Thursday, November 25, 2021

कृषि यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन घटकांतर्गत लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन    

नांदेड (जिमाका) दि. 25 :- कृषि यांत्रिकीकरण तसेच सुक्ष्म सिंचन घटकांतर्गत विविध योजनेतून महाडीबीटी पोर्टलवर नांदेड जिल्ह्यात 13 हजार 402 लाभार्थ्यांची निवड झाली आहे. या लाभार्थ्यांना संदेश पाठवण्यात आलेले आहेत. त्यापैकी आतापर्यंत कृषी यात्रिकिकरण  197, सूक्ष्म सिंचन 4 हजार 379  लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केली, असून उर्वरित लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केली नाहीत. निवड झालेल्या लाभार्थ्यांनी यांत्रिकीकरण घटकासाठी  आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.  

अपलोड कराव्याच्या कागदपत्रात सातबारा उतारा, आठ-अ उतारा, निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन, तपासणी अहवाल, अ.जाती / अ.जमाती प्रवर्गातून निवड झाल्यास वैध जातप्रमाणपत्र आदी कागदपत्रे तसेच सुक्ष्म सिंचन घटकासाठी आवश्यक कागदपत्रे सातबारा उतारा, आठ-अ उतारा, सिंचनाची स्रोत नोंद, अ.जाती / अ. जमाती प्रवर्गातून निवड झाल्यास वैध जात प्रमाणपत्र आदी कागदपत्रे अपलोड करावीत. 10 दिवसात कागदपत्रे अपलोड न केल्यास अर्ज महाडीबीटी पोर्टवरील अर्ज रद्द होईल. 

ज्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केली आहेत त्यांना पूर्व संमती देण्यात आली आहे. सूक्ष्म सिंचन या घटकांतर्गत ज्या लाभार्थ्यांना पूर्व संमती मिळूनही सुक्ष्म संच कार्यन्वित केले नाहीत अशा शेतकऱ्यांनी सुक्ष्म संच कार्यान्वित करुन देयके अपलोड करावीत. पूर्व संमती नंतर 30 दिवसात देयके अपलोड न केल्यास दिलेली संमती रद्द करण्यात येणार आहे.  

मुदत देऊन विहित कालावधीत कागदपत्रे अपलोड न केल्यास असे अर्ज महाडीबीटी पोर्टल मधून रद्द होईल. ज्या लाभार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड झालेली आहे परंतु त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड केली नाहीत अशा सर्वांनी तात्काळ कागदपत्रे अपलोड करावीत. सद्यस्थितीत विभागाने Maha DBT Farmer या नावाचे मोबाईल ॲप तयार केले असून याद्वारे कागदपत्रे अपलोड करणे सुलभ झाले आहे. हे ॲप GooglePlay Store  वर उपलब्ध आहे. याविषयी अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

000000


No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...