Friday, May 11, 2018


शाळकरी मुलांची वाहतुक करणाऱ्या
वाहनांची तपासणी करण्याचे आवाहन
नांदेड दि. 11 :- शालेय मुलांची वाहतूक करण्यासाठी नोंद झालेल्या (स्कूल बस) वाहन हे सुरक्षाविषयक तरतुदीचे पालन करतात किंवा कसे याची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील स्कुल बसचे चालक, मालक यांनी आपल्या वाहनाचे वैध कागदपत्रे व वाहनाचा परवाना आदीसह वाहनासोबत प्रादेशिक परिवहन कार्यालयात तपासणीस उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मागील उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या बसेसची सुरक्षेच्या दृष्टीकोनातून फेरतपासणी केली आहे. त्यानुसार ही तपासणी पुर्णत: नि:शुल्क राहील. सदर वाहनाचे मोटार वाहन कायदा कलम 56 अंतर्गत जारी केलेले योग्यता प्रमाणपत्र वैध असले तरी स्कुल बसला ही चाचणी करुन घेणे बंधनकारक आहे. जे स्कुलबस धारक या तपासणीसाठी वाहन कार्यालयात सादर करणार नाहीत त्यांचा परवाना रद्द करण्यात येवून वाहन तपासणीमध्ये जप्त करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 29 सप्टेंबरमधील बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडून ८१२ कोटी मंजूर  नांदेड दि. ७ जानेवारी : नांदेड जिल्ह्यातील माहे सप्‍ट...