वृत्त क्र. 546
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी चलवदे यांचे
थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन

विविध योजनेंतर्गत मानसपुरी संगमवाडी येथे
पाणलोट क्षेत्र विकासाच्या सलग समतल चर, अर्दन स्ट्रक्चर कामांना त्यांनी भेटी दिल्या
व पाहणी केली. मानसपुरी येथे शेतकऱ्यांना भेटून त्यांनी लिंबोळीचे महत्त्व, फायदे समजावून सांगितले व
मोठ्या प्रमाणावर लिंबोळ्या गोळा करुन निमार्क तयार करून वापर करण्याचे आवाहन
केले. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत मौजे गंगणबीड येथील सामुहीक शेततळे, त्यावर
लागवड केलेली पपई, ठिबक
सिंचनावर कापूस लागवडीची त्यांनी पाहणी केली. गंगणबीड, नागलगाव येथील भाऊसाहेब
फुंडकर फळबाग लागवड, महात्मा
गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून लागवड केलेल्या पेरू,आंबा या फळपिकांचीही त्यांनी
पाहणी केली. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत तळ्याचीवाडी नागलगाव येथील कांदाचाळींची त्यांनी पाहणी केली. कृषी यांत्रिकीकरण
योजनेंतर्गत नागलगाव येथे वितरीत केलेल्या ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलीत पेरणी
यंत्राची पाहणी केली. त्यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवत ट्रॅक्टरचलीत पेरणी
यंत्रानेपेरणी करून खरीपातील पेरणीचा शुभारंभ केला.
त्यांच्या सोबत कंधार तालुका कृषी अधिकारी
रमेश देशमुख, कंधारचे
मंडळ कृषी अधिकारी पवणसिंह बैनाडे, कृषी पर्यवेक्षक (प्र.) रोहीणी पवार, कृषी सहाय्यक गुट्टे, सहाय्यक तंत्रज्ञान
व्यवस्थापक विनोद पुलकुंडवार यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी कृषी विभागात चांगली कामगिरी केलेल्या
कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यात कृषी सेविका श्रीमती रोहीणी पवार यांना प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन तर कृषी
सेविका श्रीमती पिंपळगावे, लिपीक सय्यद ईब्राहीम
यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
0000
No comments:
Post a Comment