Thursday, January 16, 2020

होट्टल सांस्‍कृतिक व पर्यटन महोत्‍सव- 2020
17 ते 19 या तीन दिवसाच्या कालावधीत विविध कार्यक्रमांची मेजवाणी  
नांदेड, दि. 16:- नांदेड जिल्‍ह्यातील ऐतिहासिकक वारसा लाभलेले व चालुक्‍यांची उपराजधानी म्‍हणून पुरातन काळात नावारूपाला आलेले ग्राम म्‍हणून होट्टलची ख्‍याती आहे. होट्टल येथे सिध्‍देश्‍वराचे प्राचीन चालुक्‍य मंदीर स्थित असून सभोवती अनेक प्राचिन मंदिरे आहेत. प्राचिन शिल्‍प स्‍थापत्‍य कलेचा समृध्‍द वारसा जतनसंवर्धन करणे पर्यटन वाढीच्‍यादृष्‍टीने आवश्‍यक आहे. त्यादृष्टिने होट्टल ता. देगलूर जि. नांदेड येथे  दिनांक 17 जानेवारी, 2020 वेळ सांयकाळी 5-00 वाजता होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेला आहे.
लोकसभा सदस्य प्रतापराव पाटील चिखलीकर, आ. अमरनाथ राजूकर, आ. राम पाटील रातोळीकर, मा. वि. स.स. यांच्या स्थानिक निधीतून सुभाष साबणे यांच्या स्थानिक विकास निधीतून होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचे उद्घाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री अशोक चव्हाण , नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, प्रमुख अतिथी म्हणून लोकसभा सदस्य प्रतापराव पाटील चिखलीकर, हिंगोली लोकसभा सदस्य हेमंत पाटील, लातूर लोकसभा सदस्य सुधाकर श्रृंगारे याची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
विधान परिषद सदस्य सतीष चव्हाण, विधान परिषदेचे सदस्य अमरनाथ राजूरकर, किनवट विधानसभा सदस्य भिमराव केराम, हदगाव विधानसभा सदस्य माधवराव पवार जवळगांवकर, लोहा विधानसभा सदस्य श्यामसुंदर शिंदे, नांदेड उत्तरचे विधानसभा सदस्य बालाजी कल्याणकर, माजी विधानसभा सदस्य सुभाष साबणे, विधान परिषद सदस्य विक्रम काळे, विधानसभा परिषद सदस्य राम पाटील रातोळीकर, देगलूर विधानसभा रावसाहेब अंतापूरकर, मुखेड विधानसभा सदस्य डॉ. तुषार राठोड, नांदेड दक्षिणचे विधानसभा सदस्य मोहनराव हंबर्डे, नायगाव विधानसभा सदस्य राजेश पवार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उध्दव भोसले, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, देगलूर पंचायत समितीचे सभापती संजय वल्कले, करडखेड जिल्हा परिषद सदस्य ॲङ रामराव नाईक पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया , प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश दिपक धोळकिया, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, देगलूर नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, वळग पंचायत समितीच्या सदस्या श्रीमती मुक्ताबाई कांबळे आदि विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
होट्टलचे सरपंच शेषराव सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम  विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर नाईक, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी , लेखाधिकारी तथा सांस्कृतिक समन्वयक निळकंठ पाचंगे विनीत असणार आहेत.
दिनांक 17 जानेवारी, 2020 रोजी गायन व तबला वादन सहभाग ऐश्वर्या परदेशी व भार्गव देशमुख,  होट्टल वेळ 4-30 ते 5-00, उद्घाटन मान्यवरांचे हस्ते सायंकाळी 5-00 ते 7-00, अमृतगाथा (कथ्थक नृत्य) सुप्रसिध्द सिनेतारका व नृत्यांगना शर्वरी जमेनिस व संच, पुणे सायकांळी 7-00 ते 10-00.
दिनांक 18 जानेवारी, 2020 कार्यक्रम चर्चासत्र चालुक्यन स्थापत्य कला डॉ.प्रभाकर देव,सुरेश जोंधळे, प्रा. चंद्रकांत पोतदार, डॉ. रंजन गर्गे दुपारी 12-00 ते 2-00, पखवाज वादन व बासरी वादन जुगलबंदी उध्दवबापू आपेगांवकर व ऐनोद्दिन वारसी व संच होट्टल सांयकाळी 6-00 ते 7-00, लोककला लावणी नृत्याविष्कार प्रख्यात नृत्यांगना ऐश्वर्या बडदे व संच, नवी मुंबई सांयकाळी 7-00 ते 10-00 .
दिनांक 19 जानेवारी, 2020 समारोप मान्यवरांच्या हस्ते सांयकाळी 5-00 ते 7-00, गीत रामायण सुप्रसिध्द गायक संजय जोशी व संच सांयकाळी 7-00 ते 8-00 , लोकसंगीत विजय जोशी व संच , सांयकाळी 8-00 ते 9-00, भारुड निरंजन भाकरे व संच औरंगाबाद सांयकाळी 9-00 ते 10-00 .

0000  




राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री नांदेड जिल्हा
अशोक चव्हाण यांचा दौरा कार्यक्रम
नांदेड, दि. 16:-   राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री नांदेड जिल्हा अशोक चव्हाण यांचा दौरा कार्यक्रम शुक्रवार, दि.17 जानेवारी2020 व 18 जानेवारी, 2020 या दोन दिवसाच्या कालावधीत नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.
शुक्रवार, 17 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 12.50 वाजता मुंबईहून 2 टी-518 विमानाने नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2-30 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन . सांयकाळी 4-30 वाजता नांदेडहून मोटारीने देगलूरकडे प्रयाण. 6-00 वाजता देगूलर येथे आगमन. 6-00 ते 7-30 वाजता होट्टल ता. देगलूर येथील होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सव -2020 ता. देगलूर कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 8-00 वाजता लिंगण केरु शाळा, होट्टलजवळ ता. देगलूर येथील ॲङ रामराव नाईक , जि.प. सदस्य यांच्याकडे राखीव.
शनिवार, दि. 18 जानेवारी, 2020 रोजी सकाळी नांदेडहून 2 टी-518 विमानाने मुंबईकडे प्रयाण . दुपारी 12-20 वाजता मुंबई विमानतळ येथे आगमन.

0000  
बेरोजगार तरुणांना किमान कौशल्य विकास प्रशिक्षण
            नांदेड , दि. 16:-  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. मुंबई , जिल्हा कार्यालय, नांदेड यांच्यामार्फत किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
            समाजातील मातंग व तत्सम 12 पोटजातीतील होतकरु प्रशिक्षित बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देवून त्यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देणे व नौकरीच्या स्वरुपात स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने प्रशिक्षण योजना प्रभावीपणे या महामंडळामार्फत राबविण्यात येत आहे.
            तरी विविध व्यवसायाचे प्रशिक्षण व किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम समाजातील मातंग व तत्सम 12 पोटजातीतील होतकरु तरुणी / तरुणांनी यांचा लाभ घ्यावा.
            इयत्ता आठवी, दहावी, बारावी, पदवी,पदव्युत्तर विद्यार्थी / विद्यार्थींनीने खालील कागदपत्रासहित कोऱ्या कागदावर अर्ज खालील प्रमाणपत्र जोडून जिल्हा कार्यालय, नांदेड येथे कार्यालयीन वेळेत खालील पत्यावर अर्ज करावेत.
            जातीचे प्रमाणपत्र, टी.सी., मार्कमेमो, आधारकार्ड/मतदान कार्ड, रेशनकार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो कागदपत्रासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या.                              डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर, हिंगोली रोड, नांदेड या कार्यालयाशी संपर्क साधावा.  
0000 


जी-2 झोन विभागातंर्गत खो-खो उपविजेत्या संघाचे
प्राचार्य डॉ. जी.व्ही. गर्जे यांच्याकडून अभिनंदन

            नांदेड , दि. 16:- शासकीय तंत्रनिकेतन , कुर्तडी ता. कळमनुरी जि. हिंगोली येथे जी -2 झोन (नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली या चार जिल्ह्याकरिता) विभागातंर्गत दिनांक 11 व 12 जानेवारी, 2020 रोजी पार पाडलेल्या खो-खो या क्रिडा प्रकारात नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांने सरस कामगिरीच्या जोरावर शासकीय तंत्रनिकेतन, निलंगा संघावर निर्णायक आघाडी घेत उपविजेतेपद पटकावले.   
        तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या क्रिडा गुणांना वाव मिळवून देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी जी-2 झोन विभागातंर्गत यावेळी खो-खो आयोजनाचे यजमानपद सरस्वती फार्मसी कॉलेज, कुर्तडी ता. कळमनुरी जि. हिंगोली या संस्थेकडे होते. खो-खो या क्रिडा प्रकारात शासकीय तंत्रनिकेतनासह खाजगी तंत्रनिकेतनच्या संघाने आपल्या विद्यार्थ्यांसह सहभाग नोंदवला होता.
            या स्पर्धेकरीता संघ निवड प्रक्रियेची व प्रशिक्षकाची महत्वपूर्व जबाबदारी स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे अधिव्याख्याता एल.टी. जाधव व आर. व्ही. आदमवाड यांनी पार पाडली. उपविजेत्या संघात लाळे गणेश (कर्णधार), लोहार आकाश, काझी सोहेल, कुरे प्रल्हाद, पाटील अजय, नरखडे अनिकेत, पवार श्रावण, बिराजदार अभिषेक, सतीष नलाबले, अंभूरे ओमकार, पाटील कार्तिक, पोलवमवाड बालाजी इत्यादी संघातील खेळाडूंचे व संघ व्यवस्थापक व्ही.सी.साळुंके व के.डी. लोकरे यांचे अभिनंदन शासकीय तंत्रनिकेतन, नांदेडचे प्राचार्य डॉ.जी.व्ही. गर्जे, संस्थेचे उपप्राचार्य तथा स्थापत्य अभि. विभाग प्रमुख पी.डी.पोपळे , जिमखाना उपाध्यक्ष तथा विभाग प्रमुख उपयोजित यंत्रशास्त्र डी. एम. लोकमनवार, एस.पी.कुलकर्णी विभाग प्रमुख स्थापत्य (द्वितीय पाळी), एम.एस.भोजने, बी.पी. हूरदुके , आर.एस. पोहरे व संस्थेतील अधिकारी, कर्मचारी यांनी उपविजेत्या संघाचे अभिनंदन केले आहे.
0000






शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होणे ही काळाची गरज
--- प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी
            नांदेड , दि. 16:- शैक्षणिक क्षेत्रात आजच्या काळात गुणवत्तेला महत्व देणारी शिक्षण पध्दती अस्तित्वात यायची असेल, तर शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल होणे ही काळाची गरज असल्याचे पतिपादन प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांना शासकीय तंत्रनिकेतन, नांदेड येथे आयोजीत मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा समारोप कार्यक्रमात केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे हे होते. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत दिनांक 01 जानेवारी, 2020 ते दिनांक 15 जानेवारी, 2020 दरम्यान वाचन आठवडा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. अधिकारी कर्मचारी वर्गासाठी हस्ताक्षर स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती हे उल्लेखनिय.
            समारोप कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या उपस्थितीत मराठी अभिवाचन स्पर्धा पार पडली. समारोप कार्यक्रमाचे प्रास्तावीक प्रा. राजीव सकळकळे यांनी केली.              प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा  अंतर्गत मराठी हस्ताक्षर स्पर्धा घ्यावी लागते हे मराठी भाषेचे दुर्देव आहे असे प्रतिपादन केले.
कला क्षेत्रात आज चांगल्याना वाव नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. टेक्निकल म्हणजे तांत्रिक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना चांगल्यां संधी उपलब्ध आहेत. सोबतच एखादी कला, छंद असेल तर तुम्ही उपाशी मरणार नाही असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. गोरक्ष गर्जे यांनी स्वत: ची किंमत स्वत: निर्माण करा त्यासाठी शिक्षकांनी त्यांना मदत करावी असे प्रतिपादन केले. मातृभाषा सर्वांना यायला पाहीजे. ती जर चांगली आली तर जगातील कोणत्याही भाषेचे सहज आकलन होउ शकते असेही त्यांनी सांगीतले. गड, किल्ले यांचे संवर्धन करावे लागते तसे मराठी भाषेचे संवर्धन करण्याची वेळ आपल्यावर आली आहे असेही ते म्हणाले.
अभिवाचन स्पर्धेत आकाश मरखेले या विद्यार्थ्यास तर हस्ताक्षर स्पर्धेत अधिकारी/कर्मचारी गटात श्री. सु. मा. झडते, डॉ.ग. मा. डक, प्रा.  रामेश्वर आदमवाड, श्री. आनंदा दुधमल, श्री. सुदाम चव्हाण यांना बक्षीसे मिळाली. कार्यक्रमात डॉ. अ. अ. जोशी यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली तर सुत्र संचालन शिवराज लाकडे तेजस पाटील यांनी केली. समन्वयक म्हणुन प्रा.राजीव सकळकळे सहा. समन्वयक म्हणुन जीवन शिंदे यांनी काम केले.
कार्यक्रमात आभार प्रदर्शन प्रा. सुर्यकांत कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. वि.वि. सर्वज्ञ, प्रा.स. मा. कंधारे, प्रा. अजय नंदलाल यादव, प्रा. सं. रा. मुधोळकर, श्री. शेख जावेद श्री. संतोष  जगताप, श्री. आनंदा पावडे, श्रीमती  रत्नपारखी, श्री. रमेश लहानकर यांनी परीश्रम घेतले.
0000


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...