Monday, January 14, 2019


हरभरा पिकाचा कृषि संदेश
नांदेड, दि. 14 : नांदेड जिल्हयात हरभरा  पिकासाठी किड रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांसाठी पुढीलप्रमाणे किडीपासुन संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात आला आहे.
हरभरा पिकावरील घाटेअळीसाठी पक्षी क्लोरॅनट्रीनीलीप्रोल 18.5 एस.जी 2.5 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळ फवारावे. तसेच मर रोगाची लक्षणे दिसत असल्यास अशी झाडे उपट नष्ट करावीत हरभरा पिकास पाणी देणे टाळावे, असे आवाहन नांदेडचे उप विभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.
00000


श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात
ईपिलेप्सी ( फेफरे / फिट्स ) मोफत शिबीर
नांदेड, दि. 14 :- सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ईपिलेप्सी फाऊडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 10 फेब्रुवारी  रोजी श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय वजिराबाद नांदेड येथे सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत भव्य ईपिलेप्सी ( फेफरे / फिट्स ) या आजाराबाबत मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या शिबिरात रुग्णांची न्युरोलाँजिस्ट तर्फे मोफत इसीजी चाचणी, फिजीओथेरपी ओकुपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, समुपदेशन व रक्त तपासणी तसेच रुग्णांसाठी मोफत औषधी देण्यात येणार आहेत. शालेय विद्यार्थी व इतर ईपिलेप्सी रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विठ्ठल मेकाने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.स.) डॉ. ए.पी. वाघमारे यांनी केले आहे.
00000


पालकमंत्री रामदास कदम यांचा दौरा
नांदेड, दि. 14 :- राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम हे बुधवार 16 जानेवारी रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
बुधवार 16 जानेवारी 2019 रोजी मुंबई येथुन देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.40 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण करतील. सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वा. नांदेड जिल्हा नियोजन समिती बैठकीस उपस्थिती. स्थळ- नियोजन भवन मुख्य सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. दुपारी 3 ते 5.30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव. सायं. 6 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...