Friday, May 11, 2018


विद्युत ठेकेदार अनुज्ञप्तीसाठी
अभियंत्यांचा 24 मे रोजी मेळावा
नांदेड दि. 11 :- विद्युत ठेकेदार अनुज्ञप्तीसाठी पात्र विद्युत अभियंत्यांचा मेळावा विद्युत निरीक्षक कार्यालय आणि अधीक्षक अभियंता महावितरण नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार 24 मे 2018 रोजी उपप्रादेशिक प्रशिक्षण केंद्र महावितरण मंडळ कार्यालय परिसर साठे चौक नांदेड येथे सकाळी 11 वा. आयोजित केला आहे.
जिल्ह्यात विज वितरण कंपनी व इतर विद्युत विषयक कामे करण्यासाठी पुरेसे विद्युत कंत्राटदार उपलब्ध होवून बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पात्र अभियंत्यांना विद्युत कंत्राटदारांची अनुज्ञाप्ती मिळविण्यासाठी आवश्यक असणारी माहिती व मार्गदर्शन मेळाव्यात देण्यात येणार आहे.    
जिल्ह्यातील सर्व विद्युत अभियांत्रिकी पदवी / पदविकाधारक बेरोजगार अभियंते तसेच सर्व विद्युत पर्यवेक्षक अनुज्ञाप्तीधारक, विद्युत विषयात एनसीटीव्हीटी पुर्ण केलेले, आयटीआय विजतंत्री पुर्ण करुन अनुभव असलेल्या उमेदवारांनी कागदपत्रासह मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी विद्युत निरीक्षक यांचे कार्यालय स्नेहनगर नांदेड येथे (दूरध्वनी 02462-250966) किंवा अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय नांदेड (दूरध्वनी 02462-286904) येथे संपर्क साधावा, असे आवाहन विद्युत निरीक्षक विभागाचे विद्युत निरीक्षक प्र. द. दहाट यांनी केले आहे.
0000000


महाराष्ट्र दुय्यम सेवा गट- ब
पुर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड दि. 11 :-  महाराष्ट्र दुय्यम सेवा गट- ब पुर्व परीक्षा 2018 ही रविवार 13 मे 2018 रोजी नांदेड शहरातील 40 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
नांदेड शहरातील विविध 40 विद्यालय, महाविद्यालयातील केंद्रावर सकाळी 10.30 ते दुपारी 12 या कालावधीत परीक्षा होणार असून त्यासाठी 11 हजार 376 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षेचे कामकाज स्वच्छ व सुसंगत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात 13 मे रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू राहील. या कालावाधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी आदेशात नमूद केले आहे.
000000


शाळकरी मुलांची वाहतुक करणाऱ्या
वाहनांची तपासणी करण्याचे आवाहन
नांदेड दि. 11 :- शालेय मुलांची वाहतूक करण्यासाठी नोंद झालेल्या (स्कूल बस) वाहन हे सुरक्षाविषयक तरतुदीचे पालन करतात किंवा कसे याची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील स्कुल बसचे चालक, मालक यांनी आपल्या वाहनाचे वैध कागदपत्रे व वाहनाचा परवाना आदीसह वाहनासोबत प्रादेशिक परिवहन कार्यालयात तपासणीस उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मागील उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या बसेसची सुरक्षेच्या दृष्टीकोनातून फेरतपासणी केली आहे. त्यानुसार ही तपासणी पुर्णत: नि:शुल्क राहील. सदर वाहनाचे मोटार वाहन कायदा कलम 56 अंतर्गत जारी केलेले योग्यता प्रमाणपत्र वैध असले तरी स्कुल बसला ही चाचणी करुन घेणे बंधनकारक आहे. जे स्कुलबस धारक या तपासणीसाठी वाहन कार्यालयात सादर करणार नाहीत त्यांचा परवाना रद्द करण्यात येवून वाहन तपासणीमध्ये जप्त करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...