Wednesday, November 6, 2024

 वृत्त क्र. 1040

मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद

 
नांदेड दि. 6 नोव्हेंबर : लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्‍या दिवशी बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्‍ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्‍याचे आदेश मार्केट अॅंड फेअर अॅक्‍ट 1862 चे कलम 5 अन्‍वये जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा‍दंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत.

लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नांदेड जिल्‍ह्यातील 83-किनवट, 84-हदगाव, 85-भोकर, 86-नांदेड उत्‍तर, 87-नांदेड दक्षिण, 88-लोहा, 89-नायगाव, 90-देगलूर व 91 – मुखेड या नऊ विधानसभा मतदार संघात बुधवार 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. त्‍याअनुषंगाने पणन संचालक, महाराष्‍ट्र राज्‍य, पुणे यांनी मतदान व मतमोजणी दिनांकास जिल्‍ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्‍यास आदेशित केले आहे.
 
बुधवार 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार भरणाऱ्या गावांची ठिकाणाची नावे पुढीलप्रमाणे आहेत. तालुका हदगाव-मनाठा, किनवट-माळ बोरगाव, मांडवी,  माहूर-मौ.दहेगाव, अर्धापूर-कामठा, धर्माबाद-निरंक, नायगाव-सोमठाणा, देगलूर-शहापूर, मरखेल, बिलोली-सगरोळी, मुखेड-जाहुर, दापका गु. , सावरगाव पिर, नांदेड- मौ. वाडी अंतर्गत छत्रपती चौक ते डी मार्टपर्यत , मौ. तरोडा बु. व खु (तरोडा नाका), मुदखेड-निरंक, भोकर-निरंक, हिमायतनगर-हिमायतनगर शहर, उमरी-निरंक, लोहा-सोनखेड, उमरा, कंधार-मौ. बारुळ  या ठिकाणची आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्‍हणजे गुरुवार 21 नोव्हेंबर 2024 रोजी भरविण्‍यात यावेत. तसेच मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी परिसरात आठवडी बाजार भरत असल्यास याच आदेशान्वये ते बंद करण्यात येत असून हे आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी भरविण्यात यावेत असे आदेश निर्गमित केले आहे.
००००

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...