शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होणे ही काळाची गरज
--- प्रा. लक्ष्मीकांत
तांबोळी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे हे
होते. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत दिनांक 01 जानेवारी, 2020 ते दिनांक 15 जानेवारी, 2020 दरम्यान वाचन आठवडा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी हस्ताक्षर स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती हे उल्लेखनिय.
समारोप
कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या उपस्थितीत मराठी अभिवाचन स्पर्धा पार पडली. समारोप कार्यक्रमाचे प्रास्तावीक प्रा. राजीव सकळकळे यांनी केली. प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांनी “मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा” अंतर्गत मराठी हस्ताक्षर स्पर्धा घ्यावी लागते हे मराठी भाषेचे दुर्देव आहे असे प्रतिपादन केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. गोरक्ष गर्जे यांनी स्वत: ची
किंमत स्वत: निर्माण करा व
त्यासाठी शिक्षकांनी त्यांना मदत करावी असे प्रतिपादन केले. मातृभाषा सर्वांना यायला पाहीजे. ती जर चांगली आली तर जगातील कोणत्याही भाषेचे सहज आकलन होउ शकते असेही त्यांनी सांगीतले. गड, किल्ले यांचे संवर्धन करावे लागते तसे मराठी भाषेचे संवर्धन करण्याची वेळ आपल्यावर आली आहे असेही ते म्हणाले.

कार्यक्रमात आभार प्रदर्शन प्रा. सुर्यकांत कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. वि.वि. सर्वज्ञ, प्रा.स. मा. कंधारे, प्रा. अजय नंदलाल यादव, प्रा. सं. रा. मुधोळकर, श्री. शेख जावेद श्री. संतोष जगताप, श्री. आनंदा पावडे, श्रीमती रत्नपारखी, श्री. रमेश लहानकर यांनी परीश्रम घेतले.
0000
No comments:
Post a Comment