Saturday, December 3, 2016

माहूरगड श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त
पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान
नांदेड, दि. 3 – माहूरगड येथे श्री दत्तजयंती उत्सव शुक्रवार 9 ते बुधवार 14 डिसेंबर 2016 या कालावधीमध्ये साजरा होत आहे. या उत्सवासाठी राज्याच्या विविध भागांसह, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व इतर राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे या कालावधीत मिरवणुका व  इतर कार्यक्रम शांततेत पार पडावे व शांतता व सुव्यवस्था रहावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय येनपुरे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये शुक्रवार 9 डिसेंबर ते बुधवार 14 डिसेंबर 2016 च्या मध्यरात्री पर्यंत माहूर उपविभागीय पोलीस अधीकारी रमाकांत खरात व माहूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांना मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 36 मधील पोट कलमे अ ते फ प्रमाणे अधिकार प्रदान केले आहेत.
प्रदान करण्यात आलेले अधिकार पुढीलप्रमाणे - रस्त्यावरील व रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे कोणत्या रितीने वागावे याविषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व पुजा-अर्चेच्या प्रार्थना स्थळाच्या सर्व जागेच्या आसपास पुजा-अर्चेच्या वेळी कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देणे. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये घाटात किंवा घाटावर, सर्व धक्क्यावर किंवा धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, जत्रा, देवालय आणि सार्वजनिक स्थळी, लोकांच्या जाण्या येण्याच्या जागेमध्ये सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे. तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी व सूचना देण्यासंबंधी योग्य ते आदेश देणे. मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33, 35 ते 40, 42, 43, 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे सुव्यवस्था राहणेकामी योग्य आदेश देण्याबाबत.
हा आदेश लागू असेपर्यंत माहूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चव्हाण व पोलीस निरीक्षक डॉ. अरुण जगताप यांच्याकडून रहदारीचे नियम व मार्गाबाबत सूचना कार्यक्रमाची तारीख, वेळ, जाहीरसभा, मोर्चे, मिरवणूक, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस फौजदार किंवा त्याच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ सभेची जागा, मिरवणुकीचा, मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा, पूर्व परवानगी शिवाय आयोजित करु नये. संबंधीत अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे. परवानगी दिलेल्या जाहीरसभा, मिरवणुका, पदयात्रा यात समायोजित घोषणा सोडून ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये. सदरचा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असेही आदेशही जिल्हा पोलीस अधीक्षक येनपुरे यांनी जारी केले आहेत.

0000000
केबल ग्राहकांना सेट टॉप बॉक्स बसविणे अनिवार्य
नांदेड दि. 3 :-  केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2017 पासून केबल ग्राहकांना सेट टॉप बॉक्स बसविणे अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या करमणूक विभागाने कळविले आहे.
याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सूचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या अधिसूचना 11 डिसेंबर 2014 अन्वये केबल डिजीटायझेशन फेज 4 हा रविवार 1 जानेवारी 2017 पासून सुरु होत आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील नगरपंचायत व ग्रामीण भागातील केबल सिग्नल पुरवठा हा सेट टॉप बॉक्स शिवाय चालू होणार नाही. यासाठी केबल जोडणीधारकांनी आपल्या केबल चालकांना तात्काळ संपर्क साधून त्यांचेकडून सेट टॉप बॉक्स घेऊन आपल्या घरातील टिव्ही संचास जोडून घ्यावा. रविवार 1 जानेवारी पासून सेट टॉप बॉक्स शिवाय केबल सिग्नल पुरवठा चालू होणार नाही आणि केबल चालकांनी आपल्या अधिनिस्त असलेल्या जोडणीधारकांकडे तात्काळ सेट टॉप बॉक्स  बसवून केबल सिग्नल पुरवठा सुरळीत चालू राहील याबाबत दक्षता घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000000
मानवी हक्क दिनानिमित्त 10 डिसेंबरला
विविध उपक्रमांच्या आयोजनाचे निर्देश
नांदेड, दि. 3 -  जिल्ह्यात शनिवार 10 डिसेंबर 2016 रोजी मानवी हक्क दिन साजरा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आले आहेत. 
जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच शिक्षण, कारागृह, निरीक्षकगृह आदी विभागांनी मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 मधील कलम 21 अन्वये मानवी हक्काबाबत जनजागृती करावी असे राज्य मानवी हक्क आयोगाने जिल्हा प्रशासनाकडे पत्राद्वारे सूचित केले आहे. या कायदाअंतर्गत समाजातील तळागाळापर्यंत जनतेला मानवी हक्काचे ज्ञान व्हावे त्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे पत्रात नमूद केले आहे. त्यानुसार न्यायालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पोलीस विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा, सामाजिक न्याय विभाग, महसूल विभागाची सर्व कार्यालये शिक्षणाधिकारी, कारागृह अधीक्षक, बालगृह मुलांचे यांना जिल्हाधिकारी नांदेड यांनी मानवी हक्क दिनानिमित्त जनजागृती करावी याविषयी पत्राद्वारे निर्देशीत केले आहे.

0000000
समाज कल्याणच्या शिष्यवृत्तीबाबत
महाविद्यालयांना आवाहन
नांदेड, दि. 3 जिल्हयातील अनुदानित, विनाअनुदानित, व्यवसायि वरिष्ठ कनिष्ठ महाविद्यालयानी शैक्षणिक वर्ष 2015-16 मधील अनुसूचित जाती , विजाभज, इमाव विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांच ऑनलाईन शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परिक्षा फी प्रलंबित अर्ज गुरुवार 15 डिसेंबर 2016 पर्यंत समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगिन आयडीवर फॉरवर्ड करावेत. अर्ज फॉरवर्ड केल्यानंतर अर्जाची हार्डकॉपी आवश्यक कागदपत्रे (विनाअनुदानित अभ्यासक्रमासाठी ) समाज कल्याण कार्यालयास सादर करावे, असे आवाहन असे सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी कळविले आहे.
शैक्षणिक वर्षे 2015-16 मधील 2 हजार 294 अर्ज अद्याप महाविद्यालयाच्या क्लॉर्क लॉगिन आयडी प्राचार्य लॉगिन आयडीवर प्रलंबित आहेत. महाविद्यालयांनी प्रलंबित अर्ज सादर केल्यास किंवा उशिराने सादर केल्यास विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन प्रणालीमधून रिजेक्ट करण्यात येतील. विद्यार्थी शिष्यवृत्ती पास वंचित राहिल्यास किंवा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक नुकसान झाल्यास सर्वस्व जबाबदारी संबंधीत महाविद्यालयाच्या प्राचार्याची राहिल, असे सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी कळविले आहे.

000000
जिल्हा परिषदेची 14 डिसेंबर रोजी
सर्वसाधारण सभा
नांदेड दि. 3 :- जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवार 14 डिसेंबर 2016 रोजी दुपारी 1 वा. कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगलाताई गुंडले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे, असे नांदेड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) यांनी कळविले आहे.

0000000
आयटीआय नांदेडमध्ये मंगळवारी
भरती मेळावा
नांदेड दि. 3 :-  औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे मंगळवार 6 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 11 वा. सभागृहामध्ये प्रशिक्षणार्थ्यांसाठी भरती मेळावा आयोजित केला आहे.
या भरती मेळाव्यास विविध आस्थापना व कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आयटीआय उत्तीर्ण सर्व व्यवसायातील प्रशिक्षणार्थीनी शैक्षणिक कागदपत्रांसह जास्तीतजास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अंशकालीन प्राचार्य मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांनी केले आहे.

00000
जागतिक अपंग दिनानिमित्त
कायदेविषयक शिबीर संपन्न
नांदेड दि. 3 :-  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे  निवासी अंध विद्यालय वसरणी नांदेड येथे आज जागतिक अपंग दिनानिमित्त कायदेविषयक शिबीर संपन्न झाले.
यावेळी न्या.. आर. कुरेशी यांनी विकलांगांच्या विविध कायद्याबाबत माहिती दिली. तसेच पाचशे एक हजार रूपयांच्या नोटा बंद झाल्यामुळे काही समाजकंटक गैरफायदा घेत असून त्यांच्या कुठल्याही भुलथापांना बळी पडता स्वत:च्या बॅंक खात्याची माहिती गैरव्यक्तीस देवू नका असे सांगीतले.  
            तत्पुर्वी अतिरिक्त सह दिवाणी न्यायाधीश न्या. एस. डी. तारे, अॅड. राणा सारडा, अॅड. प्रविण अयाचित, अॅड. एम. एल. गायकवाड, अॅड. एम. डी. वाकोडकर यांनी विविध कायद्यांची माहिती दिली. विधी सेवा प्राधिकरण नांदेड गुरूद्वारा लंगर साहिबचे बाबा अमरजितसिंघ यांनी गुरूद्वाराच्यावतीने येथील अंध विद्यार्थ्यांना फळे खाऊचे वाटप केले.
यावेळी संस्थेचे सदस्य नागेशगुट्टे, सत्यश्री गुट्टे, अॅड. विशाखा जाधव, शाळेचे मुख्याध्यापक एस. पी. पाटील, बलभी केंद्रे, संगीत शिक्षक पी. व्ही. सिरभाते, आर. एल. जोजार, एस. एन. होळंबे, भास्कर आनेराये, अधिक्षक मनोजकुमार कलवले, सहशिक्षिका व्ही.एस.निलम यांची उपस्थिती होती.
शाळेच्या अंध विद्यार्थी यश गायकवाड, अंकुश खंडेलोटे, कु.दीपाली गे, शिवाणी भूतनर यांनी गीत गायनातून उपस्थिताना मंत्रमुग्ध केले.  तिरूपती गायकवाड याने ब्रेललिपीचे इंग्रजीमध्ये वाचन करून इंग्रजीमध्ये भाषण केले. या विद्यार्थ्यांचे कौशल्य पाहून मान्यवरांनी कौतुक करून प्रोत्साहनपर बक्षिस दिले.  सुत्रसंचलन व्ही. एस. निलक यांनी केले. आभार मुख्याध्यापक एस. पी. पाटील यांनी मानले.

000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...