Thursday, June 20, 2024

 वृत्त क्र. 510 सुधारित वृत्त

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धा

नांदेड दि. 20 :- राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त 23 जून रोजी सकाळी 11 वाजता जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालयसिडकोनविन नांदेड येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. तरी ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घ्यावयाचा आहेत्यांनी 23 जून रोजी सकाळी ठिक 11 वाजता जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयसिडकोनविन नांदेड येथे उपस्थित रहावे.

निबंध स्पर्धेचा विषय राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक समता दृष्टीकोण असून निबंध 1500 शब्दात लिहीण आवश्यक आहे. या स्पर्धेतुन प्रथमव्दितीयतृतिय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषीक व प्रमाणपत्र देण्यांत येईल.

तसेच 23 जून रोजी दुपारी दोन वाजता सामाजिक समता आणि वैज्ञानिक प्रगती याविषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यांत आलेली आहे. वक्तृत्व स्पर्धेत सर्व महाविद्यालयीन मुलामुलींना भाग घेता येईल. सदर स्पर्धेतून प्रथमव्दितीय व तृतिय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख परितोषीक व प्रमाणपत्र देण्यांत येईल.

या दोन्ही स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त भाग घ्यावा. स्पर्धेसाठी आपल्या महाविद्यालयाचे ओळखपत्र घेवून स्वखर्चाने उपस्थित रहावे असे आवाहन  समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

०००००

 वृत्त क्र. 509

श्री गुरुग्रंथ साहिबजी भवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

नागरिकांना लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन  

 

नांदेड दि. 20 :- ‍जिल्हा प्रशासनाच्यावतीने दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन शुक्रवार 21 जून, 2024 रोजी सकाळी 6.30 वा. श्री गुरुग्रंथ साहिबजी भवन एनआरआयच्या बाजुस हिंगोली गेट नांदेड येथे साजरा करण्यात येणार आहे.  नांदेड जिल्हयातील विविध योग समितीयोग प्रशिक्षकआयुष मंत्रालयाचे प्रतिनिधीयांच्यावतीने सदरील कार्यक्रमास मार्गदर्शन लाभणार आहे. जिल्हयातील नागरीकांनी 21 जुन रोजी सकाळी 6.15 वा. श्री गुरुग्रंथ साहिबजी भवन, एनआरआयच्या बाजुस हिंगोली गेट नांदेड येथे उपस्थित राहुन आंतरराष्ट्रीय योग दिनाचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व विभागाप्रमुखांनी त्यांच्या स्तरावरुन त्यांच्या अधिनस्त कार्यालयाना आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याबाबत सूचना निर्गमित करण्याबाबतचे निर्देश जिल्हा प्रशासनाच्यावतीने दिले आहेत.

००००० 

वृत्त क्र. 508

शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृहात

प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 20 :- मातोश्री शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृह तथागत नगर, मालेगाव रोड नांदेड येथे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी व पदवीत्तर या पुनर/नुतन प्रवेशासाठी 10 जुलै 2024 पर्यत अर्ज मागविण्यात येत आहेत. यानंतर आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही. अचूक व परिपूर्ण अर्ज स्विकारले जातील यांची पालक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मातोश्री शासकीय ईबीसी वसतीगृहाचे गृहप्रमुख यांनी केले आहे. 

 

अर्जासोबत वार्षिक परीक्षेचे सन 2023-24 गुणपत्रक, सन 2023-24 या वर्षात उत्पन्न प्रमाणपत्र तहसिलदार कार्यालयाने अदा केलेले व चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्रजातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्राचे सत्यप्रती साक्षांकीत करुन प्रवेश अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज व नियमावली कार्यालयात कार्यालयीन वेळेत 24 जून ते 10 जुलै 2024 या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून मिळतील. या कालावधीत परिपूर्ण भरलेले अर्ज कागदपत्रासह स्विकारले जातील .

 

विद्यार्थ्यांनी प्रवेशाची निवड प्रक्रीया पूर्ण झाल्यावर वसतीगृह नियमित सुरु होईल. या वसतीगृहात शासनाकडून निवासाची व भोजनाची विनामुल्य सोय करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार वसतीगृहात प्रवेश दिला जातो. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 20 टक्के जागा राखीव आहेत. प्रवेश अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 10 जुलै असून यानंतर आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही असे मातोश्री शासकीय ईबीसी वसतीगृह नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे. 

0000

  वृत्त क्र. 507

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेशासाठी 5 जुलैपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 20 :- इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत जिल्ह्यामध्ये इतर मागास प्रवर्ग, विमुक्त  जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुलां-मुलीसाठी वसतिगृह सुरु केली आहेत. गरजु विद्यार्थी व विद्यार्थीनीनी वसतिगृहातील प्रवेशाबाबतचे अर्ज सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, नांदेड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जाती प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाचे वरील बाजूस नांदेड येथे संपर्क साधून विनामुल्य अर्ज प्राप्त करुन घ्यावेत. सदर अर्ज 5 जुलै 2024 पुर्वी कार्यालयीन वेळेत कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

 

राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त  जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी जिल्हानिहाय दोन याप्रमाणे शासकीय वसतीगृह सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात मुलांसाठी- 1 व मुलींसाठी -1 अशा दोन वसतीगृहाचा समावेश आहे.

 

एकविसावे शतक हे स्पर्धात्मक युग असून त्यामध्ये इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना टिकून राहणे, इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करणे तसेच आवश्यक ते कौशल्य व गुणवत्ता धारण करणे, विद्यार्थी/विद्यार्थीनीना आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्टया विविध क्षेत्रात स्पर्धेला तोंड देता यावे आणि शैक्षणिकदृष्टया उन्नती होणे आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृहाची सुविधा नसल्याने शासनाने मुलांसाठी 1 व मुलीसाठी 1 अशी दोन वसतीगृहे नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर केलेली आहेत.

 

इयत्ता १२ वी नंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये विनामुल्य प्रवेश ऑफलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे. इतर मागास प्रवर्ग , विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा  असा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

 ००००

 वृत्त क्र. 506

कृषि तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे प्रसारासाठी  शेतकरी शेतीशाळा

नांदेड दि. 20 :- कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे प्रसार करण्यासाठी कृषि विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत नांदेड जिल्ह्यात सन २०२४-२५ मध्ये खरीप हंगामात क्रॉपसॅपअन्न आणि पोषण सुरक्षा अभियानराष्ट्रीय खाद्य तेल अभियानराज्य पुरस्कृत योजना या योजनांच्या समन्वयातून सोयाबीनकापूसतूर या पिकांसाठी एकूण जिल्ह्यात एकूण ३०८ पिकनिहाय शेतीशाळा  प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. एका शेतीशाळेमध्ये २५ शेतकऱ्यांच्या समावेश असून जिल्ह्यात एकूण ७ हजार ७०० शेतकऱ्यांना वरील तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. तरी या शेतीशाळेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

 

शेतीशाळा म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्याच शेतात पिकांचा आणि शेतीपद्धतीचा अभ्यास करण्यास शिकवणेशेतीसंदर्भात उद्भवणाऱ्या विविध समस्या व त्यावरील उपाय स्थानिक पातळीवरच शोधण्याचा प्रयत्न करणेक्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत समाविष्ट पिके तसेच जिल्ह्यातील इतर प्रमुख पिकांवर उद्भवणारे कीड व रोगांचा प्रादुर्भाव तसेच त्यांच्या नियंत्रणाच्या उपाययोजना याच्याबद्दलची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहचविणेया उपायांचा अवलंब करण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य शेतकऱ्यांना प्रदान करणे इ. उद्देशाने क्षेत्रीय स्तरावर पिकनिहाय नवीन तंत्रज्ञान व त्या संबंधित कौशल्ये शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी कृषि विभागातील नियमित क्षेत्रीय कर्मचारी व क्षेत्रीय पातळीवर आत्मातंर्गत कार्यरत एटीएमबीटीएमशेतकरी मित्रआणि कृषि सखी यांचा योग्य समन्वय साधून कृषि विस्तार कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे ग्रामपातळीपर्यंत एकत्रीतपणे राबविण्याचे आयोजन करण्यात येत आहे. या शेतीशाळेमध्ये प्रयोगशील शेतकरी (Host farmer) व प्रक्षेत्रशेतकऱ्यांचा गटमहिला गटतंत्रज्ञान/अभ्यासक्रम (curriculum), प्रशिक्षण साहित्य आणि अत्यावश्यक निविष्ठा (Critical inputs) हे शेतीशाळेचे प्रमुख घटक आहेत.

पर्यावरणपूरक व हवामान अनुकूल अशा शाश्वत पीक उत्पादन पद्धतीस चालना देणे. सुधारीत व प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास शेतकऱ्यांना उपयुक्त करणे, प्रत्यक्ष कृतीतुन शिक्षणाद्वारे पिकांवरील विविध किडीरोगत्यावरील मित्रकिटक व त्यांचे शेतीतील महत्व शेतकऱ्यांना पटवून देणे. संबंधित पिकाच्या मुल्यसाखळीची शेतकऱ्यांना माहिती तयार करून देणे, जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणारे रोग व किडीचा पिकावरील प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिके राबविणे, पीक उत्पादनप्रक्रिया व बाजारमुल्य संबंधीत शासकीय व खाजगी संस्थासंशोधन संस्था व शेतकरी यांच्यामध्ये समन्वय व संपर्क वाढविणे. शेतकरी व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची क्षमता वृद्धींगत करणेत्यांच्यामध्ये खिलाडूवृत्ती वाढविणेसुप्त गुणांना चालना देणे तसेच उत्साहाची भावना निर्माण करणे. कॉपसॅप संलग्न शेतीशाळेमध्ये सोयाबीनकापूस, तूर, ज्वारीऊस व हरभरा या पिकांचे पेरणीपूर्व ते काढणी पश्चात तंत्रज्ञानाबाबत पिक वाढीच्या अवस्थेनुसार वर्ग निहाय मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ करणे हे शेतीशाळेचे उद्देश्य आहेत.

शेतीशाळेद्वारे शेतकऱ्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी पुढील चार महत्वाचे टप्पे पाडलेले आहेत. (पिकनिहाय या टप्प्यांमध्ये वाढ होऊ शकते)

पेरणीपूर्वः माती परीक्षण करणेजमीन तयार करणेसमतल मशागतजागच्या जागी पाणी मुरवण्याची व्यवस्था करणेखरीप हंगामासाठी त्या पिकासाठी योग्य अशा पिक वाणाची निवड करणेपेरणीपूर्व उगवण क्षमता तपासणे.

पेरणीच्या वेळी: बियाणे प्रक्रिया करणेपेरणी पध्दतीरुंद सरी वरंबा पध्दती (BBF) चा वापर करणेपट्टा पध्दतीने पेरणी करणेविविध खतांचा पहिला हप्ता देणेतण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर यावर भर देण्यात येईल.

पिक वाढीच्या अवस्थाः हा टप्पा दीर्घकाळासाठी असल्याने यामध्ये योग्य प्रकारे आंतरमशागततण व्यवस्थापनकीड व रोग नियंत्रणअन्नद्रव्य व्यवस्थापनपिकासाठी पाणी व्यवस्थापन यामध्ये जीवसंरक्षक सिंचनाचा अंतर्भाव राहील.

काढणीच्या वेळी व काढणीत्तर व्यवस्थापनः यामध्ये काढणीची योग्य वेळ व पध्दतीकाढणीनंतर त्याला वाळविणेसफासफाई करणेग्रेडींग करणेयोग्य पध्दतीने साठवणूक करणे तसेच काढणी पश्चात उत्पादीत मालावर प्रक्रीया करणेसंबंधित पिकांची मुल्यसाखळी इत्यादी बाबी वर उल्लेख केलेल्या विविध टप्प्यामध्ये जे तंत्रज्ञान व कौशल्ये शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचे आहे.

पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी स्थानिक कृषी हवामान पद्धतीचास्थानिक पिक पद्धतीचा विचार करून प्रकल्प क्षेत्रातील प्रमुख पिकांसाठी कृषी विद्यापीठाने व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांनी विकसित केलेले, (एनआयसीआरएया प्रकल्पामध्ये अवलंबलेलेप्रयोगशील शेतकऱ्यांनी अवलंबलेले आणि कृषी विज्ञान केंद्रांनी पडताळणी केलेले हवामान अनुकूल तंत्रज्ञान निश्चित करून त्याचा काटेकोरपणे अवलंब करण्यासाठी शेतीशाळेतील सहभागी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे, हवामान अनुकूल वानांचा अवलंब, समतल मशागत व पेरणी, आंतरपीक पद्धती, आच्छादनाचा वापर, हिरवळीच्या खताचा वापर, एकात्मिक कीड व्यवस्थापन, सुक्ष्म सिंचन, संरक्षित सिंचन, संरक्षित लागवड.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी मृदा तपासणी अहवाल तसेच आवश्यकतेनुसार जैविक व रासायनिक खतेसूक्ष्म मूलद्रव्ये आणि भूसुधारके (जिप्सम इ.) यांचा वापर करण्याबाबत शेतीशाळेच्या पहिल्या वर्गामध्ये उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात येणार असून कमतरता असलेल्या अन्नद्रव्यांचा शिफारशीनुसार खतांचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रवृत्त करून खतांचा कार्यक्षम वापर व खत बचत करण्याच्या अनुषंगाने वापरावयाचे तंत्रज्ञान याबाबत शेतकऱ्यांना अवगत करणार आहेत.

शेतीशाळामध्ये पिक प्रात्यक्षिकांसाठी कृषी विभागाच्या जैविक कीड नियंत्रक प्रयोगशाळेकडून पिक प्रात्यक्षिकांसाठी द्रवरूप जीवाणू खतांचा पुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये नत्र स्थिरीकरण करणारेस्फुरद विरघळविणारे व जस्त विरघळविणारे जीवाणू यापैकी कमीत कमी दोन किंवा अधिक जीवाणूंचा समावेश असतो. सदर जैविक खतांची बीजप्रक्रिया केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन पिकांच्या उत्पादकतेत वाढ होते.

0000

 वृत्त क्र. 505

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

 नांदेड दि. 20 :- नांदेड जिल्ह्यात 21 जून 2024 चे सकाळी 6 वाजेपासून ते 5 जुलै 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 21 जून चे सकाळी 6 वाजेपासून ते 5 जुलै 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...