Wednesday, November 6, 2024

महत्वाचे / संदर्भासाठी 

विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारांनी भरलेल्या अर्जातील संपत्ती, गुन्हे, स्थावर मालमत्ता संदर्भातील प्रतिज्ञापत्रातील माहिती मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या संकेत स्थळावर जाऊन पाहता येणार आहे. त्याकरीता लिंक सोबत जोडली आहे.कृपया या लिंकचा वापर करा.

https://affidavit.eci.gov.in/CandidateCustomFilter?_token=lQ9MdCQ4KQTgpE4Mc3evuOR6ziN6fdPxs5ld1IoW&electionType=27-AC-GENERAL-3-51&election=27-AC-GENERAL-3-51&states=S13&phase=3&constId=85&page=2

 वृत्त क्र. 1040

मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद

 
नांदेड दि. 6 नोव्हेंबर : लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्‍या दिवशी बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्‍ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्‍याचे आदेश मार्केट अॅंड फेअर अॅक्‍ट 1862 चे कलम 5 अन्‍वये जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा‍दंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत.

लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नांदेड जिल्‍ह्यातील 83-किनवट, 84-हदगाव, 85-भोकर, 86-नांदेड उत्‍तर, 87-नांदेड दक्षिण, 88-लोहा, 89-नायगाव, 90-देगलूर व 91 – मुखेड या नऊ विधानसभा मतदार संघात बुधवार 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. त्‍याअनुषंगाने पणन संचालक, महाराष्‍ट्र राज्‍य, पुणे यांनी मतदान व मतमोजणी दिनांकास जिल्‍ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्‍यास आदेशित केले आहे.
 
बुधवार 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार भरणाऱ्या गावांची ठिकाणाची नावे पुढीलप्रमाणे आहेत. तालुका हदगाव-मनाठा, किनवट-माळ बोरगाव, मांडवी,  माहूर-मौ.दहेगाव, अर्धापूर-कामठा, धर्माबाद-निरंक, नायगाव-सोमठाणा, देगलूर-शहापूर, मरखेल, बिलोली-सगरोळी, मुखेड-जाहुर, दापका गु. , सावरगाव पिर, नांदेड- मौ. वाडी अंतर्गत छत्रपती चौक ते डी मार्टपर्यत , मौ. तरोडा बु. व खु (तरोडा नाका), मुदखेड-निरंक, भोकर-निरंक, हिमायतनगर-हिमायतनगर शहर, उमरी-निरंक, लोहा-सोनखेड, उमरा, कंधार-मौ. बारुळ  या ठिकाणची आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्‍हणजे गुरुवार 21 नोव्हेंबर 2024 रोजी भरविण्‍यात यावेत. तसेच मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी परिसरात आठवडी बाजार भरत असल्यास याच आदेशान्वये ते बंद करण्यात येत असून हे आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी भरविण्यात यावेत असे आदेश निर्गमित केले आहे.
००००

 वृत्त क्र. 1038

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 2 लाख 74 रुपयांचे मद्य जप्त 

नांदेड जिल्हयाच्या दलाकडून 10 धडक कारवाई

नांदेड, दि. 6 नोव्हेंबर : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहितेमध्ये अवैध मद्य जप्त करण्याची धडक कारवाई नांदेड जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. 5 नोव्हेंबर रोजी विभागाने 10 ठिकाणी धाडी टाकून एकूण 2 लाख 74 हजार 720 रुपयांच्या मुद्येमालाची दारू जप्त केल्याची माहिती नांदेडचे राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील यांनी दिली आहे.

5 नोव्हेंबर रोजी झालेल्या कारवाईमध्ये विविध ठिकाणी एकुण 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. हस्तगत करण्यात आलेल्या जानमालामध्ये एकूण 10 गुन्हे, वारस 10, अटक आरोपी 10, देशी मद्य 43.38 लीटर, विदेशी मद्य 14.04 लि.बिअर 03.30 ली, हातभट्टी 20 ली, जप्तवाहन संख्या 02  लिटर रसायनाची जप्त असून  सर्व मुद्येमाल 2 लाख 74 हजार 720 रुपयांचा आहे.

जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे पार पाडावी यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागास दक्ष राहण्याचे व आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश दिले आहेत. त्यानंतर जिल्ह्यामध्ये विभागामार्फत धाडी टाकण्याचे सत्र सुरू आहे. निवडणूक काळामध्ये यामध्ये अधिक वाढ करण्यात आली असून अवैध दारू विक्रीवर विभागाची काटेकोर नजर आहे.  

जिल्ह्यात आचारसंहिता लागू असून या काळामध्ये कोणीही अवैध मद्य खरेदी करू नये. तसेच स्वत:जवळ बाळगू नये, असे आवाहन विभागाने केले आहे. मद्याचा गैरवापर निवडणूक काळात होत असल्यास या संदर्भात विभागाला नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 1800 233 9999 व व्हॉटसॲप क्र. 8422001133 यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या कारवाईमध्ये अधिक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नमाला गायकवाड, जावेद कुरेशी, अशिष महिंद्रकर, सरकाळे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

0000 

मराठवाडा महत्वाचे वृत्त / आज आवश्यक












  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...