जिल्हा ग्रंथालय कार्यालयात
सावित्रीबाई फुले जयंती साजरी
नांदेड, दि. 4 :- येथील जिल्हा
ग्रंथालय अधिकारी कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
जयंतीच्या निमित्त ग्रंथप्रदर्शन व अभिवादन
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
होते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल
हुसे यांच्या
अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास
नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. राजीव वाघमारे, प्रताप
सुर्यंवशी ता.सं. संजय कर्वे, कोंडीबा
गाडेवाड यांची प्रमुख उपस्थिती
होती.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थावरुन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री
हुसे यांनी सावित्रीबाई फुले
यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्त्री-शिक्षणासाठी दाखविलेले धाडस, सहनशक्ती
अत्यंत प्रेरणादायी असून
समाजहितासाठी त्यांनी संपूर्ण जीवन वाहुन घेतल्याचे
नमूद करुन सावित्रीबाई नसत्या
तर आजची स्त्री शिक्षित
होऊन स्वत:चे अस्तित्व
निर्माण करु शकली नसती
असे सांगीतले.
यावेळी आशा
देशमुख, सुक्ष्मा मुंगल, ऐश्वर्या धूत, आनंद
मोरे, सुनील सोलनकर, नितीन कसबे, गणेश
कदम,
अरविंद बलीन या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले
यांच्या चारित्र
व कार्यविषयीची माहिती सादर केली. संगीता
राठोड यांनी स्त्रीचे महत्व
यावर सुंदर गीत सादर
केले. प्रमुख अतिथी प्रा. राजीव वाघमारे
यांनी सावित्रीबाई फुले
यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना मांडून
स्त्री-सक्षमी करणासाठी सावित्रीबाईचे योगदान
अविस्मणीय राहील असे सांगीतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
प्रताप सुर्यंवशी यांनी केले. सुत्रसंचलन देवकी मुंगल यांनी तर आभार
कोंडीबा गाडेवाड यांनी मानले.
00000
No comments:
Post a Comment