Wednesday, September 27, 2017

खाजगी ऑटोरिक्षाची परिवहन संवर्गात नोंदणी
करण्यास 31 मार्च 2018 ची अंतिम मुदत
नांदेड दि. 27 :-  खाजगी संवर्गात नोंदणी झालेल्या ऑटोरिक्षा परिवहन संवर्गात नोंदणी करण्याची अंतिम मुदत दि.31 मार्च 2018 पर्यंतच असणार आहे. ऑटोरिक्षा टॅक्सी चालकांनी याची नोंद घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड येथे अर्ज करुन परवाने घेण्यात यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
 ऑटोरिक्षा टॅक्सी परवान्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाद्वारे तसेच राज्यातील इतर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांनी तीन चाकी, तीन आसनी काळया पिवळया ऑटोरिक्षा टॅक्सी परवान्यांच्या संख्येवर अथवा नव्याने परवाने जारी करण्यावर घातलेले निर्बंध शासन निर्णय 22 सप्टेंबर 2017 अन्वये उठविले आहेत.  
खाजगी संवर्गात नोंदणी असणाऱ्या ऑटोरिक्षा नविन परवान्यावर परिवहन संवर्गात नोंदणी करताना अथवा सध्याच्या परवान्यावर बदली वाहन म्हणून परिवहन संवर्गात नोंदणी करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. यासाठी अर्जदारास विहित नमन्यातील अर्ज, परवाना शुल्क, अतिरिक्त परवाना शुल्क भरावा लागणार आहे. जे अर्जदार 18 जुलै 2017 रोजीच्या शासन निर्णयातील अटी शर्ती पूर्ण करतील अशा ऑटोरिक्षा टॅक्सी चालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत परवाने जारी करण्यात येणार आहेत, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

0000000
आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध दिन
1 ऑक्टोंबरला साजरा करण्याचे निर्देश
नांदेड दि. 27 :- राज्याच्या समाज कल्याण संचालनालयाच्यावतीने 1 ऑक्टोंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध दिन साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालय, विभाग आदींनी या दिवशी जिल्हा व तालुका स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
या कार्यक्रमात जेष्ठ नागरिक संघ, पंचायत राज, नगरपालिका, नेहरु युवा केंद्र, विविध शैक्षणिक संस्था तसेच जेष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना सहभागी करुन घ्यावे. त्यासाठी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आरोग्य अधिकारी, विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्यासह स्वयंसेवी संस्था, लायन्स क्लब, रोटरी क्लब, आदी व इतर सामाजिक संस्था संघटनांही सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000
बारावी परीक्षेची ऑनलाईन अर्ज
करण्याचे वेळापत्रक जाहीर  
नांदेड दि. 27 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12 वी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे. 
परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरावयाची आहेत.
नियमित शुल्कासह उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सोमवार 18 सप्टेंबर ते 9 ऑक्टोंबर 2017 पर्यंत भरावयाचे आहे. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी बॅकेत चलनाद्वारे शुल्क मंगळवार 10 ते 17 ऑक्टोंबर 2017 पर्यंत भरावयाचे आहे. मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या मंगळवार 31 ऑक्टोंबर 2017 पर्यंत जमा करावयाचे आहेत. तर विलंब शुल्कासह मंगळवार 10 ते 17 ऑक्टोंबर 2017 पर्यंत अर्ज भरता येतील. तसेच बँकेत चलनाद्वारे शुल्क बुधवार 18 ते 25 ऑक्टोंबर पर्यंत भरावयाचे आहे.
कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या याद्या एक्सलमध्ये 18 ते 27 ऑक्टोंबर या कालावधीत प्रिंटींग करावीत. परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी अर्ज त्यांच्या संबंधीत उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. प्राचार्य यांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाच्या याद्यावर दिलेल्या तारखाप्रमाणे तसेच प्रचलित पद्धतीने बॅक ऑफ इंडियामध्ये चलनाद्वारे शुल्क भरुन चलनाची प्रत विभागीय मंडळाकडे जमा करावी. नियमित शुल्कासह तसेच विलंब शुल्कासह अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क दोन स्वतंत्र चलनाद्वारेच भरण्यात यावीत. अर्जामध्ये शासन आदेशानुसार विद्यार्थ्यांने त्यांचा आधारकार्ड क्रमांक भरणे अनिवार्य आहे, असेही लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

00000
दहावी, बारावी परीक्षेचे
संभाव्य वेळापत्रक जाहीर  
नांदेड दि. 27 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता दहावी व इयत्ता बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये आयोजित केली आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतुने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक पुढीलप्रमाणे तयार करण्यात आले आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (पुनर्रचित व जुना अभ्यासक्रम) लेखी परीक्षा बुधवार 21 फेब्रुवारी ते मंगळवार 20 मार्च 2018 या कलावधीत होईल. तर इयत्ता 10 वी लेखी परीक्षा गुरुवार 1 मार्च ते शनिवार 24 मार्च 2018 या कालावधीत होईल. दिनांक निहाय सविस्तर वेळापत्रक www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे.
परीक्षेपुर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतीम राहील. छापील वेळापत्रकावरुन परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉटस्ॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये.
प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपुर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे 15 दिवसाच्या आत लेखी स्वरुपात पाठवाव्यात, असे राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

00000
बालकांसाठी कार्यरत संस्थांना
नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक;  
अर्ज करण्यास 30 सप्टेंबर मुदत
नांदेड दि. 27 :- बालकांसाठी कार्यरत आणि इच्छुक असणाऱ्या सर्व अनुदानित, विनाअनुदानित, शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी संस्थांनी कायद्यांतर्गत नोंदणी प्रमाणपत्र शासनाकडून प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. त्यासाठीचे प्रस्ताव विहित नमुन्यात अर्ज भरुन आवश्यक त्या कागदपत्रांसह शनिवार 30 सप्टेंबर 2017 पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, शास्त्रीनगर, नांदेड येथे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
केंद्र शासनाने दिनांक 1 जानेवारी 2016 पासुन बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 आणि या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आदर्श नियमावली सप्टेंबर 2016 पासून देशभर लागू केली आहे. या कायद्याच्या कलम 41 (1) अंतर्गत बालकांसाठी कार्यरत संस्थेनी शासनाकडून नोंदणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. नोंदणी प्रमाणपत्राशिवाय ज्या संस्था बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कार्यरत राहतील अशा अवैध संस्थांवर या कायद्याच्या कलम 42 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल याची महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्था आणि व्यक्ती यांनी नोंद घ्यावी. या कलमा अंतर्गत कमाल 1 वर्षापर्यंत तुरुंगवास व 1 लाख रुपयापर्यंत दंड अथवा दोन्ही देण्याची तरतुद करण्यात आली आहे.
            बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कार्यरत ( निरीक्षणगृह, विशेषगृह, सुरक्षित जागा (place of safety), बालगृह, खुले निवारागृह, विशेष दत्तक संस्था ) तसेच इच्छुक सर्व संस्थांनी बाल न्याय ( मुलांची काळजी व संरक्षण ) अधिनियम 2015 मधील कलम 41 नुसार नोंदणी प्रमाणपत्राचे प्रस्ताव आदर्श नियमावलीच्या परिशिष्ठ 27 मध्ये दिलेल्या विहित नमुन्यामध्ये अर्ज भरुन आवश्यक त्या कागदपत्रासह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, 24- गणेश कृपा, शास्त्री नगर, भाग्यनगर जवळ नांदेड या पत्त्यावर शनिवार 30 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर करावीत. मुदती नंतर नोंदणी प्रमाणपत्राशिवाय किंवा नोंदणी प्रमाणपत्राचे प्रस्ताव सादर न करणाऱ्या संस्थांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

00000
मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू 
नांदेड, दि. 27 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा  27 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 6 वाजेपासून गुरुवार 26 ऑक्टोंबर 2017 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. 

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...