Wednesday, January 15, 2020

एंन्जेडर हेल्थ, कर्मा कार्यक्रमाचा गौरव समारंभ
नांदेड, दि. 16:- प्रसूती पश्च्यात कुटुंब नियोजन व गर्भपात पश्च्यात कुटुंब नियोजन सेवा गुणवत्तापूर्ण प्रदान करण्याकरिता तसेच राज्यांतर्गत आरोग्य संस्थांची क्षमता बांधणी करण्यासाठी एंन्जेडर हेल्थ ही संस्था व राज्य कुटुंबकल्याण कार्यालय पुणे यांच्या  द्वारे राज्यांतर्गत 20 जिल्ह्यामध्ये  कर्मा हा कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मा. सहसंचालक (माताबाल संगोपन व शालेय आरोग्य पुणे ) यांच्या सूचनेप्रमाणे हा कार्यक्रम संपूर्ण राज्यभर प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.  याचाच एक  एक भाग म्हणजे सन 2018-2019 या कालावधीत नांदेड व परभणी या जिल्ह्याने या कार्यक्रमांतर्गत  उत्कृष कार्य केलेले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड,  जिल्हा शल्य चिकित्सक परभणी,  व एंन्जेडर हेल्थ यांच्या संयुक्त विध्यमाने दि 10जानेवारी, 2020 रोजी  हॉटेल फर्न (परभणी) येथे कुटुंब नियोजन कार्यक्रमात उत्कृष्ट सेवा प्रदात्याचा गौरव समारंभ घेण्यात आला.
सदरील कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय माहूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय मोरे, अधिपरिचारिका श्रीमती छाया मुदळे यांचा गौरव करण्यात आला. तसेच ग्रामीण रुग्णालय  माहूर या संस्थेसही (IUCD) तांबी श्रेणीकरिता सन्मानित करणात आले. तसेच स्त्री रुग्णालय नांदेड या संस्थेस सर्वोत्कृष्ठ गर्भनिरोधक इंजेक्शन (अंतरा) ची सेवा, कुटुंब नियोजन, मार्गदर्शन सल्लाकेंद्र व तांबी श्रेणीमध्ये पुरस्कार देण्यात आला.
सदर कार्यक्रमाची नांदेड जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीलकंठ
भोसीकर व अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. संतोष सिरसीकर बाह्य संपर्क अधिकारी डॉ.अविनाश वाघमारे, डॉ एच के साखरेडॉ हनुमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
  स्त्री रुग्णालय नांदेड  येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगेवार व वैद्यकीय अधीक्षक माहूर डॉ भोसले यांच्या अधिनस्त संबंधित कार्यक्रमात  काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक उपसंचालक आरोग्य सेवा लातूर मा. डॉ माले यांनी केले आहे. यातून इतर आरोग्य संस्थांनी प्रेरणा घेऊन आपल्या संस्थेचे नाव उज्वल  करावे असे आवाहन केले आहे.  
सदर कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके, (परभणी) जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकर  देशमुख,  किशोर सुरवसे, (RCHO) डॉ. जी. के. सीरसुलवार, तसेच  कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते. सदरील कार्यक्रम उत्कृष्ट रित्या पार पडण्यासाठी एंन्जेडर हेल्थ या संस्थेचे प्रतिनिधी  एम कल्पना, व राहुल यांचे सहकार्य लाभले.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...