Wednesday, September 27, 2017

खाजगी ऑटोरिक्षाची परिवहन संवर्गात नोंदणी
करण्यास 31 मार्च 2018 ची अंतिम मुदत
नांदेड दि. 27 :-  खाजगी संवर्गात नोंदणी झालेल्या ऑटोरिक्षा परिवहन संवर्गात नोंदणी करण्याची अंतिम मुदत दि.31 मार्च 2018 पर्यंतच असणार आहे. ऑटोरिक्षा टॅक्सी चालकांनी याची नोंद घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड येथे अर्ज करुन परवाने घेण्यात यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
 ऑटोरिक्षा टॅक्सी परवान्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाद्वारे तसेच राज्यातील इतर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांनी तीन चाकी, तीन आसनी काळया पिवळया ऑटोरिक्षा टॅक्सी परवान्यांच्या संख्येवर अथवा नव्याने परवाने जारी करण्यावर घातलेले निर्बंध शासन निर्णय 22 सप्टेंबर 2017 अन्वये उठविले आहेत.  
खाजगी संवर्गात नोंदणी असणाऱ्या ऑटोरिक्षा नविन परवान्यावर परिवहन संवर्गात नोंदणी करताना अथवा सध्याच्या परवान्यावर बदली वाहन म्हणून परिवहन संवर्गात नोंदणी करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. यासाठी अर्जदारास विहित नमन्यातील अर्ज, परवाना शुल्क, अतिरिक्त परवाना शुल्क भरावा लागणार आहे. जे अर्जदार 18 जुलै 2017 रोजीच्या शासन निर्णयातील अटी शर्ती पूर्ण करतील अशा ऑटोरिक्षा टॅक्सी चालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत परवाने जारी करण्यात येणार आहेत, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण

  76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण     नांदेड, दि. 25 जानेवारी :- ...