Thursday, January 4, 2018

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2017
भाग घेण्याचे आवाहन
       
नांदेड, दि. 4 :- राज्य शासनाच्या माहिती जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, सोशल मीडिया पुरस्कार, स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. 2017 या कॅलेंडर वर्षा करीता दि. 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 पर्यंतच्या कालावधीसाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2018 अशी आहे. या स्पर्धेचे माहिती पत्रक, अर्जाचे नमुने www.maharashtra.gov.in, www.dgipr.maharashtra.gov.in  तसेच www.mahanews.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
            तरी वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार, छायाचित्रकार यांनी मोठ्या संख्येने  या स्पर्धेत भाग घ्यावा. लातूर विभागातील लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात संबंधितांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत, असे आवाहन यशवंत भंडारे, उपसंचालक (माहिती), लातूर विभाग, लातूर यांनी केले आहे.

00000
बेरोजगारांसाठी
बुधवारी भरती मेळावा
नांदेड, दि. 4 :- जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्यावतीने बुधवार 10 जानेवारी 2018 रोजी महात्मा फुले मंगल कार्यालय फुले मार्केट आयटीआय जवळ नांदेड येथे सकाळी 11 वा. रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छूक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक संचालक उल्हास सकवान यांनी केले आहे.
या मेळाव्यात नामांकित कंपनीचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सेल्स ऑफिसर, हेल्पर, सुरक्षा गार्ड, आयटीआय ट्रेनी, प्रोडक्शन ट्रेनी या पदाची संख्या अंदाजे 290 असून किमान शैक्षणीक पात्रता दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे. वेतन 4 ते 12 हजार रुपये राहील. वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी www.mahaswayam.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन एन्ट्री पास करुन घेणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र 02462-251674 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असेही निवेदनात नमूद केले आहे.

000000
जिल्हा ग्रंथालय कार्यालयात
सावित्रीबाई फुले जयंती साजरी
नांदेड, दि. 4 :- येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्त ग्रंथप्रदर्शन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे ग्रंथपाल      प्रा. राजीव वाघमारे, प्रताप सुर्यंवशी ता.सं. संजय कर्वे, कोंडीबा गाडेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थावरुन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री हुसे यांनी सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्त्री-शिक्षणासाठी दाखविलेले धाडस, सहनशक्ती अत्यंत प्रेरणादायी असून समाजहितासाठी त्यांनी संपूर्ण जीवन वाहुन घेतल्याचे नमूद करुन सावित्रीबाई नसत्या तर आजची स्त्री शिक्षित होऊन स्वत:चे अस्तित्व निर्माण करु शकली नसती असे सांगीतले.
यावेळी आशा देशमुख, सुक्ष्मा मुंगल, ऐश्वर्या धूत, आनंद मोरे, सुनील सोलनकर, नितीन कसबे, गणेश कदम, अरविंद बलीन या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले याच्या चारित्र कार्यविषयीची माहिती सादर केली. संगीता राठोड यांनी स्त्रीचे महत्व यावर सुंदर गीत सादर केले. प्रमुख अतिथी  प्रा. राजीव वाघमारे यांनी सावित्रीबाई फुले याच्या जीवनातील महत्वाच्या घटना मांडून स्त्री-सक्षमी करणासाठी सावित्रीबाईचे योगदान अविस्मणीय राहील असे सांगीतले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रताप सुर्यंवशी यांनी केले.  ुत्रसंचलन देवकी मुंगल यांनी तर आभार कोंडीबा गाडेवाड यांनी मानले.

00000
हमी भावाने तूर खरेदीसाठी
शेतकऱ्यांनी नोंदणी करावी
नांदेड, दि. 4 :- केंद्र शासनाचे आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हमीभावाने नाफेडच्यावतीने हंगाम सन 2017-18 मध्ये तूर खरेदी करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावयाची आहे. शेतकरी बांधवांनी ऑनलाईन तूर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी सात / बाराचा उतारा पिक पेऱ्याची नोंद असलेला, आधार कार्डची झेरॉक्स प्रत व बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत सोबत आणावी. खरेदी ऑनलाईन नोंदणी जिल्ह्यातील बिलोली, धर्माबाद, देगलर, भोकर, हदगाव, मुखेड, अर्धापूर, लोहा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात संबंधीत तालुका खरेदी विक्री संघाकडे केंद्राच्या‍ ठिकाणी सुरु आहे. तसेच किनवट व नायगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे केंद्राच्या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी सुरु आहे, असेही आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी नांदेड केले आहे.   

000000
प्रलंबीत शिष्यवृत्तीसाठी
समाज कल्याणचे आवाहन
नांदेड, दि. 4 :- विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती / शिक्षण फी परीक्षा फी, निर्वाह भत्ता, विद्यावेतन आदी लाभ देण्याचे प्रलंबीत असल्याने ई-स्कॉलरशीप हे संकेतस्थळ मर्यादीत कालावधीसाठी सुरु आहे. जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ तसेच व्यावसायिक महाविद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांचे प्रलंबीत व नुतनीकरण प्रस्ताव त्वरीत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्या लॉगीनवर पाठवून त्याची हार्ड कॉपी सादर करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे. प्रलंबीत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अदा करणे ही संबंधीत महाविद्यालयाच्या प्राचार्यांची जबाबदारी राहील, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

00000
हरभरा पिकाचा कृषि संदेश
नांदेड, दि. 4 :-  हरभरा पिकावरील घाटेअळीच्या नियंत्रणासाठी क्लोरॅनट्रनिलप्रोल 18.5 एस.सी. 2.5 मिली प्रति 10 लिटर पाणी, फवारणी करावी किंवा एनएसई 5 टक्के फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.
कृषि उपविभागातील नांदेड, मुदखेड, अर्धापूर, लोहा व कंधार या 5 तालुक्यात हरभरा पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांना हरभरा पिकावरील किडीपासून संरक्षणासाठी हा कृषि संदेश दिला आहे.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...