Tuesday, December 7, 2021

 नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित तर 2 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 265 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आला आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे निरंक तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 499 एवढी झाली असून यातील 87 हजार 826 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 19 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 654 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये ॲटीजन तपासणीद्वारे किनवट 1 असे एकुण 1 बाधित आढळला आहे.

आज जिल्ह्यातील 2  कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 1 असे एकूण 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 19 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 16, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत 1 अशा एकूण 19 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 81 हजार 120

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 77 हजार 129

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 499

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 826

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 654

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-06

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-19

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 

 पात्र व इच्छुक उमेदवारांनी तासिक तत्वावरील

शिल्प निदेशक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि.7 :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देगलूर या संस्थेत वेल्डर/संधाता या व्यवसायासाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर शिल्प निदेशक नेमणे आहे. पात्र व इच्छुक उमेदवाराकडून 20 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यत शैक्षणिक अर्हता कागदपत्रासह अर्ज सादर करावेत. यापुर्वी ज्यांनी या पदासाठी अर्ज केलेले आहेत. त्यांनी पुनश्च अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही असे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था देगलूर यांनी प्रसिध्दपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

भोजन पुरवठा व स्टेशनरी व इतर साहित्य

पुरवठासाठी मागविण्यात आलेले दरपत्रक रद्द 

नांदेड (जिमाका) दि.7 :- मागासवर्गीय मुलां-मुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी व मुलां-मुलींच्या शासकीय निवासी शाळेसाठी आवश्यक वस्तुचा पुरवठा करण्यासाठी दरपत्रके (बंदपाकीट ) मध्ये 3 डिसेंबर ते 10 डिसेंबर 2021 पर्यंत सादर करणे बाबत कळविण्यात आले होते. परंतु शासन निर्णय क्रमांक- बीसीएच-२०२०/प्र.क्र.25-/शिक्षण-२, 29 नोव्हेंबर 2021 अन्वये राज्यात सर्व ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या ई-निवीदा राबविणेबाबत समिती गठीत केलेली आहे. प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, लातूर यांचे पत्र क.4455 दि. 4 डिसेंबर 2021 अन्वये भोजन पुरवठा व स्टेशनरी व इतर साहित्य पुरवठासाठी मागविण्यात आलेले दरपत्रक रद्द करण्यात येत आहेत. याची पुरवठाधारकांनी नोंद घ्यावी असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.

0000


 10 डिसेंबर रोजी मानवी हक्क दिन साजरा करावा 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- "मानवी हक्क दिन" येत्या 10 डिसेंबर रोजी साजरा करण्याचे निर्देश राज्य मानवी हक्क आयोगाचे अपर मुख्य सचिव व्ही. के. गौतम यांनी दिले आहेत. 

संरक्षण कायदा 1993 मधील कलम 12 अन्वये मानवी हक्काबाबत जनजागृती करणे हा राज्य मानवी हक्क आयोगाचा महत्वपूर्ण अविभाज्य भाग आहे. या कायद्याअंतर्गंत समाजातील तळागाळापर्यत जनतेला मानवी हक्काचे ज्ञान माहित होणे. त्याबद्दल जनजागृती होण्यासाठी व्याख्याने,भाषणे इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे निर्देश सर्व कार्यालय प्रमुखांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

0000

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाला

507 रक्तदात्यांचे कृतिशील अभिवादन   

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडून कौतुक 

नांदेड, (जिमाका) दि. 7 :- महापुरुषांच्या विचारांचा जागर आपल्या कृतीतून देण्याचा अनोखा वस्तूपाठ नांदेड वासीयांनी निर्माण करून आपल्या कर्तव्य तत्परतेने प्रचिती दिली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेस्थानक येथे स्ट्राँग गोल्ड ब्ल्यु फाऊंडेशन व विविध सेवाभावी संस्थांच्यावतीने या रक्तदान शिबिरासाठी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत नांदेड येथील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गुरुगोबिंदसिंघजी ब्लड बँकेच्या विविध ठिकाणावरील शिबिरात काल 507 दात्यांनी रक्तदान करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.  

कोरोनाच्या आव्हानात्मक काळात रक्तदानाची तेवढीच अत्यांतिक गरज आहे. नांदेड येथे शेजारील जिल्ह्यांपासून तेलंगणातूनही विविध रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णांचा ओघ व त्यांना रक्तांची गरज लक्षात घेता नांदेड येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदेडकरांनी जे उत्स्फूर्त रक्तदान केले याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी समाधान व्यक्त करून ही चळवळ अधिक सक्षम व्हावी या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

आपल्या परिवारातील अथवा मित्रांपैकी जर भविष्यात कोणाला गरज लागली तर त्यांना त्यांच्या गरजेनुरूप रक्ताच्या पिशव्या उपलब्ध करून देण्याचे कर्तव्य आम्ही आजवर कटाक्षाने पाळत आलो आहोत. रक्तदात्यांनाही ब्लड बँका ज्या पद्धतीन आश्वस्थ करतात त्याप्रमाणे समाजानेही हा तोल सावरून धरण्याकरिता आत्मविश्वासाने समाजानेही पुढे यावे, असे आवाहन गुरूगोबिंदसिंघजी ब्लड बँकेचे डॉ. प्रसाद बोरूलकर यांनी केले. येथील गणेशनगर टि पॉईट मित्र मंडळ, माजी सैनिक मंडळ व इतर संस्थांनी किनवट, देगलूर, इस्लापूर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते, अशी माहिती डॉ. प्रसाद बोरूलकर यांनी दिली.
00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...