Thursday, January 16, 2020



जी-2 झोन विभागातंर्गत खो-खो उपविजेत्या संघाचे
प्राचार्य डॉ. जी.व्ही. गर्जे यांच्याकडून अभिनंदन

            नांदेड , दि. 16:- शासकीय तंत्रनिकेतन , कुर्तडी ता. कळमनुरी जि. हिंगोली येथे जी -2 झोन (नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली या चार जिल्ह्याकरिता) विभागातंर्गत दिनांक 11 व 12 जानेवारी, 2020 रोजी पार पाडलेल्या खो-खो या क्रिडा प्रकारात नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांने सरस कामगिरीच्या जोरावर शासकीय तंत्रनिकेतन, निलंगा संघावर निर्णायक आघाडी घेत उपविजेतेपद पटकावले.   
        तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या क्रिडा गुणांना वाव मिळवून देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी जी-2 झोन विभागातंर्गत यावेळी खो-खो आयोजनाचे यजमानपद सरस्वती फार्मसी कॉलेज, कुर्तडी ता. कळमनुरी जि. हिंगोली या संस्थेकडे होते. खो-खो या क्रिडा प्रकारात शासकीय तंत्रनिकेतनासह खाजगी तंत्रनिकेतनच्या संघाने आपल्या विद्यार्थ्यांसह सहभाग नोंदवला होता.
            या स्पर्धेकरीता संघ निवड प्रक्रियेची व प्रशिक्षकाची महत्वपूर्व जबाबदारी स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे अधिव्याख्याता एल.टी. जाधव व आर. व्ही. आदमवाड यांनी पार पाडली. उपविजेत्या संघात लाळे गणेश (कर्णधार), लोहार आकाश, काझी सोहेल, कुरे प्रल्हाद, पाटील अजय, नरखडे अनिकेत, पवार श्रावण, बिराजदार अभिषेक, सतीष नलाबले, अंभूरे ओमकार, पाटील कार्तिक, पोलवमवाड बालाजी इत्यादी संघातील खेळाडूंचे व संघ व्यवस्थापक व्ही.सी.साळुंके व के.डी. लोकरे यांचे अभिनंदन शासकीय तंत्रनिकेतन, नांदेडचे प्राचार्य डॉ.जी.व्ही. गर्जे, संस्थेचे उपप्राचार्य तथा स्थापत्य अभि. विभाग प्रमुख पी.डी.पोपळे , जिमखाना उपाध्यक्ष तथा विभाग प्रमुख उपयोजित यंत्रशास्त्र डी. एम. लोकमनवार, एस.पी.कुलकर्णी विभाग प्रमुख स्थापत्य (द्वितीय पाळी), एम.एस.भोजने, बी.पी. हूरदुके , आर.एस. पोहरे व संस्थेतील अधिकारी, कर्मचारी यांनी उपविजेत्या संघाचे अभिनंदन केले आहे.
0000


No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...