेत्र शल्यचिकित्स डॉ. सिरसीकर यांनी माहिती दिली. सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करण्यावा असे आवाहन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (राअंनिका) डॉक्टर रोशनआरा तडवी खान यांनी केले. जिल्हात नेत्रदात्यांकडून नेत्रसंकलन करुन बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करुन अंध व्यक्तींना दृष्टी मिळवून देण्यासाठी डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील नेत्र विभाग प्रमुख डॉ. व्ही. एम. सहस्रबुद्धे व त्यांची टीमने दृष्टीदानाचे मोलाचे कार्य करीत असतात परंतु सध्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भावामुळे नेत्रदानाचे कार्य शिथील करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित अधिकारी कर्मचारी रुग्ण नातेवाईकांचे आभार व कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचे नोडल ऑफिसर तथा नेत्रचिकित्सा अधिकारी श्री दीक्षित यांनी केले. विशेष म्हणजे या सर्व कार्यक्रमाच्यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...