Friday, January 28, 2022

 महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी

वारसांना कागदपत्रे सादर करण्यास मुदतवाढ

नांदेड (जिमाका) दि. 28 :- महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील मयत शेतकऱ्यांच्या वारसांना घेता यावा यासाठी शासनाने सोमवार 31 जानेवारी 2022 पर्यत आवश्यक ती कागदपत्रे व माहिती बँकांकडे सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. मयत लाभार्थी शेतकऱ्यांच्या वारसांनी आवश्यक ती कागदपत्रे बँकांकडे जमा करुन कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी केले आहे.

 

राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 ही शासन निर्णय दि. 27 डिसेंबर, 2019 अन्वये कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत मयत कर्जदारांच्या बाबतीत सुधारित / अद्यावत माहिती संगणकीय प्रणालीवर (पोर्टल) सादर करण्यासाठी यापुर्वी 22 ऑक्टोंबर 2021 ते नोव्हेंबर 2021 पर्यंत मुदत दिली होती. अद्याप ज्या मयत शेतकऱ्यांनी वारसाची नोंदीसाठी माहिती बँकेस सादर केली नाही अशा मयत शेतकऱ्यांच्या वारसांना वारसाची नोंद घेण्यासाठी सोमवार 31 जानेवारी 2022 पर्यत अंतीम मुदत दिली आहेअसेही सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   92 फिरत्या वाहनावरील दुकानासाठी दिव्यांगांना अर्ज करण्याची संधी  नांदेड, दि. 23 जानेवारी :- हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्...