Friday, July 14, 2023

 राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर

 

            मुंबई, दि. १४:  राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

            मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग .

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.

इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाण: 

छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण.

दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील सहकार.  

राधाकृष्ण विखे-पाटील  महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास.

सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार  वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय.

हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य.

चंद्रकांतदादा बच्चू पाटील उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य.

विजयकुमार कृष्णराव गावित  आदिवासी विकास.

गिरीष दत्तात्रय महाजन  ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन.

गुलाबराव पाटील  पाणीपुरवठा व स्वच्छता.

दादाजी दगडू भुसे  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम).

संजय दुलिचंद राठोड  मृद व जलसंधारण.

धनंजय पंडितराव मुंडे – कृषि.

सुरेशभाऊ दगडू खाडे  कामगार.

संदीपान आसाराम भुमरे रोजगार हमी योजना व फलोत्पादन.

उदय रवींद्र सामंत उद्योग.

प्रा.तानाजी जयवंत सावंत – सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण.

रवींद्र दत्तात्रय चव्हाण  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून).

अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास व औकाफपणन.

दीपक वसंतराव केसरकर – शालेय शिक्षण व  मराठी भाषा.

धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन.

अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माणइतर मागास व बहुजन कल्याण.

शंभूराज शिवाजीराव देसाई – राज्य उत्पादन शुल्क.

कु. अदिती सुनील तटकरे – महिला व बालविकास.

संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याणबंदरे.

मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकासउद्योजकता व नाविन्यता.

अनिल पाटील – मदत पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापन.

०००००

 चंद्रयान-3 च्या यशस्वी उड्डाणाने विष्णुपूरीतील विद्यार्थ्यांनी घेतले बळ ! 

  • जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी उड्डाणाचा अनुभवला वैज्ञानिक प्रवास 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- चंद्रयाण-3 च्या उड्डाणाची उलटगणती जशी सुरु झाली तशी विष्णुपूरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता व उत्कंठा यशस्वी उड्डाण होईपर्यंत शिगेला पोहचली होती. ज्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्टेशनवरुन चंद्रयान-3 अवकाशात झेपावले त्या लॉचिंग पॅड व इस्त्रो सेंटरला या शाळेतील दोन विद्यार्थिनींना प्रत्यक्ष शैक्षणिक सहली अंतर्गत भेट देण्याची संधी मिळालेली होती. यामुळे या शाळेतील इतर मुलांच्या मनातही चंद्रयान-३ बद्दल कमालीची उत्सुकता होती. केंद्र शासनाने हे उड्डाण विद्यार्थ्यापर्यंत पोहचावे व याला साक्षीदार होता यावे यासाठी थेट प्रक्षेपणाचा निर्णय घेतला. या थेट प्रक्षेपणाची दुहेरी अनुभुती विष्णुपूरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसह इतर शाळांनाही घेता आली. शाळेतील विद्यार्थ्यांना या उड्डाणाला साक्षीदार होता यावे यासाठी शाळेने हे थेट प्रक्षेपण मोठया स्क्रिनद्वारे विद्यार्थ्यांपर्यत पोहोचविले.

 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदतर्फे शालेय विद्यार्थ्यांना इस्त्रो केंद्राला भेट देता यावी यासाठी एक विशेष उपक्रम घेतला होता. जिल्ह्यातील 50 गुणवंत विद्यार्थ्यांची परिक्षेद्वारे निवड केली होती. इयत्ता 5 वी ते 8 वी या वर्गातील निवडक 50 विद्यार्थ्यांमध्ये 27 मुली व 23 मुले यांची निवड करण्यात आली. विष्णुपूरी येथील जिल्हा परिषद शाळेतील कु. सृष्टी सोनटक्के व अश्लेषा केंद्रे या दोन विद्यार्थीनी पात्र झाल्या. ही प्रत्यक्ष अनुभुती या विद्यार्थिनीसमवेत इतर मुलांनाही घेता यावी यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे यांनी चंद्रयान-3 च्या औचित्याने हे प्रक्षेपण शाळेत मुलांना दाखविण्याचे सूचित केले होते. त्यानुसार हा अभिनव उपक्रमांतर्गत राबविला गेला. यातून इतर मुलांच्या मनात विज्ञानाचा विश्वास निर्माण करण्यात यश आले.

 

नांदेड जिल्हा परिषदेने मागील परिक्षेद्वारे पात्र ठरलेल्या 50 विद्यार्थ्यांना मागील मे महिन्यात श्रीहरीकोटा येथील इस्त्रोच्या संशोधन केंद्राला भेट देण्याची संधी दिली होती. या भेटीमुळे वैज्ञानिक दृष्टीकोनातून हे केंद्र व आपल्या देशाचे संशोधन व प्रगती आम्हाला अनुभवता आली. ज्या केंद्राला आम्ही भेट दिली होती. प्रत्यक्ष पाहणी केली होती तेथून चंद्रयान-3 च्या यशस्वी उड्डाणामुळे आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासानेही अप्रत्यक्ष झेप घेतली आहे अशी प्रतिक्रिया या शाळेतील विद्यार्थीनी अश्लेषा केंद्रे व सृष्टी सोनटक्के या विद्यार्थीनीनी दिली.

00000







 दहावीबारावी परीक्षा केंद्र

परिसरात 144 कलम  

 

नांदेड, (जिमाका) दि. 14 :-  जिल्ह्यात इयत्ता 10 वी व 12 वीची परीक्षा विविध केंद्रावर 18 जुलै 2023 पासून सुरू होत आहे. तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (दहावी) 10 केंद्रावर व इयत्ता 12 वी परीक्षा 9 केंद्रावर सुरु होणार आहे. ही परीक्षा 8 ऑगस्ट 2023 पर्यत सुरू राहणार आहे.  या कालावधीत (सुटीचे दिवस वगळून) परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी याव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स/ एस.टी.डी/ आय.एस.डी/भ्रमणध्वनी/फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निर्गमित केला आहे.

000000

 अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी साखर  नियतन 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी शासनाने जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर 2023 या तीन महिन्यासाठी प्रतिमाह एक किलो साखर नियतन सुलभ पॅकींगमध्ये मंजूर केले आहे. 

 

या तीन महिन्यासाठी शासनाकडून 2 हजार 152 क्विंटल साखर प्राप्त झाली आहे. पुढीलप्रमाणे तालुकानिहाय साखर नियतन देण्यात आले आहे. यात नांदेड तालुक्यासाठी 180, अर्धापूर 33, मुदखेड 36, कंधार 51.50, लोहा 147.50, भोकर 67.50, उमरी 46, देगलूर 108.50, बिलोली 115, नायगाव 115.50, धर्माबाद 64, मुखेड 202.50, किनवट 468.50, माहुर 212, हदगाव 206.50, हिमायतनगर 98  असे एकूण 2 हजार 152  नियतन साखर नांदेड जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. सर्व अंत्योदय लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानातून वरील तीन महिण्याच्या साखरेची उचल करावीअसे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

000000

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास

महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळनांदेड कार्यालयाच्यावतीने सन 2023- 24 या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज योजना राबविली जात आहे. जिल्ह्यातील मांग/मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील तसेच मांतग समाजातील राज्य स्तरावरील क्रीडा पुरस्कार प्राप्त (महिला व पुरुष) व्यक्तींना व सैन्यदलातील विरगती प्राप्त वारसाच्या एका सदस्यास प्राधान्याने लाभ देण्यासाठी इच्छूक अर्जदाराकडून थेट कर्ज योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज महामंडळाच्या कार्यालयात 10 ऑगस्ट 2023  पर्यत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत सादर करावेत. विहित मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीतअसे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

 

थेट कर्ज योजनेसाठी भौतिक उदिष्टे लाभार्थी संख्या 90 असून आर्थिक उदिष्टे 90 लाख रुपये आहे. जिल्ह्यातील मांग/मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील इच्छूक अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे. 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. शहरी व ग्रामीण अर्जदाराच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न लाखापेक्षा जास्त नसावे. अर्जदाराने या पूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. नियमाप्रमाणे आवश्यक कागदपत्राची पूर्तता करुन या योजनेत साधारणपणे समाविष्ट विविध लघु व्यवसाय उदा. मोबाईल सर्व्हिसिंग रिपेरिंग, इलेक्ट्रोशियन, इलेक्ट्रॉनिक वस्तु रिपेअरिंग (फ्रीज, एसी, टिव्ही, मायक्रोवेव्ह, लॅपटॉप, कॉम्पुटर) हार्डवेअर, ब्युटीपार्लर, ड्रेस डिजायनिंग, टेलरिंग, फुड प्रोडक्ट प्रोसेसिंग, किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, मेडीकल स्टोअर्स, फॅब्रीकेशन/वेल्डीग, हार्डवेअर व सेनेटरी शॉप, प्रिंटीग, शिवणकला, झेरॉक्स/लॅमिनेशन, हॉटेल, कॅटरिंग, सर्विसेस, मंडप डेकोरेशन क्रिडा साहित्य/स्पोर्ट शेप, ज्यूस सेंटर, क्लॉथ/रेडीमेट गारमेन्ट शॉप, मोटार मेकॅनिक रिपेअर व शेतीशी निगडीत पुरक/जोड व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत स्वत: अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहुन दाखल करावेत. त्रयस्त/मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत यांची नोंद घ्यावीअसे महामंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

 

कर्ज प्रकरणासोबत जोडावयाची कागदपत्रे याप्रमाणे आहेत. जातीची दाखलाउत्पन्नाचा दाखला रेशनकार्डची झेरॉक्स प्रतआधार कार्डपॅन कार्डची झेरॉक्स प्रततीन पासपोर्ट फोटोव्यवसायाचे परपत्रक (कोटेशन)व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या ठिकाणची भाडे पावतीकरारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावानमुना नं आठलाईट बिल व टॅक्स पावतीग्रामपंचायत/नगरपालिका/महानगर पालीका यांचे प्रमाणपत्र किंवा शॅाप ॲक्ट परवानाव्यवसाय संबधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखलाशैक्षणीक दाखलाअनुदान किंवा कर्जाचा लाभ न घेतलेले प्रमाणपत्रअर्जदाराचे सीबील क्रेडिट स्कोअर 500 असावाअर्जदाराने आधार कार्ड जोडलेल्या बॅक खात्याचा तपशील सादर करावाप्रकल्प अहवालप्रकरणासोबतची सर्व कागदपत्रे स्वता:च्या स्वाक्षरीने साक्षांकीत करावीएका कुटूंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. थेट कर्ज योजनेचे प्रस्ताव साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनग्यानमाता शाळेच्या समोरहिंगोली रोडनांदेड या ठिकाणी स्विकारले जातील.

0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...