वृत्त क्र. 1039
मतदार जनजागृतीसाठी सेल्फी पॉईटचे उद्घाटन
नांदेड दि. 6 नोव्हेंबर : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व रुग्ण सेवा मंडळ सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा मुख्यालयाच्या बाजुला रुग्ण सेवा मंडळ सार्वजनिक वाचनालयात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या सहयोगाने मतदार जनजागृतीसाठी सेल्फी पॉइंटचे उद्गाटन मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
“मतदाराला प्रोत्साहन म्हणून मतदानाच्या बोटाची शाई दाखवा आणि मोफत डोळे तपासणी करून घ्या” असा उपक्रम आयोजित केला आहे. यावेळी मोठया प्रमाणात मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. आज वाचनालयाच्या वतीने बाह्यरुग्ण विभागात व लसीकरण केंद्रात रुग्णाला दिल्या जाणाऱ्या पावती व औषधाच्या कागदावर मी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मी मतदान करणार तुम्ही पण करा असा एक शिक्का देण्यात येत आहे.
याप्रसंगी नांदेड महानगर पालिका उपायुक्त अजितपाल सिंग संधू, शिक्षण अधिकारी व्यंकटेश चौधरी , जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी एस एम पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एच के साखरे, स्वीप 86 नांदेड़ उत्तरचे संभाजी पोकले व सुनिल मुत्तेपवार व रुग्ण सेवा मंडळाचे सहसचिव प्रा. डॉ. बालाजी कतूरवार यांच्यासह वाचक, रुग्ण व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment