Wednesday, September 27, 2017

बारावी परीक्षेची ऑनलाईन अर्ज
करण्याचे वेळापत्रक जाहीर  
नांदेड दि. 27 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12 वी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे. 
परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरावयाची आहेत.
नियमित शुल्कासह उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सोमवार 18 सप्टेंबर ते 9 ऑक्टोंबर 2017 पर्यंत भरावयाचे आहे. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी बॅकेत चलनाद्वारे शुल्क मंगळवार 10 ते 17 ऑक्टोंबर 2017 पर्यंत भरावयाचे आहे. मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या मंगळवार 31 ऑक्टोंबर 2017 पर्यंत जमा करावयाचे आहेत. तर विलंब शुल्कासह मंगळवार 10 ते 17 ऑक्टोंबर 2017 पर्यंत अर्ज भरता येतील. तसेच बँकेत चलनाद्वारे शुल्क बुधवार 18 ते 25 ऑक्टोंबर पर्यंत भरावयाचे आहे.
कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या याद्या एक्सलमध्ये 18 ते 27 ऑक्टोंबर या कालावधीत प्रिंटींग करावीत. परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी अर्ज त्यांच्या संबंधीत उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. प्राचार्य यांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाच्या याद्यावर दिलेल्या तारखाप्रमाणे तसेच प्रचलित पद्धतीने बॅक ऑफ इंडियामध्ये चलनाद्वारे शुल्क भरुन चलनाची प्रत विभागीय मंडळाकडे जमा करावी. नियमित शुल्कासह तसेच विलंब शुल्कासह अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क दोन स्वतंत्र चलनाद्वारेच भरण्यात यावीत. अर्जामध्ये शासन आदेशानुसार विद्यार्थ्यांने त्यांचा आधारकार्ड क्रमांक भरणे अनिवार्य आहे, असेही लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...