Friday, January 28, 2022

 इयत्ता पाचवी ते आठवीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन नावनोंदणी   

नांदेड (जिमाका) दि. 28 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळामार्फत प्राथमिक स्तर पाचवी व उच्च प्राथमिक स्तर आठवी परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज 1 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत स्विकारण्यात येणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी यांनी नोंद घ्यावी असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ यांनी केले आहे. 

नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्यासाठी मंगळवार 1 फेबुवारी ते सोमवार 28 फेबुवारीच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरावेत. गुरूवार 3 फेब्रुवारी ते 3 मार्च 2022 पर्यंत विद्यार्थ्यांचे मूळ अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या संपर्क शाळेमध्ये जमा करावे. सोमवार 7 मार्च 2022 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मुळ कागदपत्रे, यादी विभागीय मंडळाकडे जमा करावी. विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in  या संकेतस्थळाचा वापर करून अर्ज करावेत, असे शिक्षण मंडळकडून सांगण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...