Thursday, January 9, 2020

भोकरधर्माबादउमरी व भेंडेगावमधील
रेल्वे उड्डाणपुलासाठी प्रस्ताव सादर करा - श्री. अशोक चव्हाण

मुंबईदि. 9 :  नांदेड जिल्ह्यातील हदगाव-तामसा-उमरी महामार्गावरील भोकर शहरातील अपूर्ण रेल्वे उड्डाणपूल पूर्ण करणे आणि  धर्माबादउमरीभेंडेगाव चौक व किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे नवे उड्डाणपूल उभारण्याबाबत आठ दिवसात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) श्री. अशोक चव्हाण यांनी आज येथे दिले.
नांदेड जिल्ह्यातील रेल्वे फाटकाच्या ठिकाणी पुल बांधण्यासंदर्भात श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी अनेक सूचना केल्या. श्री. चव्हाण म्हणाले कीभोकर शहरातील लेव्हल क्रॉसिंग क्र.3 वर रेल्वे उड्डाण पुलाचे काम मंजूर करण्यात आले होते. मात्रदोन वर्षे झाले तरी अद्याप काम पूर्ण झालेले नाही. पुलाकडे जाणाऱ्या पोच रस्त्याचे काम राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. मात्ररेल्वे रुळावरील उड्डाणपुलाचे काम अर्धवट आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. हे काम तातडीने सुरू होण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रेल्वे विभागाशी संपर्क साधून लवकरात लवकर काम पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करावा. तसेच पोच रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम तातडीने सुरू करावेत. या पुलाच्या कामातून बचत होणाऱ्या रक्कमेतून भोकर-नांदेड रस्त्यावरील काही भागाचे काँक्रिटीकरण करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करावा.

याशिवाय धर्माबाद व उमरी येथेही रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाण पुलाची आवश्यकता आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करावा. किनवट तालुक्यातील गोकुंदा रेल्वे क्रॉसिंगनांदेड औरंगाबाद रस्त्यावरील भेंडेगाव येथे तसेच वसमत तालुक्यातील कुरुंदा गावाजवळील चौकातही उड्डाण पुलाची आवश्यकता आहे. या सर्व ठिकाणचे प्रस्ताव आठ दिवसात सादर करण्याचे निर्देशही श्री. चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले. मुदखेड ते भोकर हा एकपदरी रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा प्रस्तावही सादर करण्याच्या सूचना केल्या.
००००




राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री नांदेड जिल्हा
तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा कार्यक्रम
नांदेड, दि. 9:-   राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री नांदेड जिल्हा तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा कार्यक्रम शुक्रवार, दि.10 जानेवारी, 2020, शनिवार, दि.11 जानेवारी, 2020 व रविवार, दि. 12 जानेवारी, 2020 या तीन दिवसांच्या कालावधीत नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.
शुक्रवार, दि. 10 जानेवारी, 2020 रोजी दुपारी 12.55 वाजता मुंबईहून 2 टी 518 या विमानाने नांदेडकडे प्रयाण. 2.30 वाजता नांदेड येथे आगमन. 3.00 वाजता विवेकनगर, नांदेड श्रीमती मंगलाताई निमकर यांचे निवासस्थानी सांत्वन भेट. 3.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे राखीव. 4.00 ते 6.00 वाजता नांदेड येथील नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथील उर्वरीत विकास कामांसंबधी बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 6.00 ते 7.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे नांदेड जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीस उपस्थिती व नांदेड येथे मुक्काम.
शनिवार, दि. 11 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 10.00 वाजता नांदेड येथून मोटारीने पाळज            ता. भोकरकडे प्रयाण. दुपारी 12.00 वाजता पाळज येथील श्री गणपती दर्शनासाठी राखीव. 3.00 वाजता मोंढा मैदान, भोकर येथील नागरी सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. सांयकाळी 7.00 वाजता महाविहार बावरीनगर, बावरीनगर, दाभड ता. अर्धापूर जि. नांदेड येथील 33 व्या आखिल भारतीय महाविहार बावरीनगर येथे आयोजित अखिल भारतीय धम्म परिषदेत उपस्थिती आणि नांदेड येथे मुक्काम राहील.
रविवार, दि. 12 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता शाळा महाविद्यालय परिसर, विवेकानंदनगर, नागेली रोड, बारड येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बारड या संस्थेद्वारे संचलित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन 2020 आयोजित कार्यक्रमास उपस्थिती.
0000


राष्‍ट्रीय ग्राहक दिन साजरा
नांदेड, दि. 9:- ग्राहकांच्‍या हक्‍कांची ग्राहक संरक्षण कायदा याची जनतेत होण्‍याच्‍या उद्शाने प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी गुरुवारी दिनांक 09 जानेवारी 2020 रोजी दुपारी 01.30 वाजता जिल्‍हास्‍तरीय राष्‍ट्रीय ग्राहक दिन  जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथील, बचत भवन येथे साजरा करण्‍यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्‍यक्ष, मा.श्री. किशोरकुमार रं. देवसरकर जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नांदेड यांचे हस्‍ते करण्‍यात आले यावेळी अन्‍न औषध प्रशासन नांदेड,परिवह महामंडळ, गॅस एजन्‍सी, नांदेड, वजन व मापे विभाग, नांदेड,  अशा विविध विभागाचे स्‍टॉल चे ही उद्घाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या सुरुवातीस स्‍वामी विवेकानंद यांच्‍या प्रतिमेचे पुजन करुन दिप प्रज्‍वलन करण्‍यात आले.
प्रास्‍ताविक श्री. लतिफ पठाण जिल्‍हा पुरवठा अधिकारी, नांदेड यांनी केली यावेळी, श्री मिटकरी सहाय्यक जिल्‍हा पुरवठा अधिकारी, नांदेड श्री. जायेभाये एस. पी. जिल्‍हा पुरवठा निरीक्षण अधिकारी, श्री. सारंग चव्‍हाण नायब तहसिलदार पु. तहसिल कार्यालय नांदेड, श्री माचेवाड नायब तहसिलदार (रोहयो)  , मा. श्री.पुरूषोत्‍तम अमिलकंठवार जिल्‍हाध्‍यक्ष, अ.भा.ग्राहक पंचायत विभाग, नांदेड तथा सदस्‍य अन्‍न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण निधी व्‍यवस्‍थापन समिती महाराष्‍ट़्र, श्री. भागवत देवसरकर अशासकीय सदस्‍य, जिल्‍हा ग्राहक संरक्षण परिषद, नांदेड श्री. श्रीनिवास जाधव अशासकीय सदस्‍य जिल्‍हा ग्राहक संरक्षण परिषद, नांदेड, उपस्थित होते.
          या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. काळबांडे लिपीक जिल्‍हा पुरवठा कार्यालय नांदेड आभार प्रदर्शन लेखाधिकारी अरविंद देशमुख,  नायब तहसिलदार (पुरवठा)  सारंग चव्‍हाण, यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन श्रीमती जिल्‍हा पुरवठा कार्यालय, नांदेड अ.का.  एम.डी.वांगीकर यांनी केले. यावेळी विविध कार्यालयाचे अधिकारी, कर्माचारी, स्‍वस्‍तधान्‍य दुकानदार व ग्राहक बहुसंख्‍येने उपस्थित होते.
0000



योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाबाबत
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन
नांदेड, दि. 9 :- योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी अपॉईंटमेंट घेतलेल्या वाहनांची तपासणी करण्यासाठी शनिवार 11 जानेवारी 2020 रोजी साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे सोमवार 13 जानेवारी 2020 रोजी अनु. 1 ते 40 व मंगळवार 14 जानेवारी 2020 रोजी अनु. 41 ते 100 पर्यंतची करण्यात येणार आहे.  
वाहनांच्या अनुक्रमाकांची यादी नांदेड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे. शनिवार 11 जानेवारी 2020 रोजी अपॉईंटमेंट घेतलेल्या सर्व वाहन मालक, चालकांनी त्यांचे वाहन वरील प्रमाणे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाच्या तपासणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


जिल्हास्तरीय हातमाग कापड
प्रदर्शनाचे नांदेड शहरात आयोजन
नांदेड, दि. 9 :- राज्य शासनाचे सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग अंतर्गत आयुक्त वस्त्रोद्योग विभाग यांचे मंजुरीने हातमाग कापड प्रचार प्रसार व विक्री विकास पंचवार्षिक कार्यक्रमाप्रमाणे नांदेड शहरातील सौभद्र मंगल कार्यालय शिवमंदीर चैतन्यनगर तरोडा नांदेड याठिकाणी 11 ते 21 जानेवारी 2020 या कालावधीत मकरसंक्राती सणाचे औचित्य साधून 11 दिवसासाठी जिल्हास्तरीय हातमाग कापड प्रदर्शन  व विक्रीचे आयोजन महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या. नागपूरद्वारे करण्यात आले आहे.
प्रदर्शन दररोज सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य प्रवेशासह खुले राहणार आहे. प्रत्यक्ष हातमाग कापड उत्पादकांकडून खरेदी करण्याची संधी एकाच ठिकाणी शासनाने उपलब्ध करुन दिली आहे. प्रदर्शनात राज्यातील विविध जिल्ह्यातील हातमाग कापड उत्पादित करणारे तीस हॅन्डल्यूम मार्क नोंदणीकृत सहकारी संस्था, हातमाग बचतगट, शिखर संस्था महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ नागपूर इद्रायणी हॅन्डल्यूम, महाटेक्स सहभागी होणार आहे. त्यांनी उत्पादित केलेली खादि कापड, साड्या नऊ वारी साड्या, धोती कुर्ता कापड कोसा सिल्क कापड, चादरी, टावले, बेडसिटस, लहान मोठ्या संतरज्या इत्यादी प्रकारचे कापड विक्रीस ठेवण्यात येणार आहे. खरेदी करण्यात आलेल्या कापडावर 20 टक्के सवलत देण्यात येणार आहे. नांदेडकर वासियांनी याचा लाभ घ्यावा. हातमाग विणकर कारागिरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन त्यांनी तयार केलेल्या कापडाला योग्य बाजारपेठ मिळून देऊन हातमाग कापडाचा प्रचार प्रसार होणेसाठी जिल्हास्तरीय हातमाग प्रदर्शनचे आयोजन महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ नागपूरद्वारे शासनाचे माध्यमातून दरवर्षी करण्यात येते. नांदेडकर वासियांनी हातमाग कापड खरेदी करुन प्रतिसाद दयावा, असे आवाहन प्रदर्शन प्रमुख ज्ञानदेव बाभुळकर यांनी केले आहे.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...