शस्त्र परवाना नुतनीकरणाचे
आवाहन
नांदेड, दि. 28 :- जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी
कार्यालय नांदेड यांचेमार्फत निर्गमीत शस्त्र परवाने ज्याची मुदत 31 डिसेंबर 2018
रोजी संपुष्टात येत आहे, अशा शस्त्र परवानाधारकांनी त्यांचा शस्त्र परवाना
पुढील कालावधीसाठी नुतनीकरण करुन घ्यावा, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी
प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
परवानाधारकाने 1 ते 31 डिसेंबर 2018 या
कालावधीत आपला शस्त्र परवाना नुतनीकरण करुन घेण्यासाठी नुतनिकरण शुल्क (चलनाने) शासनास जमा करावी. आपले शस्त्र परवान्यातील असलेले अग्निशस्त्राची
पडताळणी या कार्यालयात करुन विहित नमुन्यातील अर्ज, जन्म तारखेचा पुरावा, पॅन
कार्ड, आधार कार्ड, एक पासपोर्ट फोटो व मुळ शस्त्र परवाना सेतू समिती जिल्हाधिकारी
तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय नांदेड येथे दाखल करावा.
तसेच केंद्र शासनाचे निर्देशानुसार National Data
Base (NDAL) च्या
संकेतस्थळावर शस्त्र परवानाधारकाची
माहिती अपलोड करण्यात आली असून अशा शस्त्र परवानाधारकांना युआयएन नंबर देण्यात
आला आहे. ज्या शस्त्र परवानाधारकांनी या कार्यालयाकडून युआयएन
नंबर प्राप्त करुन घेतला नाही त्यांचा शस्त्र परवाना दिनांक 1 एप्रिल 2019 नंतर
अवैध समजण्यात येणार आहे, असे केंद्र शासनाचे निर्देश आहेत. संबंधीतांनी याची नोंद
घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000