वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र
नुतनीकरण करुन घ्यावे - राऊत
नांदेड दि. 1 :- योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण न केलेल्या वाहनधारकानी तात्काळ वाहनातील सर्व
त्रुटी दुरुस्तीचे कामकाज करुन प्रमाणपत्र
नुतनीकरण करुन
घ्यावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
अविनाश राऊत यांनी केले
आहे.
प्रधान सचिव
परिवहन व बंदरे मुंबई यांच्या निर्देशानुसार योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांची विशेष तपासणी मोहिम नुकतीच राबविण्यात आली होती. या मोहिमेत दोन वायुवेग पथक
व एक महसूल सुरक्षापथकामार्फत योग्यता प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनांवर
कारवाई करण्यात आली.
कारवाई
करण्यात आलेली वाहने पोलीस स्टेशन, एसटी विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालयात तसेच
आवश्यकतेनुसार गॅरेजमध्ये अटकविण्यात आली आहेत. यात 614 वाहने तपासणी
केली असून त्यापैकी
157 दोषी वाहनावर करवाई
करण्यात आली आहे. तर 131 वाहनधारकाने दंड
व कर 9 लाख 91 हजार 900 रुपये भरणा
केला आहे. या वाहनधारकाना
तात्काळ योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घेण्याबाबत नोटीस
देण्यात आली आहे, असेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी
पत्रकात नमूद केले आहे.
00000
No comments:
Post a Comment