अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पोस्टमॅट्रिक शिष्यवृत्ती
ऑनलाईन अर्ज करण्याची 30 सप्टेंबर मुदत
नांदेड, दि. 18 :- नांदेड, लातूर, परभणी व
हिंगोली जिल्ह्यातील महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पसंख्याक
समाजातील विद्यार्थ्यांना पोस्टमॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सन 2018-19 साठी ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबर 2018 पर्यंत मुदत आहे. पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावीत,
असे आवाहन नांदेड विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक यांनी केले आहे.
शासकीय,
अशासकीय, कनिष्ठ, वरिष्ठ, कला, वाणिज्य, विज्ञान अनुदानीत, विनाअनुदानीत, कायम
विनाअनुदानीत महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालय तसेच व्यवसायिक महाविद्यालयातील
मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, पारसी व जैन या समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र
सरकार शंभर टक्के पुरस्कृत ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. नवीन मंजूरी व
नुतनीकरणासाठी अर्ज विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने मुदतीत करावेत. संबंधीत महाविद्यालयाचे
प्राचार्य व संस्थाप्रमुखांनी महाविद्यालयातील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत, असेही आवाहन नांदेड विभागाचे उच्च
शिक्षण सहसंचालक यांनी केले आहे.
000000