Wednesday, January 15, 2020


माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना
प्रोफाईल भरण्यास मुदतवाढ
नांदेड, दि. 15 :-काही माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची प्रोफाईल भरण्याबाबतची प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. प्रोफाईल भरण्याची लिंक सद्यस्थितीत बंद असल्याने अशा शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रोफाईल भरण्यासाठी पुन:श्च अंतिम 13 ते 25 जानेवारी 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
मान्यता प्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्यांनी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून वेळोवळी अद्ययावत माहिती प्राप्त करुन घेण्यासाठी प्रोफाईल भरण्याबाबत पुन:श्च 13 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली होती.
वाढीव कालावधीत ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची प्रोफाईल भरावयाचे राहिले आहे किंवा अपूर्ण राहिले आहे अथवा ज्यांना भरलेली माहिती त्यांना अवश्यक असल्यास दुरुस्ती करावयाची असल्यास समक्ष मंडळ कार्यालयात येऊन प्रोफाईल भरण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करावी. तसेच ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रोफाईल संपूर्ण भरलेले आहे त्याची हार्ड कॉपी मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्या स्वाक्षरीने प्रमाणीत करुन तात्काळ मंडळ कार्यालयास पाठविण्यात यावी, असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक   461 शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके यांची कमतरता भासू देऊ नका  : पालकमंत्री अतुल सावे                                  ...