Tuesday, December 7, 2021

भोजन पुरवठा व स्टेशनरी व इतर साहित्य

पुरवठासाठी मागविण्यात आलेले दरपत्रक रद्द 

नांदेड (जिमाका) दि.7 :- मागासवर्गीय मुलां-मुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी व मुलां-मुलींच्या शासकीय निवासी शाळेसाठी आवश्यक वस्तुचा पुरवठा करण्यासाठी दरपत्रके (बंदपाकीट ) मध्ये 3 डिसेंबर ते 10 डिसेंबर 2021 पर्यंत सादर करणे बाबत कळविण्यात आले होते. परंतु शासन निर्णय क्रमांक- बीसीएच-२०२०/प्र.क्र.25-/शिक्षण-२, 29 नोव्हेंबर 2021 अन्वये राज्यात सर्व ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या ई-निवीदा राबविणेबाबत समिती गठीत केलेली आहे. प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, लातूर यांचे पत्र क.4455 दि. 4 डिसेंबर 2021 अन्वये भोजन पुरवठा व स्टेशनरी व इतर साहित्य पुरवठासाठी मागविण्यात आलेले दरपत्रक रद्द करण्यात येत आहेत. याची पुरवठाधारकांनी नोंद घ्यावी असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.

0000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1144   2 डिसेंबरला लोकशाही दिन   नांदेड दि. 27 नोव्हेंबर :   जिल्हा प्रशासनाच्यावतीने सोमवार 2 डिसेंबरला नियोजन भवन जिल्हाध...