Thursday, November 25, 2021

 सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी उद्योग प्रशिक्षणाचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- मिटकॉन आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत उद्योगास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती व सर्वसाधारण घटकातील सुशिक्षीत बेरोजगार युवक व युवतींसाठी ब्युटी पार्लर, रेडीमेट गारमेन्टस, इलेक्ट्रशियन आणि इलेक्ट्रॉनिक, होम अप्लायसेंस, मसाला मेकींग, हेअर ट्रिटमेंट ॲन्ड हारबल कॉस्मॉक, डीटीपी इत्यादीवर आधारीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.   

प्रशिक्षण प्रवेशास किमान सातवी उत्तीर्ण असावे. वय 18 ते 45 वर्षे, जातीचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, आधार कार्ड, बॅक खाते असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थ्यांची निवड करताना दिव्यांग महिला, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य, सांसद ग्राम, आदर्शग्राम, भुमीहीन शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. इच्छुकांनी आवश्यक सर्व कागदपत्रे  मिटकॉन कार्यालय नांदेड येथे सादर करावीत. इच्छुक युवक-युवतींनी अधिक माहितीसाठी जिल्हा समन्वयक मिटकॉन लि. नांदेड यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समन्वयक आर. एस. दस्तापुरे मिटकॉन लि. नांदेड यांनी केले आहे.  

00000


 नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित तर 4 कोरोना बाधित झाला बरा 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 666 अहवालापैकी 3 अहवाल कोरोना बाधित आला आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 3 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 473 एवढी झाली असून यातील 87 हजार 796 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 24 रुग्ण उपचार घेत असून 1 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 653 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, नांदेड ग्रामीण 1 असे एकुण 3 बाधित आढळले. आज जिल्ह्यातील 4 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 3, खाजगी रुग्णालयातील एका व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 24 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 2, नांदेड मनपा अंतर्गंत गृह विलगीकरण 19, खाजगी रुग्णालयात 1 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 71 हजार 455

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 67 हजार 544

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 473

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 796

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 653

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-11

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-24

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1. 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

कृषि यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन घटकांतर्गत लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन    

नांदेड (जिमाका) दि. 25 :- कृषि यांत्रिकीकरण तसेच सुक्ष्म सिंचन घटकांतर्गत विविध योजनेतून महाडीबीटी पोर्टलवर नांदेड जिल्ह्यात 13 हजार 402 लाभार्थ्यांची निवड झाली आहे. या लाभार्थ्यांना संदेश पाठवण्यात आलेले आहेत. त्यापैकी आतापर्यंत कृषी यात्रिकिकरण  197, सूक्ष्म सिंचन 4 हजार 379  लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केली, असून उर्वरित लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केली नाहीत. निवड झालेल्या लाभार्थ्यांनी यांत्रिकीकरण घटकासाठी  आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.  

अपलोड कराव्याच्या कागदपत्रात सातबारा उतारा, आठ-अ उतारा, निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन, तपासणी अहवाल, अ.जाती / अ.जमाती प्रवर्गातून निवड झाल्यास वैध जातप्रमाणपत्र आदी कागदपत्रे तसेच सुक्ष्म सिंचन घटकासाठी आवश्यक कागदपत्रे सातबारा उतारा, आठ-अ उतारा, सिंचनाची स्रोत नोंद, अ.जाती / अ. जमाती प्रवर्गातून निवड झाल्यास वैध जात प्रमाणपत्र आदी कागदपत्रे अपलोड करावीत. 10 दिवसात कागदपत्रे अपलोड न केल्यास अर्ज महाडीबीटी पोर्टवरील अर्ज रद्द होईल. 

ज्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केली आहेत त्यांना पूर्व संमती देण्यात आली आहे. सूक्ष्म सिंचन या घटकांतर्गत ज्या लाभार्थ्यांना पूर्व संमती मिळूनही सुक्ष्म संच कार्यन्वित केले नाहीत अशा शेतकऱ्यांनी सुक्ष्म संच कार्यान्वित करुन देयके अपलोड करावीत. पूर्व संमती नंतर 30 दिवसात देयके अपलोड न केल्यास दिलेली संमती रद्द करण्यात येणार आहे.  

मुदत देऊन विहित कालावधीत कागदपत्रे अपलोड न केल्यास असे अर्ज महाडीबीटी पोर्टल मधून रद्द होईल. ज्या लाभार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड झालेली आहे परंतु त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड केली नाहीत अशा सर्वांनी तात्काळ कागदपत्रे अपलोड करावीत. सद्यस्थितीत विभागाने Maha DBT Farmer या नावाचे मोबाईल ॲप तयार केले असून याद्वारे कागदपत्रे अपलोड करणे सुलभ झाले आहे. हे ॲप GooglePlay Store  वर उपलब्ध आहे. याविषयी अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

000000


 नायगाव,अर्धापूर, माहूर नगरपंचायत

सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम निश्चित 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- जिल्ह्यातील नायगाव, अर्धापूर, माहूर या नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूक- 2021 चा कार्यक्रम  राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या निवडणूक प्रक्रियेत अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिद्ध करण्याचा दिनांक सोमवार 29 नोव्हेंबर 2021 आहे. जिल्हाधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख मंगळवार 30 नोव्हेंबर 2021 आहे. 

नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्यासाठी उपलब्ध असण्याचा कालावधी हा बुधवार 1 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 ते मंगळवार 7 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत राहील. नामनिर्देशनपत्रे स्विकारण्याचा कालावधी बुधवार 1 डिसेंबर ते मंगळवार 7 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. शनिवार 4 डिसेंबर व रविवार 5 डिसेंबर 2021 रोजी सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशपत्र स्विकारण्यात येणार नाहीत. 

नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक बुधवार 8 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून राहिल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक अपील नसेल तेथे सोमवार 13 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत. अपील असल्यास वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत, जिल्हा न्यायाधीशाकडे अपिल करता येईल. निवडणूक निर्णय अधिकारी हे अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करुन घेण्यासाठी प्रयत्न करतील. अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र गुरुवार 16 डिसेंबर 2021 पर्यंत राहिल. 

निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक मंगळवार 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 पासून ते सायं 5.30 पर्यंत. मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक बुधवार 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 पासून ते सायं 5.30 वाजेपर्यंत. मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक हा बुधवार 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून राहिल. महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध कलम 19 मधील तरतुदीनुसार करण्यात येणार आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेली माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सविस्तर सांगितली.

000000   

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...