Tuesday, January 17, 2023

वृत्त क्रमांक 31

 प्रत्येकांच्या आहारात तृणधान्यांचा समावेश आवश्यक

-         जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

 

§  संक्रांत-भोगी दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून दरवर्षी होणार साजरा

नांदेड (जिमाका) दि. 17 :-मानवी जीवनात तृणधान्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. पौष्टिक तृणधान्यात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा हे पिके येतात. या तृणधान्यातून आरोग्यास लोह, कॅल्शियम, झिंक, आयोडिन इ. पोषक घटक मिळतात. हे पोषक घटक प्रत्येकाच्या आरोग्यासाठी फायदेशिर असून याचा प्रत्येकांच्या आहारात समावेश अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी  अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.


पौष्टिक तृणधान्य दिन अधिक व्यापक व्हावा यासाठी जिल्ह्यात बचत गटाच्या माध्यमातून तृणधान्य व त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थाची विक्री व जन जागृतीवर भर दिला जात आहे. जिल्हा परिषदेचा कृषि विभाग, महिला व बालविकास विभाग व आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून याबाबत अधिक व्यापक उपक्रम घ्यावेत, असे आवाहन वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. आज जिल्हा परिषदेत पौष्टिक तृणधान्य दिन साजरा करण्यात आला. 


यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संजय तुबाकले, कृषि विकास अधिकारी टी.जी. चिमनशेट्टे तसेच जिल्हा परिषदेचे विभाग प्रमूख व अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. तर दृरदृश्यप्रमालीद्वारे जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, तालुका महिला व बालविकास अधिकारी यांची उपस्थिती होती.

  

संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्र शासनाने संक्रांत-भोगी दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून कायमस्वरुपी साजरा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी तृणधान्याचे आहारातील महत्व सांगितले. या कार्यक्रमाची प्रस्तावना कृषि विकास अधिकारी टी.जी. चिमनशेट्टे यांनी केली.

 00000





No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 45 श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत  राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा                                ...