Tuesday, January 17, 2023

वृत्त क्रमांक 31

 प्रत्येकांच्या आहारात तृणधान्यांचा समावेश आवश्यक

-         जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

 

§  संक्रांत-भोगी दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून दरवर्षी होणार साजरा

नांदेड (जिमाका) दि. 17 :-मानवी जीवनात तृणधान्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. पौष्टिक तृणधान्यात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा हे पिके येतात. या तृणधान्यातून आरोग्यास लोह, कॅल्शियम, झिंक, आयोडिन इ. पोषक घटक मिळतात. हे पोषक घटक प्रत्येकाच्या आरोग्यासाठी फायदेशिर असून याचा प्रत्येकांच्या आहारात समावेश अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी  अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.


पौष्टिक तृणधान्य दिन अधिक व्यापक व्हावा यासाठी जिल्ह्यात बचत गटाच्या माध्यमातून तृणधान्य व त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थाची विक्री व जन जागृतीवर भर दिला जात आहे. जिल्हा परिषदेचा कृषि विभाग, महिला व बालविकास विभाग व आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून याबाबत अधिक व्यापक उपक्रम घ्यावेत, असे आवाहन वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. आज जिल्हा परिषदेत पौष्टिक तृणधान्य दिन साजरा करण्यात आला. 


यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संजय तुबाकले, कृषि विकास अधिकारी टी.जी. चिमनशेट्टे तसेच जिल्हा परिषदेचे विभाग प्रमूख व अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. तर दृरदृश्यप्रमालीद्वारे जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, तालुका महिला व बालविकास अधिकारी यांची उपस्थिती होती.

  

संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्र शासनाने संक्रांत-भोगी दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून कायमस्वरुपी साजरा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी तृणधान्याचे आहारातील महत्व सांगितले. या कार्यक्रमाची प्रस्तावना कृषि विकास अधिकारी टी.जी. चिमनशेट्टे यांनी केली.

 00000





विभागीय माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध

 लातूर, दि.17(विमाका):- विभागीय माहिती कार्यालय, लातूर येथील वृत्तपत्रांची रद्दी विक्रीसाठी काढण्यात आली आहे. ज्यांना रद्दी घ्यावयाची असेल त्यांना कार्यालयीन वेळेत रद्दी पाहावयास मिळेल. ज्यांना रद्दी विकत घ्यावयाची  आहे, त्यांनी त्यांचे लिफाफाबंद दरपत्रक मा. उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, उत्तर बाजू, लातूर या पत्यावर दि. 25 जानेवारी 2023 सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दाखल करावीत. या संदर्भातील अटी व शर्ती कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामाच्या दिवशी पाहता येतील .

          रद्दी विक्रीचे दरपत्रक मंजूर करणे अथवा रद्द करणे हे सर्व अधिकार उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, लातूर यांना राहतील .

***

वृत्त क्रमांक 30

 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारी रोजी मतदान

मत कसे नोंदवावे याबाबत मतदारांसाठी सूचना 

नांदेड (जिमाका) दि. 17 :-05 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सोमवार 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक शाखेच्यावतीने मत नोंदविण्यासाठी मतदारांना आवश्यक त्या सुचना निर्गमीत केल्या आहेत.

               मत कसे नोंदवावे याबाबत मतदारांसाठी सूचना

मतदान करण्यासाठी केवळ मतपत्रिकेसोबत पुरविलेला जांभळ्या रंगाचा स्केचपेनचाच वापर करावा. याशिवाय इतर कुठलेही पेनपेन्सिलबॉलपॉईन्ट पेन यांचा वापर करु नये. ज्या उमेदवारास तुम्ही पहिला पसंतीक्रम देण्यासाठी निवडले आहे, त्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रम (Order of Preference) असे नमूद केलेल्या रकान्यात 1 हा अंक नमूद करुन मतदान करावे. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या एका पेक्षा जास्त असेल तरी 1 हा अंक केवळ एकाच उमेदवाराच्या नावासमोर नमूद करावा. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या कितीही असली तरी तुम्हाला जेवढे उमेदवार निवडणूक लढवित आहेततेवढे पसंतीक्रम नोंदविता येतील. उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर तुमचा पुढील पसंतीक्रम 234 इत्यादी अंक तुमच्या पसंतीक्रमानुसार पसंतीक्रम (Order of Preference) या स्तंभामध्ये दर्शवा. कोणत्याही उमेदवारांच्या नावासमोर केवळ एकच अंक नमूद करावा. एकच अंक एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर नमूद करु नये. पसंतीक्रम हा केवळ अंकात दर्शविला जाईल. उदा. 1,2,3 इत्यादी आणि तो एकदोनतीनइत्यादी असा शब्दात दर्शवू नये. अंक हे भारतीय आंतरराष्ट्रीय अंक स्वरुपात जसे 1,2,3 इत्यादी किंवा रोमन स्वरुपातील I,II,III इत्यादी किंवा संविधानाच्या 8 व्या अनुसूचितील भारतीय भाषेतील अंकांच्या स्वरूपात नोंदविता येतील. मतपत्रिकेवर तुमची स्वाक्षरी किंवा आद्याक्षरे किंवा नाव किंवा कोणतेही शब्द नमूद करु नये. तसेच अंगठ्याचा ठसा उमटवू नये. तुमचा पसंतीक्रम दर्शविण्यासाठी मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर () किंवा (×) अशी खुण करु नयेअशी मतपत्रिका बाद ठरेल. तुमची मतपत्रिका वैध ठरण्यासाठी उमेदवारांपैकी एकाच्या नावासमोर 1 हा अंक नमूद करुन तुमचा पहिला पसंतीक्रम दर्शविणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम हे ऐच्छिक स्वरुपाचे असून ते अनिवार्य नाहीत. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदारांनी मतदान करतांना या सूचनांचे पालन करुन आपले मतदान अवैध ठरणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी नांदेड तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी 5- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ यांनी  केले आहे.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...