Thursday, June 20, 2024

  वृत्त क्र. 507

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेशासाठी 5 जुलैपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 20 :- इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत जिल्ह्यामध्ये इतर मागास प्रवर्ग, विमुक्त  जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुलां-मुलीसाठी वसतिगृह सुरु केली आहेत. गरजु विद्यार्थी व विद्यार्थीनीनी वसतिगृहातील प्रवेशाबाबतचे अर्ज सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, नांदेड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जाती प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाचे वरील बाजूस नांदेड येथे संपर्क साधून विनामुल्य अर्ज प्राप्त करुन घ्यावेत. सदर अर्ज 5 जुलै 2024 पुर्वी कार्यालयीन वेळेत कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

 

राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त  जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी जिल्हानिहाय दोन याप्रमाणे शासकीय वसतीगृह सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात मुलांसाठी- 1 व मुलींसाठी -1 अशा दोन वसतीगृहाचा समावेश आहे.

 

एकविसावे शतक हे स्पर्धात्मक युग असून त्यामध्ये इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना टिकून राहणे, इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करणे तसेच आवश्यक ते कौशल्य व गुणवत्ता धारण करणे, विद्यार्थी/विद्यार्थीनीना आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्टया विविध क्षेत्रात स्पर्धेला तोंड देता यावे आणि शैक्षणिकदृष्टया उन्नती होणे आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृहाची सुविधा नसल्याने शासनाने मुलांसाठी 1 व मुलीसाठी 1 अशी दोन वसतीगृहे नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर केलेली आहेत.

 

इयत्ता १२ वी नंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये विनामुल्य प्रवेश ऑफलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे. इतर मागास प्रवर्ग , विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा  असा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

 ००००

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...