Wednesday, September 22, 2021

 ई-पिक पाहणीसाठी जिल्ह्यात 24 सप्टेंबर पासून विशेष मोहिम

-          जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्ह्यात डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ई-पिक पाहणी, पीक पेरणीची माहिती भ्रमणध्वनी ॲपद्वारा गाव नमूना नं. 12 मध्ये नोंदविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिम 24 सप्टेंबर पासून राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत एकूण 2 लाख 10 हजार 921 शेतकऱ्यांचे पीक पेरा नोंदविण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात मोहिम यशस्वी राबविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रयत्न करावेत, असे आवाहन  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.   

जिल्ह्यातील ई-पिक पाहणी मोबाईल ॲपद्वारे 2 लाख 10 हजार 921 शेतकऱ्यांची पीक पाहणी 21 सप्टेंबर रोजी मोहिम स्वरुपात नोंदणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. परंतु जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या पावसामूळे व नैसर्गिक आपत्तीमूळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावयाचे असल्याने निर्धारित करुन दिलेले उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. शासनाच्या निर्देशामूळे जिल्ह्यात ही मोहिम पुन्हा 24 सप्टेंबर 2021 रोजी राबविण्यात येणार आहे. शासकीय यंत्रणानी ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असेही जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

00000 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...