Saturday, June 13, 2020

वृत्त क्र. 545


श्री गुरुगोविंद सिंघजी स्मारक
जिल्हा रुग्णालय येथे
 दृष्टिदान दिवस साजरा
नांदेड (जिमाका) दि. 13 :-  श्री गुरुगोविंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय येथे कै. डॉ. रामचंद्र लक्ष्‍मण भालचंद्र स्मृतिदिन व दृष्टिदान दिन साजरा करण्यात आला होता. यावेळी डॉ. भालचंद्र यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करुन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. शासकीय सेवेत नेत्र शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांनी अहोरात्र काम केले. त्यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यात 10 जून 1924 रोजी झाला होता.
खडतर परिस्थितीवर मात करत त्यांनी जिद्द व चिकाटीच्या बळावर 80 हजाराहून अधिक नेत्रचिकित्सा पूर्ण केल्या. अंधांचे जीवन प्रकाशमय करणाऱ्या या दीपस्तंभाची ज्योत 1979 मध्ये 10 जून रोजी मावळली. त्या दिवसाचे औचित्य म्हणून 1982 पासून त्यांच्या सन्मानार्थ 10 जून हा दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसीकर, अति. जिल्हा शल्यचिकित्सक तथा नेत्रशल्यचिकित्स डॉ. संतोष सिरसिकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (रा अं नि का) डॉक्टर रोशनआरा तडवी खान नेत्रचिकित्सा अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
नेत्रदानाबद्दल नेत्र शल्यचिकित्स डॉ. सिरसीकर यांनी माहिती दिली. सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करण्यावा असे आवाहन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (राअंनिका) डॉक्टर रोशनआरा तडवी खान यांनी केले. जिल्हात नेत्रदात्यांकडून नेत्रसंकलन करुन बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करुन अंध व्यक्तींना दृष्टी मिळवून देण्यासाठी डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील नेत्र विभाग प्रमुख डॉ. व्ही. एम. सहस्रबुद्धे व त्यांची टीमने दृष्टीदानाचे मोलाचे कार्य करीत असतात परंतु सध्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भावामुळे नेत्रदानाचे कार्य शिथील करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित अधिकारी कर्मचारी रुग्ण नातेवाईकांचे आभार व कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचे नोडल ऑफिसर तथा नेत्रचिकित्सा अधिकारी श्री दीक्षित यांनी केले. विशेष म्हणजे या सर्व कार्यक्रमाच्यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...