Thursday, November 1, 2018


आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षणाची संधी
नांदेड दि. 1 :- आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, किनवट जिल्हा नांदेड या प्रशिक्षण केंद्रात 1 डिसेंबर 2018 पासून सुरु होणाऱ्या 98 व्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करीता प्रवेश देण्यासाठी उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालय किनवट येथे बुधवार 28 नोव्हेंबर 2018 तत्पुर्वी पोहचतील अशा बेताने आदिवासी (अनुसूचित जमातीचे) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रवेशासाठीची अटी पुढीलप्रमाणे राहील. उमेदवार अनुसूचित जमातीपैकी (एस.टी.) प्रवर्गातील असावेत. नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील उमेदवारांचाही प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. उमेदवार कमीतकमी शालांत परीक्षा उत्तीर्ण असावेत. उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. उमेदवारांनी किनवट येथे स्वत: राहाण्याची व जेवण्याची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षण कालावधी 3 महिने 15 दिवस असून शालांत परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना तसेच पदवीधारांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. उमेदवरांचे वय 30 नोव्हेंबर 2018 रोजी 18 वर्ष पूर्ण असावेत व 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. प्रशिक्षणार्थींचे विद्यावेतन संबंधित प्रशिक्षार्थींचे बँक खात्यामध्ये दरमहा जमा करण्यात येणार असल्यामुळे प्रशिक्षणार्थीच्या बँकेमध्ये चालू खाते असणे आवश्यक आहे. आपण यापुर्वी अशा प्रकारचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास किंवा हे प्रशिक्षण सत्र अर्ध्यातून सोडलेले असल्यास प्रवेश देण्यात येणार नाही.
प्रशिक्षण सत्रात नोकऱ्यांसाठी द्याव्या लागणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करुन घेण्यात येते. तसेच आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर खात्याच्या स्वयंरोजगार योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले जाते. पात्र अशा इच्छूक उमेदवारांनी आपल्या स्वाक्षरीत कोऱ्या कागदावर 28 नोव्हेंबर 2018 पर्यंत शैक्षणिक व जातीचे प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र , पेटकुलेनगर, गोकुंदा किनवट जि. नांदेड या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02469-221801 या कार्यालयाशी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. 
0000



धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीस प्रशासन सज्ज
नांदेड दि. 1 :- धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक कार्याक्षेत्रात धर्माबाद तालुल्यातील 56 गावे व उमरी तालुक्यातील (धानोरा खु बोळसा बु व बोळसा खु) येथे 3 नोव्हेबर 2018 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी धर्माबाद नगरपालिका सभागृहात 4 नोव्हेंबर 2018 रोजी होणार आहे. प्रचार दि. 2 नोव्हेबर 2018 रोजी सकाळी 8 वाजेपासुन बंद होणार आहे.
मतदान दिवशी व मतमोजणी दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी उपविभागिय दंडाधिकारी धर्माबाद डॉ. सचिन खल्लाळ व सहायक पोलिस अधिक्षक धर्माबाद नुरुल हसन यांच्या प्रमुख उपस्थित तालुक्यातील सर्व विभागाच्या प्रमुखाची बैठक घेण्यात आली. निवडणुकीत सहा. पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. निवडणुकीत गैर वर्तणुक  करणा-यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. संवेदनशील केंद्रावर व इतर केंद्रावर पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी असे 250 कर्मचारी नियुक्ती करण्यात आले असुन त्यांचे 3 प्रशिक्षण घेण्यात आले आहेत. मतदान केंद्राध्यक्षांना स्वतंत्रपणे मतपेटी सिल करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या निवडणूकीचे मतदान हे मतपत्रीकेवर देण्यात येणार आहे.
निवडणूकीत 15 शेतकरी गण ,  1 व्यापारी गण व 1 हमाल मापाडी गण असुन मतदान हे त्याचे मतदान हे बान फुलीद्वारे करुन मतपेटीत टाकण्यात येणार आहे.
3 नोव्हेबर 2017 रोजी  मतदान दिवशी जारीकोट व चिकना येथील मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार भरणार नाहीत तसेच 51 मतदान केंद्रावर मतदान असुन ज्या शाळेत मतदान केंद्र असेल त्या शाळेत मतदानाचे दिवशी सुट्टी राहणार आहे. विज खंडीत होणार नाही याबाबत विज वितरण कंपणीचे अधिकारी यांना सुचनाही देण्यात आले आहेत.
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र परिसर व मतमोजणी परिसर येथे फौजदारी प्रक्रीया कलम 144 लागू करण्यात आली आहे. मतदानच्या दिवशी व मतमोजणीच्या दिवशी जनतेने शांतता पाळावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी (कृउबास) तथा उपविभागीय अधिकारी धर्माबाद डॉ. सचिन खल्लाळ व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी (कृउबास) तथा तहसिलदार ज्योती चौहान यांनी केले आहे.
00000


वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र
नुतनीकरण करुन घ्यावे - राऊत  
नांदेड दि. 1 :- योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण केलेल्या वाहनधारकानी तात्काळ वाहनातील सर्व त्रुटी दुरुस्तीचे कामकाज करुन प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घ्यावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.
प्रधा सचिव परिवहन बंदरे मुंबई यांच्या निर्देशानुसार योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांची विशेष तपासणी मोहि नुकतीच राबविण्यात आली होती. या मोहिमेत दोन वायुवेग पथक एक महस सुरक्षापथकामार्फत योग्यता प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.
कारवाई करण्यात आलेली वाहने पोलीस स्टेशन, एसटी विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालयात तसेच आवश्यकतेनुसार गॅरेजमध्ये अटकविण्यात आली आहेत. यात 614 वाहने तपासणी केली अस त्यापैकी 157 दोषी वाहनावर करवाई करण्यात आली आहे. तर 131 वाहनधारकाने दंड कर 9 लाख 91 हजार 900 रुपये भरणा केला आहे. या वाहनधारकाना तात्काळ योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घेण्याबाबत नोटीस देण्यात आलआहे, असेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  
00000



खाजगी बसने अधिक तिकिटदर
आकारल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन
नांदेड दि. 1 :- हंगामाच्या काळात खाजगी बस, ट्रॅव्हल्स यांनी अधिक तिकिटदर आकारल्यास प्रवाशांनी परिवहन कार्यालयास तक्रार नोंदवावी, असे आवाहन नांदेडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.
राज्य शासनाने 27 एप्रिल 2018 च्या शासन निर्णयान्वये कंत्राटी वाहनांचे (खाजगी बस, ट्रॅव्हल्स आदी) महत्तम भाडेदर निश्चित केले आहे. सोबत नमुना जोडला असून शासन निर्णय त्वरीत प्रभावाने अंमलात आला आहे. कंत्राटी बस परवानाधारकांकडून विहित दरापेक्षा अधिक दराने आकारणी करण्यात येत असले तर त्याविषयी मोटार वाहन विभागाच्या 022-62426666 या नि:शुल्क तक्रार नोंदणी क्रमांकावर तक्रार नोंदवावी. मुंबईसाठी 1800220110 या नि:शुल्क क्रमांकावरही तक्रार नोंदविता येईल, असे परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांच्याद्वारे कळविण्यात आले आहे.  
अशी तक्रार विभागाच्या www.transportcomplaints.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर देखील नोंदविता येऊ शकेल. तक्रारी संदर्भात उचित चौकशीअंती संबंधीत कंत्राटी बस परवानाधारकांच्या परवान्यावर निलंबनाची / रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल. या शासन निर्णयाद्वारे खाजगी कंत्राटी वाहनांना गर्दीच्या हंगामाच्या काळात एसटी बसच्या तुलनेत जास्तीतजास्त दीडपट भाडे आकारता येईल. यापेक्षा अधिक भाडे आकारले गेल्यास प्रवाशांनी तक्रार नोंदवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
0000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...