Saturday, November 23, 2024

 वृत्त क्र. 1133

नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत 

भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी 

नांदेड, दि. 23 नोव्हेंबर :-  नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभेचे निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत आलेल्या निकालानुसार किनवट येथून भाजपचे भिमराव केराम, हदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे बाबुराव कदम कोहळीकर, भोकर विधानसभेतून भाजपाच्या श्रीजया अशोकराव चव्हाण, नांदेड उत्तरमधून शिवसेनेचे बालाजी कल्याणकर, नांदेड दक्षिणमधून शिवसेनेचे आनंद तिडके, लोहा विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतापराव पाटील चिखलीकर, नायगाव मतदारसंघातून भाजपचे राजेश पवार, देगलूरमधून भाजपचे जितेश अंतापूरकर तर मुखेड विधानसभा मतदारसंघातून डॉ. तुषार राठोड हे विजयी झाले आहेत. 

नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ विधानसभांपैकी भारतीय जनता पार्टीला 5 जागा, शिवसेना 3, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 1 अशा एकुण 9 जागा निवडून आल्या आहेत. तर विधानसभेसोबतच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रविंद्र चव्हाण विजयी झाले आहेत आज झालेल्या विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहे. 

83-किनवट विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार भिमराव रामजी केराम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे जाधव प्रदीप नाईक यांचा 5636 एवढ्या मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये भिमराव रामजी केराम यांना 92856 मते मिळाली तर जाधव प्रदीप नाईक यांना 87220 मते मिळाली आहेत. यामध्ये उमेदवार जाधव सचिन माधवराव (नाईक) यांना 5511 तीसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर चौथ्या क्रमांकावर अशोक संभाजीराव ढोले यांना 5311 मते मिळाली आहे. 

84-हदगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांचा 30067 एवढ्या मतांनी पराभव केला आहे.

या निवडणुकीमध्ये बाबुराव कदम कोहळीकर यांना 113245 मते मिळाली तर माधवराव पाटील जवळगावकर यांना 83178 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप आला राठोड यांना 11409 तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार देवसरकर माधव दादाराव यांना 1276 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. 


85-भोकर विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिरूपती उर्फ पप्पु बाबुराव कदम कोंढेकर यांचा 50551 एवढ्या मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये श्रीजया अशोकराव चव्हाण यांना 133187 मते मिळाली तर तिरूपती उर्फ पप्पु बाबुराव कदम कोंढेकर यांना 82636 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश टिकाराम राठोड यांना 8872 तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर बहुजन समाज पार्टीचे कमलेशकुमार पांडूरंगराव चौदंते यांना 1664 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. 


86-नांदेड उत्तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अब्दुल सत्तार अ गफुर यांचा 3502 एवढ्या मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये बालाजी कल्याणकर यांना 83184 मते मिळाली तर अब्दुल सत्तार अ गफुर यांना 79682 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत विराज इंगोले यांना 24266 तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगीता विठ्ठल पाटील  यांना 22706 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. 

87-नांदेड दक्षिण विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार आनंद शंकर तिडके यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मोहनराव हंबर्डे यांचा 2132 एवढ्या मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये आनंद शंकर तिडके यांना 60445 मते मिळाली तर मोहनराव हंबर्डे यांना 58313 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारुक अहमद यांना 33841 तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर दिलीप कंदकुर्ते  यांना 17170 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. 

88-लोहा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे एकनाथ रावसाहेब पवार यांचा 10973 एवढ्या मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर यांना 72750 मते मिळाली तर एकनाथ रावसाहेब पवार यांना 61777 मते मिळाली आहेत. जनहित लोकशाही पार्टीचे उमेदवार चंद्रसेन ईश्वरराव पाटील (सुरनर) यांना 29194  तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर प्रा. मनोहर बाबाराव धोंडे यांना 20302 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. 

89-नायगाव विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे राजेश संभाजीराव पवार यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार डॉ. मीनल पाटील खतगावकर यांचा 47629 एवढ्या मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये राजेश संभाजीराव पवार यांना 129192 मते मिळाली तर डॉ. मीनल पाटील खतगावकर यांना 81563 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. माधव संभाजीराव विभुते यांना 16043  तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर प्रहर जनशक्ती पार्टी गजानन शंकरराव चव्हाण यांना 2144 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.


90-देगलूर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जितेश रावसाहेब अंतापूरकर यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार निवृत्ती कोंडीबा कांबळे सांगवीकर यांचा 42999 एवढ्या मतांनी पराभव केला आहे.

या निवडणुकीमध्ये जितेश रावसाहेब अंतापूरकर यांना 107841 मते मिळाली तर निवृत्ती कोंडीबा कांबळे सांगवीकर यांना 64842 मते मिळाली आहेत. प्रहर जनशक्ती पक्षाचे उमेदवार साबणे सुभाष पिराजीराव यांना 15919  तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देगलुरकर सुशिलकुमार विठ्ठलराव यांना 5403 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.

91-मुखेड विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे तुषार राठोड यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचा 37784 एवढ्या मतांनी पराभव केला आहे.

या निवडणुकीमध्ये तुषार राठोड यांना 98213 मते मिळाली तर हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांना 60429 मते मिळाली आहेत. बालाजी नामदेव खतगावकर यांना 48235  तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रावसाहेब दिगांबरराव पाटिल यांना 4700 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.

00000















 भोकर विधानसभा क्षेत्रातून भाजपाच्या उमेदवार श्रीजया अशोकराव चव्हाण या विजयी झाल्यात. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. प्रवीण मेगशेट्टी यांनी त्यांना प्रमाणपत्र बहाल केले.



नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार आनंद शंकर तिडके ( बोंढारकर ) विजयी झाले. नांदेड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी त्यांना प्रमाणपत्र दिले.



नांदेड जिल्हयातील 9O-देगलूर विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार जितेश अंतापूरकर यांना प्रमाणपत्र देताना निवडणूक निर्णय अधिकारी क्रांती डोंबे.




 

नांदेड जिल्हयातील ९१-मुखेड मतदार संघातून भाजपचे आमदार तुषार गोविंदराव राठोड यांना विजयी घोषित करण्यात आले.यापूर्वीही या ठिकाणावरून ते आमदार होते. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी हनमंतराव व्यंकटराव पाटील यांचा पराभव केला.

नांदेड जिल्हयातील 83 किनवट मतदार संघातून भाजपचे आमदार भीमराव केराम यांना विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना(भाप्रसे) यांचे हस्ते प्रमाण पत्र देण्यात आले. भीमराव रामजी केराम यापूर्वीही या ठिकाणावरून आमदार होते.

लक्षवेध : निकाल २ : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे बालाजी देविदासराव कल्याणकर यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. त्यांनी आपल्या निकटचे प्रतिस्पर्धी अब्दुल सत्तार अब्दुल गफूर यांचा पराभव केला आहे. बालाजी #कल्याणकर यापूर्वीही याच मतदारसंघातून निवडून आले होते.

 वृत्त क्र. 1132

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत

काँग्रेसचे उमेदवार रविंद्र चव्हाण विजयी
 
नांदेड, दि. 23 नोव्हेंबर :- नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. संतुकराव मारोतराव हंबर्डे यांचा 1457 मतांनी पराभव केला आहे. सहा महिन्यापूर्वी काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यांचे चिरंजीव रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी चुरशीच्या लढतीत ही जागा कायम ठेवली आहे.  
 
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पोटनिवडणुकीमध्ये केरळमधील वायनाड व महाराष्ट्रातील नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. 25 वर्षानंतर नांदेड येथे एकाचवेळी लोकसभा व विधानसभा निवडणुका झाल्यात. त्यामुळे या निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान झाले. गेल्यावेळी 61 टक्के मतदान झालेल्या लोकसभेमध्ये पोटनिवडणुकीत 67.81 टक्के मतदान झाले. शेवटच्या काही फेऱ्यामध्ये त्यांनी मताधिक्य मिळवत ही जागा काँग्रेसकडे कायम ठेवली. रविंद्र चव्हाण यांना 5 लाख 86 हजार 788 मते मिळाली तर डॉ. संतुकराव हंबर्डे यांना 5 लाख 85 हजार 331 मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर  वंचित बहुजन आघाडीचे अविनाश विश्वनाथ भोसीकर यांना 80 हजार 179 मते मिळाली.
 
फेरमतमोजणी नाही
दरम्यान पहिल्या फेरीपासून अटीतटीच्या ठरलेल्या या निवडणुकीत इव्हिएमच्या मतासोबतच पोस्टल मतेही निर्णायक ठरली. या पोटनिवडणुकीची फेरमतमोजणी झाल्याची बाहेर चर्चा होती मात्र कुठलीही फेरमतमोजणी झाली नसल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले. ईव्हीएमच्या 27 फेऱ्या व पोस्टल मतांची मोजणी याद्वारे पुर्णता पारदर्शक पद्धतीने मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करून निकाला जाहीर करण्यात आला. या प्रक्रियेवर निवडणूक आयोगाने नेमलेल्या दोन वरिष्ठ निवडणूक निरीक्षकांचे सनियंत्रण होते. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अधिकृत फेरीनिहाय मिळालेल्या मतांची संख्या घोषित करण्यापूर्वी उमेदवारांचे प्रतिनिधींनी त्यांच्याकडील अधिकृत नसलेली आकडेवारी बाहेर सांगितली. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला. मात्र पारदर्शी पद्धतीने पूर्ण कार्यवाही करण्यात आल्याचे प्रशसनाने स्पष्ट केले.
 
जिल्हाधिकाऱ्यांकडून यंत्रणेचे
व मतदारांचे आभार

दरम्यान जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी गेल्या दिड महिन्यांपासून सुरू असलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये यावर्षी मोठ्यासंख्येने नागरिकांनी केलेल्या मतदानाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. तसेच जिल्ह्यामध्ये लोकसभेसोबतच नऊ विधानसभा निवडणूक पार पडली. शांततेत ही सगळी प्रक्रिया पार पडली असून त्यासाठी सहकारी अधिकारी, पोलीस प्रशासन,राज्य व केंद्र शासनाचे कर्मचारी तसेच माध्यम प्रतिनिधी, स्वीप सारख्या विविध उपक्रमात सहभागी झालेल्या स्वयंसेवी संस्था व सर्वक्षेत्रातील मान्यवरांचे आभार व्यक्त केले आहे.
000




निवडणुकीच्या लगबगीत माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला.जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे नांदेड लोकसभापोटनिवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी देखील आहेत. 







 

 






  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...