Wednesday, September 22, 2021

 अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींच्या मदतीबाबत

माहिती भरुन देण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :जिल्हयातील सेवाभावी संस्था तसेच व्यक्तीनी अपघातांमध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या व्यक्तींना तात्काळ मदत केली असल्यास विहित प्रपत्रामध्ये माहिती भरुन शुक्रवार 24 सप्टेंबर 2021पर्य प्रादेशिक परिवहन कार्यालयएमआयडीसी सिडको नांदेड येथे सादर करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

देशातील रस्ते अपघात ही एक गंभीर समस्या असून या अपघातांमध्ये लोक गंभीररित्या जखमी होतात तर काहींना जीव गमवावे लागतात. रस्ते अपघातातील जखमी व्यक्तींना तात्काळ मदत मिळावी यासाठी काही सेवाभावी संस्था तसेच व्यक्ती (Good Samaritans) सतत कार्यरत असतात. Morth यांच्या दिनांक 29 सप्टेंबर 2020 च्या अधिसूचनेनुसार Good Samaritans चे नियम अधिसुचित केले आहे.

 

रस्ते अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी अशा Good Samaritans यांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. यासाठी पुरस्कार प्रदान करण्यासाठी Good Samaritans चे नामांकन केंद्रिय रस्ते वाहतूक  महामार्ग मंत्रालय यांच्याकडून मागविण्यात आले आहे. माहिती प्रपत्रात सादर करावयाची आहे. यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क करावा.

00000

Attachments area

 जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 22 - राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे 23 सप्टेंबर 2021 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल. गुरुवार 23 सप्टेंबर,2021 रोजी सायंकाळी 5.45 नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने परभणीकडे प्रयाण.

00000

 ई-पिक पाहणीसाठी जिल्ह्यात 24 सप्टेंबर पासून विशेष मोहिम

-          जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्ह्यात डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ई-पिक पाहणी, पीक पेरणीची माहिती भ्रमणध्वनी ॲपद्वारा गाव नमूना नं. 12 मध्ये नोंदविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिम 24 सप्टेंबर पासून राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत एकूण 2 लाख 10 हजार 921 शेतकऱ्यांचे पीक पेरा नोंदविण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात मोहिम यशस्वी राबविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रयत्न करावेत, असे आवाहन  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.   

जिल्ह्यातील ई-पिक पाहणी मोबाईल ॲपद्वारे 2 लाख 10 हजार 921 शेतकऱ्यांची पीक पाहणी 21 सप्टेंबर रोजी मोहिम स्वरुपात नोंदणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. परंतु जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या पावसामूळे व नैसर्गिक आपत्तीमूळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावयाचे असल्याने निर्धारित करुन दिलेले उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. शासनाच्या निर्देशामूळे जिल्ह्यात ही मोहिम पुन्हा 24 सप्टेंबर 2021 रोजी राबविण्यात येणार आहे. शासकीय यंत्रणानी ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असेही जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

00000 

 फिरते स्टॉल खरेदीसाठी अनुदान योजना कार्यान्वित  

नांदेड (जिमाका) दि. 22 :- नांदेड येथील समाजकल्याण विभाग आणि जिल्हा परिषद मार्फत मागासवर्गीयांच्या उदरनिर्वाहसाठी सन 2021-22 साठी फिरते स्टॉल खरेदीसाठी अनुदान योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

ही योजना अनुसूचित जाती, जमाती, वि.जा.भ.ज.प्रवर्गातील सदस्यांसाठी लागू राहणार आहे.संबंधित सदस्यांनी गटविकास अधिकारी, पंचायंत समिती कार्यालयाशी संपर्क साधुन अर्जाचा नमूना प्राप्त करुन घेणे व परिपूर्ण अर्ज संबंधित गटविकास अधिकारी यांच्याकडे 15 ऑक्टोबरपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर.एच.एडके यांनी केले  आहे.

00000

 गाई म्हैस खदेदीसाठी अनुदान योजना कार्यान्वित

नांदेड (जिमाका) दि. 22 :- नांदेड येथील समाजकल्याण विभाग आणि जिल्हा परिषद मार्फत मागासवर्गीय व्यक्तींना दुग्ध व्यवसायासाठी गाई म्हैस खरेदीसाठी अनुदान योजना सन 2021-22 साठी कार्यान्वित करण्यात आली आहे.

सन 2021-22 साठी अनुसूचित जाती, जमाती, वि.जा.भ.प्र. प्रवर्गातील सदस्यांसाठी लागू राहणार आहेत.या प्रवर्गातील सदस्यांनी संबंधित गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कार्यालयाशी संपर्क साधून अर्जाचा नमूना प्राप्त करुन घेणे व परिपूर्ण अर्ज संबंधित गटविकास अधिकारी यांच्याकडे 15 ऑक्टोबरपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर.एच.एडके यांनी केले  आहे.

00000

 निर्यातदाराचे संमेलन 24 सप्टेंबर रोजी 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- आझादी का अमृत महोत्सव 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापदिनामित्त केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत निर्यातदाराचे संमेलन 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा उद्योग केंद्र येथे आयोजित करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील निर्यातीला चालना देण्याच्या दृष्टिने उद्योगांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हृयात जिल्हा निर्यात प्रचालन परिषदेची स्थापना करण्यात आली. जिल्हृयात निर्यात वाढविण्यासाठी विविध केंद्र व जिल्हा कार्यालये,औद्योगिक संघटना, निर्यात परिषद, निर्यात सल्लागार यांच्या सतत पाठपुरवठा, समन्वय व अडीअडचणी  दूर करण्याच्या दृष्टिने जिल्हा प्रचालन परिषदेस सहकार्य करण्यासाठी  शासन निर्णयानुसार नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निर्यात प्रचालन परिषदेची समिती गठीत करण्यात आली आहे. 

या चर्चासत्रासाठी निर्यातदार, निर्यातक्षम,उद्योजक, नवउद्योजक औद्योगिक संस्था, व संघटना औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहत, शेतकरी, सहकारी संस्था, उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात संबंधी कामकाज करणारे घटक इक्यादीनी सदर संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन निर्यात प्रचालन समितीचे सचिव यांनी केले आहे.

00000

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना

व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन 

नांदेड दि. 22 (जिमाका)- अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फते राबविण्यात येत आहेत. लाभार्थी शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह ऑनलाईन अर्ज https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर करावीत. प्राप्त होणाऱ्या लक्षांकाच्या मर्यादेत प्राप्त अर्जामधून पात्र लाभार्थ्यांची ऑनलाईन पध्दतीने निवड करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे. 

या योजनेचे उद्दिष्ट याप्रमाणे आहेत. बदलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांची सिंचनाची आवश्यकता विचारात घेऊन जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रातर्गंत व क्षेत्राबाहेर) अंतर्गत सिंचन सुविधांचा लाभ देवून त्यांचे उत्पनात वाढ करुन जीवनमान उंचावणे व शेतकऱ्यांना स्वंयपूर्ण करण्यासाठी या योजना राबविण्यात येत आहेत.

योजनेच्या अटी व शर्ती  

लाभार्थी शेतकऱ्यानी या योजनेसाठी महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावर अर्ज विहीत नमुन्यात करावा. त्यामध्ये योजने अंतर्गत समाविष्ठ असलेल्या कोणत्याही एकाच पॅकेजची मागणी करावी. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतर्गत लाभ घेऊ इच्छिनारा लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकरी असावा. शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे. शेतकऱ्यांकडे त्याच्या स्वत: च्या नांवे जमीन धारणेचा सातबारा दाखला व 8-अ चा उतारा असणे आवश्यक आहे. (नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्राबाहेरील) नविन विहीरीचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्यांकडे त्याच्या स्वत: च्या नावे किमान 0.40 हेक्टर व नविन विहीर खोदने ही बाब वगळून योजनेतील अन्य बाबीसाठी किमान 0.20 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. या योजने अंतर्गत लाभ घेणेसाठी कमाल क्षेत्र मर्यादा 6.00 हेक्टर राहील. लाभार्थ्यांकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे सर्व मार्गानी मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावे. अशा शेतकऱ्यांनी सबंधीत तहसीलदार यांचेकडून उत्पन्नाचा अदयावत दाखला घेणे व अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील. ग्रामसभेने शिफारस केलेल्या ठरावाची प्रत जोडावी. प्रस्तावधारक अनु.जाती, नवबौध्द शेतकऱ्यांने या पूर्वी विशेष घटक योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अंतर्गत स्वत: किंवा कुटूंबातील सदस्याने नविन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळयाचे प्लॅस्टीक अस्तरीकरण या घटकांचा व त्या सोबतच्या पॅकेज अंतर्गत समाविष्ट असलेल्या बाबीचा लाभ घेतलेला नसावा. स्वर्गीय कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनांतर्गत जमीन वाटप झालेल्या अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना या योजनेचा प्राधान्याने लाभ देण्यात यावा. तालुक्यांना, जिल्हयांना प्राप्त होणाऱ्या लक्षांकाच्या मर्यादेत प्राप्त अर्जामधून पात्र लाभार्थ्यांची ऑनलाईन पध्दतीने निवड करण्यात येईल.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत देय उच्चत्तम अनुदान मर्यादा (रुपये) व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) अंतर्गत देय उच्चत्तम अनुदान मर्यादा (रुपये) या दोन्ही योजने तर्गत लाभ दयावयाचे घटक व देय अनुदान मर्यादा पुढील प्रमाणे राहील. नवीन विहीर - 2 लाख 50 हजार रुपये. जुनी विहीर दुरुस्ती- 50 हजार रुपये. इनवेल बोअरींग- 20 हजार रुपये. वीज जोडणी आकार- 10 हजार रुपये. शेततळयांचे प्लॅस्टीक अस्तरीकरण- 1 लाख रुपये. सुक्ष्म सिंचन संचात ठिबक सिंचन 50 हजार रुपये तर तुषार सिंचन- 25 हजार रुपये. परसबाग (बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेत)-500 रुपये. पंप संच- 20 हजार रुपये (10 अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे विद्युत पंप संच करीता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत मंजूर असलेल्या मापदंडानुसार शंभर टक्के अनुदान देय राहिल. पीव्हीसी पाईप (बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेत )- 30 हजार रुपये या प्रमाणे लाभ लाभार्थीस अनुज्ञेय राहील. अधिक माहितीसाठी पंचायत समितीचे कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

 नांदेड जिल्ह्यात 1 कोरोना बाधित झाला बरा

नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 961 अहवालापैकी निरंक अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 307 एवढी झाली असून यातील 87 हजार 633 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 23 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 651 एवढी आहे. आज जिल्ह्यातील 1 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 1 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 23 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 6, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 12, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, खाजगी रुग्णालय 1 व्यक्ती उपचार घेत आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 27 हजार 486

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 24 हजार 163

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 307

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 633

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 651

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-23

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000

 हरवलेल्या मुलीची माहिती देण्‍याचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथून शिवानी मारोती क्षीरसागर वय 16 वर्षे, 9 महिने असून ती दिनांक 13 डिसेंबर 2020 रोजी रात्री 12 वाजता कोणालाही काहीही न सांगता निघून गेली आहे. ती बेपत्ता असल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी मनाठा पोलिस स्टेशनला केली आहे.

 

तिचे वर्णन पुढीलप्रमाणे - मुलीचे नाव शिवानी मारोती क्षीरसागर, वय 16 वर्ष 9 महिन, शिक्षण  दहावी, उंची - अदांजे साडेपाच फुट, बांधा-सडपातळ,चेहरा- गोरा, अंगावर-पिवळया रंगाचा पंजाबी ड्रेस, अशा वर्णाची मुलगी हरविली असल्याची तक्रार पोलिस स्टेशन मनाठा जिल्हा नांदेड यांच्याकडे आली आहे.

या मुलीची माहिती मिळाल्यास व्ही. एल. चव्हाण मो.9767747774, टी.वाय. चिटेवार मो.9834634149  पोलिस स्टेशन मनाठा येथे संपर्क साधावा असे आवाहन पोलिस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.

0000

 

सेट परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- प्राध्यापक पात्रता चाचणी परीक्षा (SET)-2021 ही रविवार 26 सप्टेंबर एका सत्रात जिल्ह्यात 18 परीक्षा केंद्रावर सकाळी 10 ते दुपारी 1.30 या कालावधीत घेण्यात येणार आहेत. या परीक्षा केंद्राच्या परिसरात बाहेरील व्यक्तींचा उपद्रव होऊ नये व परीक्षा स्वच्छ सुसंगत पार पाडण्याच्यादृष्टिने या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काढले आहेत. 

 

या परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात रविवार 26 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करता  येणार नाही. परीक्षा कालावधीत या परीसरात 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.  

00000

 

 

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...