Thursday, July 6, 2017

     
उज्ज्वल नांदेडचा प्रतिसाद पाहून
एमपीएससी टॉपर्सही भारावले...
नांदेड, दि. 6 :-  स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड-वाघाळा शहर मनपा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने दरमहा 5 तारखेला आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरा विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद पाहुन एमपीएससी टॉपर्सही भारावून गेले.
            मनपा आयुक्त गणेश देशमुख यांचे अध्यक्षतेखाली आयोजित या शिबिरास प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांच्यासह प्रमुख मार्गदर्शक प्रा. मनोहर भोळे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या राज्यसेवा परीक्षेत उपजिल्हाधिकारी या पदासाठी महाराष्ट्रातून प्रथम आलेले भूषण अहिरे, व्दितीय आलेले श्रीकांत गायकवाड, पोलिस उपअधिक्षक या पदासाठी खेळाडू प्रवर्गातून प्रथम आलेले सुदर्शन पाटील, नांदेड येथे नुकतेच रुजू झालेले परिविक्षाधिन पोलिस उपअधिक्षक प्रशांत ढोले, निवड झालेले पोलिस उपअधिक्षक भाऊसाहेब ढोले, तहसिलदार श्रीकांत निळे पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी विद्यार्थ्यांना स्वप्न पाहण्याची ती पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठलाग, कष्ट करुन यशस्वी कसे व्हावे याबाबत महत्वपुर्ण मार्गदर्शन केले.
निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी विद्यार्थ्यांनी उज्ज्वल नांदेडला दिलेल्या सहकार्याचे कौत करुन जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांच्या हितासाठी सदैव तयार असल्याचे सांगितले.
            एमपीएससी टॉपर्स यांनी आपले अनुभव कथन करुन प्रतिकूल परिस्थितीमध्येही डगमगता, अपयशाची तमा बाळगता योग्य  पध्दतीने  अभ्यासाचे नियोजन करुन यश कसे मिळवता येऊ शकते याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यासोबतच नांदेडमध्ये असलेले शासकीय ग्रंथालय, सेतू समिती अभ्यासिका उज्ज्वल नांदेड अंतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधा यासारख्या बाबी महाराष्ट्रात कुठेही नसल्याचे नमूद करुन विद्यार्थ्यांनी याचा लाभ  करुन घ्यावा, असे सांगितले.
प्रमुख मार्गदर्शक प्रा. मनोहर भोळे  यांनी स्पर्धा परीक्षेस सामोरे जाताना कशा पध्दतीने सक्षमपणे सामोरे जावे याबाबत कराव्या लागणाऱ्या उपाययोजना याविषयी माहिती देऊन मेहनतीसोबतच एखाद गुरुचे मार्गदर्शन आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी नजीकच्या काळात होणाऱ्या परीक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी उज्ज्वल नांदेड मोहिमेचे आयोजन, साध्य झालेले यश पुढील काळातील आयोजन याबाबत माहिती दिली.
कै. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह तुडूं भरल्यानंतर अगदी मान्यवरांच्या पायापर्यंत स्टेजवर बसलेले विद्यार्थी, सभागृहाच्या आत   सभागृहाबाहेर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांची गर्दी पाहुन टॉपर्सनी कुतुहला सोबतच त्यांचेप्रती कृतज्ञता सुध्दा व्यक्त केली. एखादया सेलीब्रेटीस पाहण्यासाठी जशी झुंबड उडते तशी एमएपीएससी टॉपर्सना पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी  झुंबड केली होती. जो तो विद्यार्थी या टॉपर्स सोबत मोबाईलमध्ये फोटो, सेल्फी काढण्यासाठी धडपडत होता.
कार्यक्रमाच्या सुरुवात अव्व कारकून मीना सोलापूरे यांनी "इतनी शक्ती हमे देना दाता" या प्रेरणा गिताने केली. त्रसंचलन मुक्तीराम शेळके यांनी तर आभार  जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. हुसे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी प्रताप सुर्यवंशी, शैलेश झरकर, आरती कोकुलवार, बाळू पावडे, संजय कर्वे, अजय ट्टमवार, कोंडीबा गाडेवाड, रघुवीर श्रीरामवार, लक्ष्म्ण शेनेवाड, सोपान यनगुलवाड आदीने सहकार्य केले.
000000



जिल्ह्यात गत 24 तासात
 सरासरी 5.83 मि. मी. पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत 18.10 टक्के पाऊस
          नांदेड, दि. 6 :- जिल्ह्यात गुरुवार 6 जुलै 2017 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 5.83 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात एकूण 93.29  मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 172.95 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 18.10 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 6 जुलै 2017 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 11.75 (258.53), मुदखेड- 9.67 (226.66), अर्धापूर- 3.33 (169.33), भोकर- 2.75  (189.50) , उमरी- 19.33 (134.66), कंधार- 2.33 (177.00), लोहा- 5.33 (162.33), किनवट- 5.71 (226.86), माहूर- 2.00 (177.38), हदगाव- 1.43 (198.18), हिमायतनगर- 1.33 (114.81), देगलूर- 1.67  (116.99), बिलोली- 5.00 (161.60), धर्माबाद- 12.00 (165.34), नायगाव- 4.80 (137.66), मुखेड- 4.86 (150.29) आज  अखेर  पावसाची सरासरी 172.95 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 2767.12) मिलीमीटर आहे.

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...