प्रधानमंत्री पीक विमा योजना
Thursday, May 8, 2025
वृत्त क्रमांक 486
40 वर्ष रखडलेल्या लेंडी धरणाच्या गळभरणी कामाला अखेर सुरुवात
· प्रकल्पग्रस्तांशी सुसंवाद ; विरोध न होता कामास प्रारंभ
· 26 हजार हेक्टर येणार पाण्याखाली ; 30 हजार शेतकऱ्यांना फायदा
· मुखेड-देगलूर तालुक्याताील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार
नांदेड, दि. 8 मे :- मागील 40 वर्षापासुन रखडलेल्या लेंडी प्रकल्पाची अखेर आज 8 मे रोजी गळभरणी कामाला सुरुवात करण्यात आली. या लेंडी प्रकल्पात 12 गावे समाविष्ट असुन पहिल्या टप्प्यात रावणगाव, भाटापुर, हसनाळ, मारजवाडी, भिंगोली व भेंडेगाव खु. असुन दुसऱ्या टप्यात वळंकी, कोळनुर, भेंडेगाव बु, ईटग्याळ व मुक्रमाबाद ही गावे येतात.
यावेळी आमदार तुषार राठोड, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलिस अधिक्षक अबिनाशकुमार, अतिरिक्त पोलिस अधिक्षक सुरज गुरव, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसिलदार राजेश जाधव, पोलिस उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी, सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके, लेंडी अधिक्षक अभियंता दाभाडे व लेंडी कार्यकारी अभियंता तिडके यांच्या प्रमुख उपस्थितीत गळभरणी कामाला सुरुवात झाली.
मागील दोन महिण्यापासुन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसिलदार राजेश जाधव, कार्यकारी अभियंता तिडके यांनी लेंडी प्रकल्पग्रस्तासंबंधी प्रशासन स्तरावर व गावागावात जाऊन लेंडी प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करीत होते. तर काही अर्ज निकाली सुध्दा काढण्यात आले. तसेच आमदार डॉ. तुषार राठोड यांनी सरकार स्तरावर वेळोवळी पाठपुरावा करुन प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याने प्रशासनाने अखेर आज 8 मे रोजी गळभरणीला सुरुवात केली. या गळभरणीला पुनर्वसनातील गावांचा विरोध न होता सर्वांच्या सहकार्याने लेंडी धरणाची गळभरणी केली हे विशेष. तसेच गळभरणी झाली असली तरी ज्या काही अडचणी राहिल्या असतील त्या अडचणी प्रशासन स्तरावर व गावात येऊन सोडविल्या जातील असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्तात काम चालू आहे. धरण क्षेत्राच्या आजूबाजूस पोलिसांचा पहारा आहे.
चौकट
लेंडी धरणाचे काम पुर्ण झाल्यास 26 हजार हेक्टर शेती पाण्याखाली येणार असुन 30 हजार व त्यापेक्षाही जास्त शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. तसेच मुखेड व देगलुर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुध्दा मिटणार आहे.
प्रशासनाने ठेवला सुसंवाद..!
जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, मुखेडचे तहसिलदार राजेश जाधव यांनी नेहमीच प्रकल्पग्रस्तांशी सुसंवाद ठेवला. कोणतीही अडचण असल्यास थेट सोडविण्याचा प्रयत्न केला. प्रकल्पग्रस्त व अधिकारी यांच्याशी थेट संवाद होत असल्याने कोणताही विरोध न होता गळभरणी सुरुवात झाली. मागील 40 वर्षापासुन रखडलेला प्रकल्प अखेर प्रशासनाच्या सुसंवादातून सुटला असे म्हणावे लागेल.
लेंडी प्रकल्पग्रस्त सानुग्रह अनुदानाच्या नोटीसा गावात देण्यात आलेल्या आहेत. येणाऱ्या काही दिवसात प्रकल्पग्रस्तांच्या खात्यात अनुदान जमा होईल.
00000
वृत्त क्रमांक 485
शेत-पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्तीसाठी
“सस्ती अदालती” चे आज आयोजन
* प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी “सस्ती अदालत”
नांदेड, दि. 8 मे :- शेतरस्ते व पाणंदरस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी येत्या शुक्रवारी 9 मे रोजी नांदेड जिल्ह्यात सर्व तहसील कार्यालय किंवा मंडळ मुख्यालय ठिकाणी सस्ती अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील गरजू शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
राज्यात जे शेतरस्ते, पाणंदरस्ते अस्तित्वात आहेत त्यांना क्रमांक देण्यात यावेत. शेतजमिनीमध्ये वहिवाट करण्यासाठी अस्तित्वात असेले रस्ते काही ठिकाणी अरुंद आहेत. अशा ठिकाणी मोठी वाहने जाण्यास अडचण निर्माण होवून तक्रारी होतात. यामुळे राज्यातील सर्व शिवपाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करुन त्यांची कामे दर्जेदाररित्या पूर्ण करण्यात येणार आहेत. हे शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. शेत वहिवाट रस्त्याची तक्रार सुनावणी तहसीलदार यांच्याकडे होते. अशा रस्त्यांबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे एका महिन्यात निकाली काढावीत, असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यातील गरजू नागरिक शेतकऱ्यांना अतिक्रमित शेतरस्ते, पाणंद रस्ते मोकळे करण्यासाठी तसेच जलद न्याय मिळावा व प्रकरणाचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी तहसिल कार्यालयात किंवा मंडळ मुख्यालयाच्या ठिकाणी “सस्ती अदालत” उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात पाणंद अतिक्रमित रस्त्यांबाबतचे प्रलंबीत प्रकरणे निकाली काढली जाणार आहेत.
उद्या शुक्रवार 9 मे रोजी नांदेड जिल्हयातील सर्व तहसिल कार्यालय स्तरावर, मंडळ अधिकारी स्तरावर सस्ती अदालत उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
00000
वृत्त क्रमांक 484
वृत्त क्रमांक 483
वृत्त क्रमांक 482
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालतीचे आयोजन
नांदेड दि. 8 एप्रिल :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी मे महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 13 मे 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
०००००
वृत्त क्रमांक 500 उस्माननगर मंडळाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान शिबी राचे आयोजन लाभार्थ्यांना दिला विविध ...

-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 114 संजय गांधी निराधार योजनेतील २ हजार लाभार्थी अजूनही आधार कार्डशी 'अनलिंक ' ७ दिवसात कारवाई न केल्यास लाभापास...
-
वृत्त क्र. 1 47 नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले अभिजीत राऊत सहआयुक्त जीएसटी नांदेड दि. ४ फेब्रुवारी : सिडकोचे उपाध्यक्ष व व्य...