Monday, July 31, 2017

स्वातंत्र्य दिनाचा 70 वा वर्धापन दिन
समारंभ नियोजनाची बैठक संपन्न
           नांदेड दि. 31 :-  भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 70 वा वर्धापन दिन मंगळवार 15 ऑगस्ट 2017 रोजी आहे. त्यानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रांगणात 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वा. होणार आहे. यासाठी नियोजनाची बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि नीटनेटक्या पद्धतीने, सुनियोजितपणे साजरा व्हावा यासाठीचे विविध निर्देश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी बैठकीत दिले.
बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, नांदेड विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) बी. एन. कांबळे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) महेश वडदकर, पोलीस उपअधिक्षक व्ही. पी. नांदेडकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईम कुरेशी, शिक्षणाधिकारी (मा.) जयश्री गोरे, तहसिलदार ज्योती पवार,  तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आदींची उपस्थिती होती.
स्वातंत्र्य दिन वर्धापदिन निमित्त आयोजित समारंभास शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्यालयी उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्याबाबत संबंधित विभागांनी, कार्यालय प्रमुखांनी दक्ष रहावे व  उपस्थितीबाबत सूचना द्याव्यात, असेही निर्देश जिल्हाधिकारी डोंगरे यांनी दिले.
मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 मिनीटांनी होणार आहे. या समारंभात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी 8.35 ते 9.35 च्या दरम्यान ध्वजारोहण किंवा इतर कोणताही शासकीय व निमशासकीय समारंभ करण्यात येऊ नये. एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला असा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास, त्यांनी तो सकाळी 8.35 वा. च्यापुर्वी किंवा 9.35 वाजेनंतर करावा. याबाबत विविध स्तरावरून माहिती देण्यात यावी असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.
ध्वजारोहणाच्या समारंभाबाबत ध्वजसंहितेचे काटेकोर पालन करण्यात यावे. विद्यार्थी व नागरिकांना ध्वजासाठी प्लॅास्टीकच्या वापरावर बंदी असल्याचे निदर्शनास आणुन द्यावे. प्लॅास्टीकचे ध्वज वापरले जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान ही सर्वच नागरिकांची जबाबदारी आहे. त्यामुळे ध्वजसंहितेतील प्रत्येक गोष्टीचे काटेकोर पालन व्हावे याची दक्षता घ्यावी. मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाच्या अनुषंगाने विविध विभाग प्रमुख आणि यंत्रणांना सोपवण्यात आलेल्या कामांबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला. प्रभात फेऱ्या, देशभक्तीपर विविध कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम यांच्या नियोजनाबाबतही सुचना देण्यात आल्या.
000000
  
गणेश मंडळांना वर्गणीसाठी
 परवाना घेण्याचे आवाहन
           नांदेड दि. 31 :- गणेश चतुर्थीसाठी गणेश मंडळांना वर्गणी गोळा करण्याचा परवाना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्यावतीने 1 ते 24 ऑगस्ट 2017 या कालावधीत कार्यालयीन वेळेत देण्यात येणार आहे. सर्व गणेश मंडळांनी परवानगी घेऊनच वर्गणी गोळा करावी, असे आवाहन धर्मादाय उप आयुक्त नांदेड यांनी केले आहे.
         गणेश मंडळांना ही परवानगी ऑनलाईन पद्धती देण्यात येणार आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार नाहीत. ऑनलाईन नोंदणीसाठी www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन परवाना मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करणे आवश्यक आहे.
      परवान्यासाठी सर्व सभासदांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, जागा मालकाची संमती, पोलीस स्टेशनचे नाहरकत पत्र, गणेश मंडळ स्थापनेबाबत ठराव, मागीलवर्षी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडून वर्गणी गोळा करण्यासाठी परवानगी घेतली असले तर गेल्या वर्षाचा अधिकृत लेखा परिक्षकामार्फत जमा खर्चाचा हिशोब या कागदपत्रांची आवश्यकता आहे.  

000000
मंडप, पेंडॉलबाबत तक्रार असल्यास
तपासणी पथकाशी संपर्क साधावा
           नांदेड दि. 31 :-  नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील मंडप, पेंडॉल तपासणी करण्‍यासाठी  चार पथके गठीत करण्‍यात आली आहेत. नागरीकांनी सार्वजनिक सण, उत्‍सव, समारंभ यावेळी उभारण्‍यात येणाऱ्या मंडप, पेंडॉल संदर्भात तक्रार असल्‍यास तपासणी पथक सदस्‍यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
         मा. उच्‍च न्‍यायालय मुंबई येथे उपस्थित जनहित याचिका क्र. 173 / 2010 संदर्भात सार्वजनिक सण, उत्‍सव, समारंभ याप्रसंगी उभारण्‍यात येणाऱ्या मंडप, पेंडॉल तपासणीच्‍या अनुषंगाने दिलेल्‍या आदेशानुसार जिल्ह्यांतर्गत नांदेड मनपा हद्दीत या तपासणी पथकाची स्थापना करण्यात आली असून त्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
तपासणी पथक सदस्‍याचे नाव
पदनाम
कार्यालयीन
दुरध्‍वनी क्र.
मोबाईल क्र.
पथक क्र. 1 क्षेत्रिय कार्यालय अ ( तरोडा-सांगवी )
संजय जाधव
पथक प्रमुख, सहा.आयुक्‍त नावाशमनपा, नांदेड
(02462) 265018
9011000939
श्री देशपांडे
पो.नि.पो.स्‍टे.भाग्‍यनगर
(02462) 261364
9923258261
सुभाष राठोड
पो.नि.पो.स्‍टे.विमानतळ
(02462) 221100
9130477768
तोरणेकर नितीन
वरिष्‍ठ लिपीक, नावाशमनपा नांदेड
(02462) 265018
8888801952
गच्‍चे प्रकाश
वरिष्‍ठ लिपीक, नावाशमनपा, नांदेड
(02462) 265018
8888801960
आर.के.संगमकर  
इमारत निरीक्षक, नावाशमनपा ,नांदेड
(02462) 265018
9970230988
साहेबराव ढगे
लिपीक, नांवाशमनपा, नांदेड
(02462) 265018
8888801975
पथक क्र. 2 क्षेत्रिय कार्यालय ब ( शिवाजीनगर-अशोकनगर )
जमील अहेमद
पथक प्रमूख प्र.सहा आयुक्‍त,नावाशमनपा, नांदेड
(02462) 247077
9420924777
श्री नरवाडे
पो.नि.पो.स्‍टे.शिवाजीनगर
(02462) 256520
9561045306
ठाणेदार म.इजर
वरिष्‍ठ लिपीक, नांवाशमनपा, नांदेड
(02462) 247077
9552587334
स.महेंद्रसिंग नानूसिंग
वरिष्‍ठ लिपीक, नांवाशमनपा, नांदेड
(02462) 247077
9860832554
शेषेराव पाटकूरवार
वरिष्‍ठ लिपीक, नांवाशमनपा, नांदेड
(02462) 247077
8888801934
उत्‍तम नारनाळे
लिपीक, नांवाशमनपा, नांदेड
(02462) 247077
9822261979
रणजीत पाटील
लिपीक, नांवाशमनपा, नांदेड
(02462) 247077
9011001005
पथक क्र. 3 क्षेत्रिय कार्यालय क ( इतवारा-वजिराबाद )
सुधीर इंगोले
पथक प्रमूख, सहा.आयुक्‍त, नावाशमनपा, नांदेड
(02462) 240519
9011001017
अनिल गायकवाड
पो.नि.पो.स्‍टे.इतवारा
(02462) 236510
8888847479
श्री काकडे
पो.नि.पो.स्‍टे.वजीराबाद
(02462) 236500
9765569777
शे.करीमोद्दीन अलिमोद्दीन
वरिष्‍ठ लिपीक, नावाशमनपा, नांदेड
(02462) 240519
8888847099
एस.पी.पाशमवाड
वरिष्‍ठ लिपीक, नावाशमनपा, नांदेड
(02462) 240519
9404063068
रमेश वाघमारे
लिपीक, नांवाशमनपा, नांदेड
(02462) 240519
8888801985
गोपाळ तोटावार
लिपीक, नांवाशमनपा, नांदेड
(02462) 240519
9921986989
पथक क्र. 4 क्षेत्रिय कार्यालय ड ( सिडको-वाघाळा )
अविनाश आटकोरे
पथक प्रमूख, सहा.आयुक्‍त, नावाशमनपा ,नांदेड
(02462) 225600
9011000940
श्री निकाळजे
पो.नि.पो.स्‍टे.नांदेड
(02462) 226373
9552515321
भालचंद्र चामे
वरिष्‍ठ लिपीक, नांवाशमनपा,नांदेड
(02462) 225600
8888847095
विलास गजभारे
वरिष्‍ठ लिपीक, नांवाशमनपा, नांदेड
(02462) 225600
9890327546
मनोहर दंडेवार
इमारत निरीक्षक, नांवाशमनपा, नांदेड
(02462) 225600
8308847649
प्रभु गिराम
लिपीक, नांवाशमनपा, नांदेड
(02462) 225600
9921038641

00000
लोकशाही दिनाचे 7 ऑगस्ट रोजी आयोजन
नांदेड, दि. 31 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकू घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन आयोजित करण्‍यात येतो. त्यानुसार सोमवार 7 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्‍याचे व न स्विकारण्‍याबाबतच्‍या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्‍यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्‍वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्‍यात येणार नाहीत. त्‍यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.
यादिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबित प्रकरणे आहेत असे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास  सुरुवात करण्यात येईल.  
न्यायप्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिना दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील  महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या उपक्रमात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल , असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
000000


  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...