केबल ग्राहकांना सेट टॉप बॉक्स बसविणे अनिवार्य
नांदेड दि. 3 :- केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या
निर्देशानुसार 1 जानेवारी 2017 पासून केबल ग्राहकांना सेट टॉप बॉक्स बसविणे
अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या करमणूक विभागाने कळविले आहे.
याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सूचना व प्रसारण मंत्रालय भारत
सरकार यांच्या अधिसूचना 11 डिसेंबर 2014 अन्वये केबल डिजीटायझेशन फेज 4 हा रविवार 1
जानेवारी 2017 पासून सुरु होत आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील नगरपंचायत व
ग्रामीण भागातील केबल सिग्नल पुरवठा हा सेट टॉप बॉक्स शिवाय चालू होणार नाही. यासाठी
केबल जोडणीधारकांनी आपल्या केबल चालकांना तात्काळ संपर्क साधून त्यांचेकडून सेट
टॉप बॉक्स घेऊन आपल्या घरातील टिव्ही संचास जोडून घ्यावा. रविवार 1 जानेवारी पासून
सेट टॉप बॉक्स शिवाय केबल सिग्नल पुरवठा चालू होणार नाही आणि केबल चालकांनी आपल्या
अधिनिस्त असलेल्या जोडणीधारकांकडे तात्काळ सेट टॉप बॉक्स बसवून केबल सिग्नल पुरवठा सुरळीत चालू राहील
याबाबत दक्षता घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
0000000
No comments:
Post a Comment