*किनवट उपजिल्हा रुग्णालयातील 'सिटी स्कॅन'साठी ३.१० कोटी उपलब्ध*
Friday, January 28, 2022
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी
वारसांना कागदपत्रे सादर करण्यास मुदतवाढ
नांदेड (जिमाका) दि. 28 :- महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील मयत शेतकऱ्यांच्या वारसांना घेता यावा यासाठी शासनाने सोमवार 31 जानेवारी 2022 पर्यत आवश्यक ती कागदपत्रे व माहिती बँकांकडे सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. मयत लाभार्थी शेतकऱ्यांच्या वारसांनी आवश्यक ती कागदपत्रे बँकांकडे जमा करुन कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी केले आहे.
राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 ही शासन निर्णय दि. 27 डिसेंबर, 2019 अन्वये कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत मयत कर्जदारांच्या बाबतीत सुधारित / अद्यावत माहिती संगणकीय प्रणालीवर (पोर्टल) सादर करण्यासाठी यापुर्वी 22 ऑक्टोंबर 2021 ते 8 नोव्हेंबर 2021 पर्यंत मुदत दिली होती. अद्याप ज्या मयत शेतकऱ्यांनी वारसाची नोंदीसाठी माहिती बँकेस सादर केली नाही अशा मयत शेतकऱ्यांच्या वारसांना वारसाची नोंद घेण्यासाठी सोमवार 31 जानेवारी 2022 पर्यत अंतीम मुदत दिली आहे, असेही सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.
000000
नांदेड जिल्ह्यात 353 व्यक्ती कोरोना बाधित
तर 1 हजार 22 कोरोना बाधित झाले बरे
नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 834 अहवालापैकी 353 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 276 तर अँटिजेन तपासणीद्वारे 77 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 854 एवढी झाली असून यातील 94 हजार 694 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 3 हजार 495 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 665 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 129, धर्माबाद 19, लोहा 7, बिलोली 1, लातूर 1, आदिलाबाद 2, यवतमाळ 2, नांदेड ग्रामीण 26, कंधार 12, मुदखेड 7, माहूर 23, परभणी 7, हैद्राबाद 1, उत्तरप्रदेश 1, भोकर 4, हदगाव 2, मुखेड 4, नायगाव 2, हिंगोली 5, तेलंगणा 4, पंजाबा 1, देगलूर 1, किनवट 7, हिमायतनगर 5, अमरावती 1, बीड 1, दिल्ली 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 15, भोकर 9, बिलोली 6, देगलूर 9, धर्माबाद 13, किनवट 1, माहूर 3, मुदखेड 4, मुखेड 4, नायगाव 4, उमरी 9 असे एकुण 353 कोरोना बाधित आढळले आहे.
आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 784, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 228, खाजगी रुग्णालय 6, किनवट कोविड रुग्णालय 1 असे एकुण 1 हजार 22 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.
उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 32, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 175, किनवट कोविड रुग्णालय 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 4, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 2 हजार 245, खाजगी रुग्णालय 38 असे एकुण 3 हजार 495 व्यक्ती उपचार घेत आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 40 हजार 262
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 24 हजार 101
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 854
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 93 हजार 694
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 665
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.90 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-19
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-176
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-3 हजार 495
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3.
कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः
येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन
कवच कुंडल”
अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड
लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या
नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर
दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले
आहे.
000000
कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना
सानुग्रह सहाय्य नामंजूर झाल्यास अपील करण्याची संधी
नांदेड (जिमाका) दि. 28 :- ‘कोविड-19’ या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य दिल्या जात आहे. ज्या अर्जदाराच्या खात्यात अद्यापपर्यंत पैसे जमा झाले नाहीत अशा अर्जदारांनी त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती बघण्यासाठी https://mahacovid19relief.in या संकेतस्थळावर लॉगीन करून अर्जाची सद्यस्थिती तपासावी. यात नामंजूर झाल्याचे दिसत असेल तर “Click here to appeal” या लिंक वर क्लिक करून तक्रार निवारण समितीकडे अपील करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे.
‘कोविड-19’ या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकास 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य देण्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने 4 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णय क्र. सीएलएस/२०२१/प्र.क्र.२५४/म-३, दि. 26.11.2021 निर्गमीत केलेला आहे.
नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत 3 हजार 290 लोकांनी अर्ज केले आहेत त्यापैकी 1 हजार 932 लोकांच्या खात्यात थेट पैसे जमा झाले आहेत. तर 622 लोकांचे अर्ज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे नामंजूर केले आहेत. जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्र. न्यायिक 2021/प्र.क्र. 488/आरोग्य-05 दिनांक 13 ऑक्टोबर 2021 अन्वये जिल्हास्तर/महानगरपालिका स्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीकडे तक्रार निवारण अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेवून अंतिम निर्णय देण्याचे अधिकार आहेत.
ज्या अर्जदाराच्या खात्यात अद्यापपर्यंत पैसे जमा झालेले नाहीत अशा अर्जदारांनी त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती बघण्यासाठी https://mahacovid19relief.in या संकेतस्थळावर लॉगीन करून अर्जाची सद्यस्थिती तपासावी जर सद्यस्थितीमध्ये अर्ज नामंजूर झाल्याचे दिसत असेल तर “Click here to appeal” या लिंक वर क्लिक करून तक्रार निवारण समितीकडे अपील करावे. या लिंकवर क्लिक केल्यावर स्क्रीनवर “Appealed to GRC” असा संदेश दिसेल याचा अर्थ आपण तक्रार निवारण समितीकडे अपील केले आहे.
यानंतर जिल्हास्तर, महानगरपालिका स्तरावर
तक्रार निवारण समिती मार्फत आपल्याला याविषयाशी निगडीत सर्व मुळ कागदपत्रे घेऊन
संबंधित कार्यालयात अर्जदारास फोन करून अथवा मोबाईलवर मेसेजद्वारे बोलावले जाईल.
त्याठिकाणी अर्ज कशामुळे नामंजूर झालेला आहे ते तपासले जाईल व अर्ज मंजूर
करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तपासल्यानंतर सर्व बरोबर असल्याची खात्री केल्यानंतर
आपला अर्ज मंजूर करून सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी पुढे पाठवला जाईल. अर्ज अंतिमत:
मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील. ज्या
अर्जदारांनी तक्रार निवारण समितीकडे अपील केले आहे त्यांना लवकरच तक्रार निवारण
समिती समोर बोलवले जाईल व त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यात येईल याची
संबंधितानी नोंद घ्यावी, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी
प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे.
0000000
इयत्ता पाचवी ते आठवीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन नावनोंदणी
नांदेड (जिमाका) दि. 28 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळामार्फत प्राथमिक स्तर पाचवी व उच्च प्राथमिक स्तर आठवी परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज 1 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत स्विकारण्यात येणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी यांनी नोंद घ्यावी असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ यांनी केले आहे.
नावनोंदणी अर्ज
ऑनलाईन स्विकारण्यासाठी मंगळवार 1 फेबुवारी ते सोमवार 28 फेबुवारीच्या रात्री
11.59 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरावेत. गुरूवार 3
फेब्रुवारी ते 3 मार्च 2022 पर्यंत विद्यार्थ्यांचे मूळ अर्ज, विहित शुल्क,
मूळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या संपर्क शाळेमध्ये जमा करावे. सोमवार 7 मार्च
2022 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मुळ कागदपत्रे, यादी विभागीय मंडळाकडे जमा करावी. विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करून अर्ज करावेत, असे शिक्षण मंडळकडून
सांगण्यात आले आहे.
000000
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने
माहूर-हिमायतनगरला पक्के अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन
• शिबिराला येतांना लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक
नांदेड (जिमाका) दि.
28 :- प्रादेशिक परिवहन
कार्यालयाच्यावतीने पक्के अनुज्ञप्ती चाचणी संबंधी शिबिराचे आयोजन हिमायतनगर येथे
17 फेबुवारी तर माहूर येथे 21 फेबुवारी रोजी करण्यात येणार आहे. या शिबिराच्या
दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर झाल्यास अथवा आपत्कालीन परस्थिती निर्माण झाल्यास
शिबिराच्या तारखेत बदल होवू शकतो. या शिबिराकरिता 1 फेबुवारी 2022 रोजी कार्यालयीन
वेळेत अपॉईंटमेंट खुल्या होतील. सर्व अर्जदारांनी उपलब्ध अपॉईंटमेंट घेऊन कोरोना
लस घेतल्याचे प्रमाणपत्रासह या शिबिरास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000
मदरसांच्या आधुनिकिकरण योजनेअंतर्गंत
सहायक अनुदानासाठी अर्ज आमंत्रित
नांदेड (जिमाका) दि. 28 :- राज्यातील नोंदणीकृत मदरसांना पायाभूत सुविधा, ग्रंथालय आणि विषय शिक्षकांच्या मानधनासाठी सहाय्यक अनुदान सन 2021-22 साठी शासकीय अनुदान घेण्याची इच्छा आहे, अशा मदरसांकडून अल्पसंख्यांक विकास विभागाने अर्ज मागविले आहेत. इच्छुक मदरशांनी शासन निर्णय 11 ऑक्टोबर 2013 मध्ये नमूद केलेल्या विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे 11 फेब्रुवारी 2022 पर्यंत सादर करावेत. अर्जाचा नमूना कागदपत्राची यादी http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ज्या नोंदणीकृत
मदरशांमध्ये पारंपारिक,
धार्मिक शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते त्या विद्यार्थ्यांसाठी
आधुनिक शिक्षण देण्यासाठी शासकीय अनुदान घेण्याची मदरसांना इच्छा आहे त्यांनी अर्ज
करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा उच्चस्तरीय निवड समितीचे अध्यक्ष डॉ. विपीन
इटनकर यांनी केले आहे.
विज्ञान, गणित, समाजशास्त्र,
हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू हे विषय शिकविण्याकरिता शिक्षकांसाठी मानधन. पायाभूत सुविधा व ग्रंथालयासाठी अनुदान. शासन
निर्णय 11 ऑक्टोंबर 2013 च्या तरतूदीनुसार मदरसामध्ये नियुक्त केलेल्या जास्तीत
जास्त तीन डीएड / बीएड शिक्षकांना मानधन देण्यात येईल. विद्यार्थी व शिक्षक
यांचे प्रमाण 40:1 असे राहील. शिक्षणासाठी हिंदी, इंग्रजी, मराठी, उर्दू यापैकी एका माध्यमाची
निवड करून त्यानुसार शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक आहे. ग्रंथालयासाठी तसेच
विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक साहित्यासाठी एकदाच 50 हजार रुपये अनुदान देय आहे. पायाभूत
सुविधासाठी जास्तीत जास्त 2 लाख इतक्या मर्यादेपर्यंत अनुदान देय आहे.
मदरशांच्या इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, पेय जलाची व्यवस्था करणे, प्रसाधन गृह उभारणे व त्याची डागडुजी करणे, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक फर्निचर, मदरसाच्या निवासस्थानात इन्वहर्टरची सुविधा उपलब्ध करणे, मदारसांच्या निवासी इमारतीचे नूतनीकरण व डागडुजी, संगणक, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, प्रिंटर्स इ. प्रयोगशाळा साहित्य या योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या पायाभूत या सुविधा आहेत.
या योजनेंतर्गत
लाभासाठी नोंदणी करून 3 वर्ष पूर्ण झालेल्या तसेच अल्पसंख्यांक बहुल
क्षेत्रातील मदरशांना प्राधान्य देण्यात येईल. ज्या मदरशांना Scheme for Providing Quality
Education in Madarsa (SPQEM) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ
मिळाला आहे अशा मदरसांना ह्या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही, असेही प्रसिद्धी
पत्रकात नमूद केले आहे.
0000000
30 जानेवारी रोजी हुतात्मा दिन
नांदेड
(जिमाका) दि. 28 :- देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्मा प्रती आदर व्यक्त
करण्यासाठी 30 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळुन हुतात्मा दिन पाळला जाणार आहे. यासंदर्भात
शासनाच्या परिपत्रकानुसार सकाळी 10.59 मिनिटापासून 11 वाजेपार्यंत इशारा भोगा
वाजविण्यात येईल. यानंतर सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालय,अस्थापना, शैक्षणिक संस्था, विद्यापीठ,
यातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक आदी सर्वांनी दोन मिनिटे
स्तब्धता पाळावी. ज्या ठिकाणी भोग्याची व्यवस्था नसेल त्या ठिकाणी संबंधितांनी सकाळी ठिक
11 वाजता मौन पाळावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
000000
वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...