Wednesday, September 22, 2021

 निर्यातदाराचे संमेलन 24 सप्टेंबर रोजी 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- आझादी का अमृत महोत्सव 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापदिनामित्त केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत निर्यातदाराचे संमेलन 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा उद्योग केंद्र येथे आयोजित करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील निर्यातीला चालना देण्याच्या दृष्टिने उद्योगांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हृयात जिल्हा निर्यात प्रचालन परिषदेची स्थापना करण्यात आली. जिल्हृयात निर्यात वाढविण्यासाठी विविध केंद्र व जिल्हा कार्यालये,औद्योगिक संघटना, निर्यात परिषद, निर्यात सल्लागार यांच्या सतत पाठपुरवठा, समन्वय व अडीअडचणी  दूर करण्याच्या दृष्टिने जिल्हा प्रचालन परिषदेस सहकार्य करण्यासाठी  शासन निर्णयानुसार नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निर्यात प्रचालन परिषदेची समिती गठीत करण्यात आली आहे. 

या चर्चासत्रासाठी निर्यातदार, निर्यातक्षम,उद्योजक, नवउद्योजक औद्योगिक संस्था, व संघटना औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहत, शेतकरी, सहकारी संस्था, उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात संबंधी कामकाज करणारे घटक इक्यादीनी सदर संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन निर्यात प्रचालन समितीचे सचिव यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...