Friday, January 28, 2022

 प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने

माहूर-हिमायतनगरला पक्के अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन 

 शिबिराला येतांना लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने पक्के अनुज्ञप्ती चाचणी संबंधी शिबिराचे आयोजन हिमायतनगर येथे 17 फेबुवारी तर माहूर येथे 21 फेबुवारी रोजी करण्यात येणार आहे. या शिबिराच्या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर झाल्यास अथवा आपत्कालीन परस्थिती निर्माण झाल्यास शिबिराच्या तारखेत बदल होवू शकतो. या शिबिराकरिता 1 फेबुवारी 2022 रोजी कार्यालयीन वेळेत अपॉईंटमेंट खुल्या होतील. सर्व अर्जदारांनी उपलब्ध अपॉईंटमेंट घेऊन कोरोना लस घेतल्याचे प्रमाणपत्रासह या शिबिरास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...